आपल्या घरात जेवणानंतर बडीशेप खायची पद्धत आहे.
असे म्हणतात की जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने जेवण पचायला मदत होते.
बडीशेपेच्या अनेक फायद्यांपैकी हा एक महत्वाचा फायदा आहेच पण, या व्यतिरिक्त सुद्धा बडीशेपेचे इतर अनेक फायदे आहेत.
बडीशेप अत्यंत औषधी आहे. बडीशेपेमध्ये व्हिटामिन जास्त प्रमाणात आढळतात, खास करून व्हिटामिन ‘सी’, ‘ई’ आणि ‘के’.
यामध्ये आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेची अशी कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशीयम ही खनिजे सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात.
बपॉलीफिनोल या नावाचे anti oxidant सुद्धा बडीशेपेत जास्त प्रमाणात असते.
बडीशेपेत आढळणाऱ्या याच पोषणद्रव्यांमुळे तिचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
या लेखात आज आपण हेच फायदे बघणार आहोत.
१. तोंडाची दुर्गंधी दूर करते
तोंडात अडकलेल्या अन्नाच्या कणांमध्ये काही जीवाणूंची वाढ होते. यामुळे तोंडाला दुर्गंधी येते.
तोंडाची दुर्गंधी तात्पुरती घालवायला अनेक पर्याय असतात.
पण जर या दुर्गंधीचे कारणच नष्ट करायचे असेल तर त्यासाठी बडीशेप हा चांगला पर्याय आहे.
बडीशेपेमध्ये ऍन्टी बॅक्टेरीयल गुणधर्म असतात.
यामुळे तोंडात होणारी जीवाणूंची वाढ थांबवली जाते व तोंडाची दुर्गंधी कमी व्हायला मदत होते.
बडीशेपेमुळे तोंडातील लाळेच्या ग्रंथी सक्रीय होतात.
तोंडात लाळेचे प्रमाण वाढल्याने सुद्धा तोंडातील जीवाणू बाहेर पडायला मदत होते.
या दोन्ही करणांमुळे तोंडाची दुर्गधी घालवण्यासाठी बडीशेप हा एक प्रभावी उपाय आहे.
जेवणानंतर किंवा कधीही जर तोंडाला दुर्गंधी येत आहे असे जाणवले तर चिमुट-दोन चिमुट बडीशेप चाऊन खाल्ल्याने तोंडाची दुर्गधी जाते.
यासाठी तुम्ही थोडी बडीशेप एका लहानशा डबीत भरून कायम तुमच्या सोबत बाळगू शकता.
२. पचनक्रिया सुधारते
बडीशेप चावून खाल्ल्याने लाळ ग्रंथी सक्रीय होऊन लाळ तयार व्हायचे प्रमाण वाढते.
आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन हे तोंडातील लाळेमुळे तोंडातच सर्वप्रथम सुरु होते.
लाळेचे प्रमाण वाढल्याने अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होते.
बडीशेपेत असणारी ऍनीथाॅल, फेनकाॅन आणि इस्त्रागोल या द्रव्यांमुळे पचनाच्या तक्रारी, जसे की कॉन्स्टीपेशन, अपचन यासाठी गुणकारी आहेत.
म्हणूनच जेवणानंतर थोडी थोडी बडीशेप चावून खावी जेणेकरून पचन व्हायला मदत होईल.
जर पचनाच्या काही तक्रारी असतील, पचनाचे त्रास असतील तर त्यासाठी २ कप पाण्यात बडीशेप घालून ते पाणी उकळून प्यावे.
बाजारात तयार मिळणारा बडीशेपेचा अर्क सुद्धा चमचाभर घेतल्याने फायदा होतो.
३. ब्लड प्रेशर आटोक्यात ठेवते
बडीशेपेमध्ये पोटॅशीयम या खनिजाचे प्रमाण जास्त असते.
आपल्या शरीरात सोडियम आणि पोटॅशीयमचा समतोल असणे अतिशय गरजेचे आहे.
शरीरातील सोडीयमचे प्रमाण वाढले तर ब्लड प्रेशर वाढते.
म्हणून हा समतोल राखण्यासाठी पोटॅशीयम जास्त प्रमाणात असणाऱ्या पदार्थांचा समावेश जेवणात केला पाहिजे.
बडीशेपमध्ये नायट्रेट सुद्धा जास्त प्रमणात आढळते.
नायट्रेटचा उपयोग सुद्धा ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो.
जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर दिवसातून दोनदा जेवणानंतर तुम्ही बडीशेप आवर्जून खाल्ली पाहिजे.
४. सर्दीवर गुणकारी
सर्दी, सायनस या त्रासांसाठी बडीशेप अत्यंत औषधी असते.
जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर बडीशेप खाल्ल्याने सायनसमधली सर्दी मोकळी व्हायला मदत होते.
श्वसनसंस्थेच्या इतर त्रासांवर, जसे की अस्थमा, ब्राँकायटीस यावर सुद्धा बडीशेप फायदेशीर आहे.
५. बाळंतपणात दुध वाढवण्यासाठी उपयुक्त
बडीशेपेत असणाऱ्या ऍनीथाॅल या द्रव्यामुळे शरीरात गॅलॅक्टोगोग्स या द्रव्याची निर्मिती होते.
हे द्रव्य बाळंत बाईसाठी अतिशय चांगले असते कारण यामुळे दुधाचे प्रमाण वाढते.
बाळंतपणात दुध वाढावे यासाठी बाळंत बाईला बडीशेप खायला द्यावी.
बडीशेपेचा अर्क किंवा बडीशेपेचे पाणी सुद्धा दिल्याने फायदा होतो.
६. त्वचेच्या आरोग्यासाठी चांगली
बडीशेपेचा अर्क त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो.
बडीशेपेच्या अर्कात जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे त्वचेच्या पेशींचे आरोग्य सुधारते.
त्वचेच्या पेशींवर निर्माण होणारा ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस यामुळे कमी होतो.
यामुळे त्वचेवर सुरकुत्या, फाईन लाईन्स इत्यादी येत नाहीत.
या शिवाय बडीशेपेमध्ये इतर खनिजे सुद्धा मुबलक प्रमाणात आढळतात.
बडीशेपेत पोटॅशीयम, सेलेनीयम, झिंक ही खनिजे जास्त प्रमाणात असतात.
यामुळे शरीरातील हार्मोन्सचा समतोल राखला जातो.
जर शरीरात हार्मोन्सचे प्रमाण कमी जास्त झाले तर त्याचा परिणाम चेहऱ्यावर होतो.
यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे यासारख्या त्रासांना सुरुवात होते.
शरीरातील हार्मोन्सचा समतोल बडीशेपेमुळे राखला जातो. यामुळे त्वचेचे विकार होत नाहीत.
बडीशेपेमुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुद्धा राखली जाते.
यामुळे त्वचेच्या पेशींना योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि त्वचा टवटवीत व्हायला मदत होते.
७. रक्त शुद्ध होते
बडीशेपेत असणाऱ्या तेलामुळे, ज्याला इसेन्शिअल ऑईल म्हणतात, रक्तातून घातक तत्वे बाहेर फेकली जाऊन रक्त शुद्ध होण्यासाठी मदत होते.
८. कॅन्सरचा धोका कमी करते
बडीशेपेमध्ये अँटी कॅन्सर गुणधर्म असतात यामध्ये अँटीऑक्सिडंट्स सुद्धा जास्त प्रमाणात असतात.
हे अँटिऑक्सिडंट्स शरीरात निर्माण होणाऱ्या फ्री रॅडीकल्स नावाच्या धोकादायक माॅलेक्युल्सना आटोक्यात ठेवते.
यामुळे त्वचेच्या पेशींना आरोग्यपूर्ण ठेवण्याचे काम बडीशेप करत असते.
बडीशेपेच्या या गुणधर्मांमुळे शरीरातल्या पेशी निरोगी राहतात आणि त्यामुळे कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कमी होतो.
९. डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली
बडीशेपेत व्हिटामिन ‘ए’ भरपूर प्रमाणात आढळतात.
व्हिटामिन ‘ए’ हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय गरजेचे असते.
यामुळे डोळ्यांचे विकार दूर होतात. डोळ्यांच्या निरोगीपणासाठी नियमितपणे बडीशेप खावी.
१०. वजन कमी करण्यास फायदेशीर
बडीशेपेमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.
जर तुम्हाला दोन जेवणांच्या मध्ये खूप जास्त भूक लागत असेल तर फायबरमुळे अशी भूक लागण्याचे प्रमाण कमी होते.
यामुळे जास्तीच्या कॅलरी पोटात जात नाहीत.
दोन वेळेच्या चौरस आहारानंतर जर थोडी बडीशेप खल्ली तर त्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होऊ शकतो.
बडीशेप किंचित भाजून, सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाण्याबरोबर घेतल्याने सुद्धा वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.
मित्रमैत्रिणींनो, खरेतर जेवण झाल्यावर अगदी कमी प्रमाणात खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे पण त्याचे आपल्या आरोग्यासाठी फायदे थक्क करणारे आहेत.
यामध्ये असणाऱ्या व्हिटामिन, खनिजे या सगळ्याचा आपल्या आरोग्यासाठी फायदा होतो.
जर तुम्ही जेवणानंतर बडीशेप खात नसाल तर हे फायदे वाचल्यानंतर तुम्हाला बडीशेपेचे महत्व पटले असेल.
बडीशेपेला स्वतःची एक चव आणि वास असतो त्यामुळे ती खायला चांगली लागतेच,
पण जर तुम्हाला आवडत नसेल तर बडीशेप मोहरीच्या डाळी बरोबर किंचित मीठ घालू भाजून घेऊन सुद्धा खायला छान लागते.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.