‘ऑर्किड फार्मा’ या फार्मा शेअर ने चार महिन्यात १ लाखाचे ७० लाख केले

मित्रांनो, गुंतवणूक म्हंटल तर काय विचार करता बरं तुम्ही?

यात बरेचदा होतं असं की, आपला मराठी माणूस रिस्क घ्यायला जास्त तयार नसतो आणि फक्त सुरक्षित समजल्या जाणाऱ्या गुंतवणूक पर्यायांकडे वळतो.

मित्रांनो, आजचा हा लेख शेअर मार्केट या गुंतवणुकीच्या पर्यायकडे दुर्लक्ष करून आपण चांगली संधी घालवतो का? याचा एकदा विचार करायला लावण्यासाठी आहे.

कोविडच्या काळात कित्येक जणांचे आर्थिक नुकसान झाले. पण याच कोविडच्या काळात शेअर मार्केटने मात्र खूप चांगल्या प्रमाणात रिटर्न्स दिले. एकाच नाही तर कित्येक स्टॉक्सने भरघोस परतावे दिले.

आणि दुसरीकडे नोकरी गेली, पगार कपात झाली, धंदा बुडाला या विवंचनेत कित्येक लोक परिस्थितीला दोष देत राहिले.

बिटकॉईन मध्ये अवाढव्य रिटर्न्स मिळतात. हे आपण ऐकतो आणि तो एक ऐकून सोडून देण्याचा विषय म्हणूनच आपण त्याकडे बघतो.

पण फार्मा स्टॉक असलेल्या ‘ऑर्किड फार्मा’ ने मात्र बिटकॉईन ला सुद्धा मागे टाकले आहे.

विश्वास बसणार नाही पण केवळ चार महिन्यांत या शेअरने चक्क 6900% टक्के इतके रिटर्न्स दिलेले आहेत.

3 नोव्हेंबर 2020 ला 18 रुपयांच्या भावाने close झालेल्या या स्टॉकची आजची किंमत रुपये 1400 पेक्षाही जास्त झालेली आहे.

म्हणजे 3 नोव्हेंबर 2020 जर या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते आज 70 लाखांपेक्षाही जास्त झाले असते. या काळात बिटकॉईनने सुद्धा 203 टक्केच रिटर्न्स दिलेले आहेत.

ऑर्किड फार्मा कम्पनीच्या शेअरचे भाव कधी वाढू लागले.

या कम्पनीचे दिवाळे घोषित केले गेल्या नंतर नॅशनल कम्पनी लॉ ट्रिब्युनल च्या रिजोल्युशन प्लॅन नुसार धनुका लॅब ने ऑर्किड फार्माला टेक ओव्हर करून 3 नोव्हेंबर 2020 ला स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्ट केले. आणि तेव्हापासून या शेअरचे भाव वाढतच जात आहे.

परंतु यात लक्षात घेण्याचा मुद्दा हा आहे की, यात 98.4 टक्के हिस्सा हा धनुका लॅबचाच आहे. आणि रिटेल इन्व्हेस्टर्स कडे फक्त 0.5% शेअर्सच आहेत.

या शेअर चे भाव जरी प्रमोटर्स ने वाढवले असे म्हणण्याला वाव असला तरी, फक्त ऑर्किड फार्मचा नाही पण इतरही Stocks ने कोरोना काळात सुद्धा भरपूर चांगला परतावा दिलेला आहे. अशा संधी हातातून जाऊ नये म्हणून आपणही गुंतवणुकीच्या या पर्यायाचा विचार करायला काहीच हरकत नाही. हो पण यात काही अभ्यास आणि पेशन्स असण्याची मात्र गरज आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।