तोंड आल्यामुळे त्रस्त आहात का?? करा हे काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय

आपल्यापैकी बहुतेकांना मसालेदार चमचमीत खायला आवडतं.

पण कधीतरी असं होतं कि ते खात असताना तोंडात एखाद्या बाजूला खाणं अचानक झोंबायला लागतं.

पुढचा घास खाऊ की नको असा प्रश्न पडतो.

असं बहुतेकांना होतं.

त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात.

पण अशा परिस्थितीत आपल्या समोर एखादा आवडता पदार्थ आला, तोंडाला पाणी सुटलं तरी संयमच ठेवावा लागतो.

या लेखात आपण जाणून घेऊ की, असं होण्याची कारणं काय आणि त्यावर घरगुती उपाय काय

A) तोंड येण्याची कारणं :

१. खरतर खूप गरम आणि खूप मसालेदार पदार्थ खाणं हे तोंड येण्याचं मूळ कारण आहे.

२. पोट साफ होत नसेल, पोटात वात धरत असेल तर उष्णता वाढते. त्यामुळे तोंड येऊ शकतं.

३. ज्वर आल्याने शरीरातली उष्णता वाढते. त्यामुळे तोंड येऊन घसाही लाल होतो.

४. दात हिरड्या रोज नीट स्वच्छ न केल्याने तोंडातले जंतू वाढतात आणि तोंड येऊ शकतं.

५. अपचनाचा त्रास असेल तर उष्णता वाढल्याने जिभेवर फोड येऊन ते दुखू शकतात.

त्यामुळे काही खाणंपिणं अवघड होऊन जात.

६. शरिरात बी व्हीटॅमिनची कमतरता असेल तर तोंड येऊ शकतं.

७. शरिरात लोहाची कमतरता असेल तर उष्णता वाढून तोंड येऊ शकतं.

८. तुम्ही सतत मानसिक तणावाखाली असाल तर तोंड येऊ शकतं.

९. दातात अडकलेलं अन्न टुथपिकने काढताना किंवा कडक ब्रशने दात घासताना तोंडात जखम होऊन असा त्रास होऊ शकतो.

B) तोंड आल्यावर काही साधे उपचार जरूर करा :

१. चवळीच पीठ तोंड आलेल्या जागेवर लावावं. असं दिवसातून दोन तीन वेळा केल्याने लवकर आराम मिळतो.

२. कोमट पाण्यात मीठ घालून दिवसातून दोन तीन वेळा गुळण्या केल्याने आराम वाटतो.

३. कडुनिंबाचा अर्क वापरून दात घासल्याने तोंड स्वच्छ राहतं. तसेच कडुनिंबाचा रस तोंड आलेल्या जखमेवर लावावा.

४. बोराच्या पानांचा काढा करून त्याने गुळण्या केल्याने तोंड आलेली जखम लवकर बरी होते.

५. तोंड आलेल्या जखमेवर मध लावल्यामुळे जखम लवकर भरून येते.

६. कोरफडीचा रस तोंड आलेल्या जखमेवर लावावा. त्यामुळे जखम लवकर भरून येते.

७. तोंडातल्या जखमेवर बर्फ लावावा आणि लाळ थुंकून द्यावी. तोंडातली उष्णता कमी होते.

८. चिमूटभर बेकिंग सोड्यात थेंबभर पाणी घालून पेस्ट करावी.

ती जखमेवर लावली तर आराम मिळतो.

९. कोथिंबीर वाटून त्याचा रस तोंडातल्या जखमेवर लावल्याने जखम लवकर भरून येते.

१०. वेलदोड्याची पूड करून त्यात मध मिसळावा.

ते मिश्रण तोंड आलेल्या जखमेवर लावल्याने जखम लवकर भरून येते.

११. एक कप कोमट पाण्यात एक चमचा हळद घालून त्याने गुळण्या कराव्या. तोंडातील जखम लवकर बरी होते.

१२. रात्री झोपताना तोंड आलेल्या जखमेवर थोडे दही लावावे. आराम मिळतो.

१३. उष्णतेमुळे तोंड आलं असल्यास गुळाचं सरबत प्यावं. उष्णता कमी होते.

१४. चमेलीची पानं वाटून त्याचा रस तोंड आलेल्या ठिकाणी लावावा.

१५. पेरूची पानं वाटून त्याचा रस तोंडातल्या जखमेवर लावल्याने जखम बरी होते.

१६. नारळपाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते.

तसेच नारळाचं दूध तोंडातल्या जखमेवर लावल्याने जखम बरी होते.

१७. नारळाचं दूध आणि मध एकत्र करून तोंड आलेल्या ठिकाणी लावायचं.

१८. तुळशीच्या पानांचा रस तोंड आलेल्या ठिकाणी लावावा.

१९. ‘सी’ व्हिटॅमिनची कमतरता असेल तर उष्णता वाढून तोंड येऊ शकतं. यासाठी संत्र्याचा रस जरूर प्यावा.

२०. जंतू वाढल्याने तोंड आलं असल्यास कांदा खावा.

कांद्यात सल्फर असल्याने जंतू नष्ट होतात.

२१. गुलकंद खाल्याने तोंडातील उष्णता कमी होते.

२२. तोंड आल्यावर कात खावा. त्यामुळे जखम लवकर बरी होते

२३. लिंबाचा रस घालून कोमट पाणी रोज प्यावं.

तसेच तोंड आल्यावर कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून गुळण्या कराव्या.

२४. आलुबुखार तोंडात धरून ठेवल्याने जखम बरी होते.

२५. रोज ताक किंवा दही यांचा आहारात समावेश असावा. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.

२६. काळी मिरी आणि बेदाणे एकत्र चावून खाल्ले तर तोंडातील उष्णता कमी होते.

२७. बेदाणे तोंडात ठेवून त्याचा रस चोखल्याने उष्णता कमी होते.

२८. मोहरीच्या तेलाने चूळ भरल्याने दात स्वच्छ होतात आणि तोंडातील जखम बरी होते.

२९. लिंबू, जांभूळ, पडवळ, आंबा यांच्या पानांचा काढा करून त्याने चूळ भरल्याने उष्णता कमी होते.

३०. हिरडा, बेहडा, जावित्री यांचा काढा करून थंड झाल्यावर त्यात मध मिसळून प्यावे. तोंड येणे कमी होते.

३१. एक ग्लास गरम पाण्यात दोन चमचे आल्याचा रस घालून त्याने गुळण्या कराव्या.

३२. ८-१० मनुका आणि काही जांभळाची पाने घेऊन त्याचा काढा करावा. त्याने चूळ भरल्याने तोंडाचे रोग कमी होतात.

३३. भातात थोडं तूप आणि साखर घालून खावे. पोटातील उष्णता कमी होते.

C) तोंड आल्यावर कोणत्या गोष्टी टाळाव्या :

१. सतत तोंड येत असेल तर धूम्रपान, गुटखा या गोष्टी ताबडतोब बंद कराव्यात.

२. तिखट, तेलकट आणि मसालेदार खाणं कमी करावं.

३. अति थंड किंवा अति गरम पदार्थ खाऊ नये.

४. डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स गोळ्या घ्याव्या.

५. दात घासताना हिरड्यांना लागणार नाही असा ब्रश वापरावा.

६. दिवसातून किमान दोन वेळा म्हणजे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना ब्रश करावे.

७. हिरड्यांना सूज आणि तोंडात दुर्गंध असेल तर ताबडतोब उपचार सुरू करावे.

८. ताणतणाव कमी झाल्यानेही तोंड येणं कमी होतं.

९. सतत कॉम्प्युटर समोर बसणं, गरम वातावरणात जाणं टाळावं.

या उपायांमुळे आपला तोंड येण्याचा त्रास नक्कीच कमी होईल. तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपाय करावे.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।