‘हे २० घरगुती उपाय करा’ आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवा

मंडळी नवीन वर्षाचं स्वागत तर कराच, सोबत स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचाही संकल्प करा.

केवळ डॉक्टरांनी सांगितलेली औषधच आपल्याला आजारांपासून दूर ठेवतात असं नाही, तर काही घरगुती उपायसुद्धा फार औषधोपचार न करता आपल्याला आजारातून मुक्त करून तंदुरूस्त ठेवतात.

चला तर हे घरगुती उपाय कोणते ते पाहू.

१. कमी रक्तदाब असलेल्या लोकांनी तसेच ह्रदयाचे काम सुरळीत ठेवण्यासाठी दररोज डाळिंबाच्या रसाचे जरूर सेवन करावे.

२. तुळशीमधे उत्तम औषधी गुणधर्म असतात. अल्सर, पित्ताचे आजार यापासून दूर राहण्यासाठी जेवणानंतर तुळशीचं पान चघळणं फायदेशीर ठरेल.

३. जेवणानंतर लवंग चघळण्यानेही पित्ताचा त्रास दूर होतो.

४. वाताचा त्रास तसेच पोटाच्या इतर विकारांसाठी सकाळी अनुषापोटी एक लसूण पाकळी पाण्याबरोबर घ्यावी.

५. उन्हाळ्यात रोज एक ग्लास कलिंगडाचा रस प्यायल्याने उष्माघात आणि डोकेदुखीपासून बचाव होतो.

६. Apple a day, keeps doctor away ही म्हण इंग्रजीत आहेच. रोज सकाळी अनुषापोटी एक सफरचंद खाल्ल्यास मायग्रेनचा त्रास कमी होतो.

७. कोरड्या खोकल्यावरचा उत्तम उपाय म्हणजे ६ खजूर बिया, अर्धा लिटर दुधात २५ मिनिटे मंद आचेवर उकळाव्या आणि याचे सेवन दिवसातून तीन वेळा करावे.

८. सर्दी, खोकला, थंडी, ताप यापासून बचाव करण्यासाठी मध आणि आल्याचा रस समप्रमाणात एकत्र करून घ्यावा.

. नाष्टा करण्याआधी उकडलेलं बीट खाल्ल्याने अपचनाच्या त्रासापासून मुक्ती मिळते.

१०. सहा मध्यम आकाराचे कांदे चिरून डब्यात भरायचे.

त्यात चार चमचे मध घालून डब्याचं झाकण घट्ट लावायचं.

तो डबा पाण्यात ठेवून, पाणी मंद आचेवर दोन तास उकळायचं.

डब्यात तयार झालेलं मिश्रण गाळून घ्यायचं आणि दर तीन तासांनी एक चमचा सेवन करायचं. हे औषध सर्दी पडशासाठी उत्तम आहे.

११.  मुरुमं, पुटकुळ्यांमुळे त्रस्त असाल तर किसलेली काकडी चेहरा, मान, गळ्यावर रोज पंधरा मिनिटे लावून ठेवावी.

१२. शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे तीन चार खजूर बिया दूध आणि तुपात घालून रोज खाव्या.

१३. डोळ्याखालची वर्तुळं घालवण्यासाठी एक जादुई उपाय आहे.

दोन ताज्या टोमॅटोचा रस, एक चमचा लिंबाचा रस, चिमूटभर बेसन आणि हळद व्यवस्थित एकत्र करून डोळ्यांभोवती लावायचे.

वीस मिनिटांनी थंड पाण्याने हळूवारपणे धुवावे.

असे आठवड्यात दोन तीन वेळा केल्याने डोळ्याखालची काळी वर्तुळं जाऊन त्वचा तजेलदार होते.

१४. घाशातली खवखव दूर करण्यासाठी गुळण्या करणे हा उत्तम उपाय आहे.

त्यासाठी गरम पाण्यात मीठ आणि हळद समप्रमाणात घेऊन गुळण्या कराव्या.

त्यानंतर अर्धा तास काही खाऊ पिऊ नये. कारण या काळात मीठ आणि हळद घशातल्या जंतूंचा नायनाट करत असतात.

१५. पस झाल्याने कान दुखत असल्यास एक थेंब आल्याचा रस कानात घालावा.

१६. काखेतली दुर्गंध कमी करण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण लावणे हा उत्तम उपाय आहे.

१७. पोटातील वात कमी करण्यासाठी बडीशेप उपयुक्त आहे.

बडीशेप गरम पाण्यात घालून मंद आचेवर उकळून घ्यायची.

हे पाणी गाळून प्यावे.

तसेच बडीशेपेचे पानही चघळता येईल. याशिवाय बडीशेप, वेलदोडा, पुदिना यांची पाने उकळून ते पाणी प्यावे.

१८. लिंबू हे विविध नैसर्गिक गुणांनी उपयुक्त असं औषध आहे.

पोटाचे विशेषतः आतड्याचे विकार, उच्च रक्तदाब, ताणतणाव यापासून दूर राहण्यासाठी रोज गरम पाण्यात लिंबाचा रस घालून प्यावे.

१९. भोवळ येत असल्यास केळ्याच्या मिल्कशेक मधे मध घालून प्यावे.

त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राखता येते.

२०. सर्दीचा खूप त्रास होत असेल तर तुळशीचा रस, आल्याचा रस, मध एकत्र करून प्यावे.

दर तीन तासांनी एक चमचा हे मिश्रण घेतल्याने सर्दी कमी होते.

घरच्या घरी हे उपाय नक्की करून बघा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।