नारळपाणी पिण्याचे आरोग्यासाठी फायदे

नारळाचे पाणी पिणे आपल्याला सर्वांनाच आवडते. नारळाच्या पाण्यामुळे ताजेतवाने वाटते, थकवा दूर होतो.

उन्हाळ्यात नारळाचे पाणी पिण्याची मजा काही औरच.

मुख्य म्हणजे अश्या ह्या मधुर नारळपाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. कोणते ते आपण जाणून घेऊया.

१. पोषणमूल्ये – उंच वाढणाऱ्या झाडावर नारळ वाढतात. नारळ हे शास्त्रीयदृष्ट्या एक फळ मानले जाते.

हिरव्या असणाऱ्या नारळास ‘शहाळे’ (टेंडर coconut ) असे म्हणतात.

ह्याच शहाळ्यात पाणी असते ते नारळपाणी. हे पाणी पिण्यास उपयोगी असते आणि त्यात शरीरास पोषक असणारी अनेक मूल्ये असतात.

हे शहाळे (हिरवा नारळ) जसजसे पिकू लागते तसे त्यातील पाणी कमी होत जाते आणि त्या पाण्यावर पोसून नारळाच्या आतील भाग पक्व होत जातो.

हाच ओला नारळ अथवा ओले खोबरे. शहाळ्यामध्ये पाणी आपोआप नैसर्गिकरीत्या तयार होते आणि त्यात अत्यंत कमी प्रमाणात फॅट असते.

सर्वसाधारणपणे एका शहाळ्यातून एक कपभर नारळपाणी मिळते.

ह्या १ कप (४५ मिलि) पाण्यात ४६ कॅलरी असतात. तसेच ९ ग्राम carbs , ३ ग्राम फायबर, २ ग्राम प्रोटीन, तसेच विटामीन सी, मॅग्नेशीयम, पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियम असते.

अशा प्रकारची पोषणद्रव्ये असल्यामुळे नारळपाणी पिणे आरोगयास हितकारी आहे.

२. डायबीटीस ( मधुमेह) – प्राण्यांवर केलेल्या संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे की नारळपाणी हे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते.

तसेच जास्त काळाकरिता रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.

ह्यावर अधिक संशोधन सुरू आहे, मनुष्यांमध्ये देखील रक्तातील इंसुलिनचे प्रमाण वाढून मधुमेह नियंत्रित करण्याकरता नारळपाणी पिण्याचा फायदा होतो.

३. मूतखडा, किडनी स्टोन – भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ पिणे हे किडणीच्या विकारांवर गुणकारी आहे.

मूतखडा न होण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहेच पण जर नारळपाणी प्यायले तर त्याचे जास्त फायदे आहेत.

कारण नारळपाणी हे असे खडे होण्याचे प्रमाण रोखण्यास तसेच त्यांचा आकार कमी राखण्यास मदत करते. त्यामुळे ते शरीरातून बाहेर टाकले जाण्यास मदत होते.

४. हृदयविकार, कोलेस्ट्रॉल कमी ठेवते – नारळपाणी नियमित पिण्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होते तसेच triglycerides चे प्रमाण देखील कमी होते.

त्यामुळे हृदयविकार होऊ नये हयाकरता नारळपाणी उपयुक्त ठरते.

५. रक्तदाब – नारळपाण्यात असणाऱ्या पोटॅशियम मुळे रक्तदाब रोखण्यास मदत होते.

त्यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णां नी नारळपाण्याचे सेवन जरूर करावे.

६. व्यायामानंतर पिण्याचे पेय – भरपूर व्यायाम केल्यानंतर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते (dehydration) अशा वेळी नारळाचे पाणी पिण्यामुळे शरीरातील सर्व पोष्णमूल्यांची कमतरता भरून निघते व ताजेतवाने वाटते.

म्हणून अनेक व्यायामपटूंचे व्यायामानंतर पिण्याचे आवडीचे पेय हे कोणतेही फॅन्सि पेय नसून सहज उपलब्ध असणारे नारळपाणी हेच आहे.

७. मधुर चव – नारळ पाणी हे अत्यंत मधुर चवीचे असल्यामुळे आबाल वृद्धां मध्ये लोकप्रिय आहे.

तसेच ते नारळाच्या आत असल्यामुळे अत्यंत शुद्ध स्वरूपात सहज उपलब्ध असते. त्यामुळे स्वच्छतेची पूर्ण हमी असते.

८. अँटी ऑक्सिडण्ट्स – नारळाच्या पाण्यात बऱ्याच प्रमाणात अँटी ऑक्सिडण्ट्स असतात त्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ति वाढण्यास मदत होते.

तर हे आहेत नारळाचे पाणी पिण्याचे ८ फायदे. तुम्हीही नियमित नारळपाणी प्या आणि ह्या फायद्यांचा लाभ घ्या.

स्वस्थ रहा. आनंदी रहा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।