श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ आज सांगलीसह राज्यभरात सन्मान महामोर्चाचे आयोजित करण्यात आले आहेत. कोरेगाव-भीमा दंगलीत सहभागाबद्दल संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र संभाजी भिडे यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही असा दावा करत शिवप्रतिष्ठानने सांगलीसह राज्यभरात सन्मान मोर्चाचे आयोजन केले… गेल्या काही दिवसांत गोव्यात झालेले आंदोलन, मुबई मध्ये
नाशकातून धडक जाऊन पोहोचलेला शेतकरी मोर्चा… एक नाही दोन नाही आणखी कित्येक…
सगळं बदलत चाललं, माणसातील सैतान जागा होत चालाय श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे आणि गरीब आणखी गरीब होत आहे. गरिबांना भकास करणाऱ्या विकासाला विकास म्हणणे जीवावर येते आहे. श्रीमंत माणूस श्रीमंती साठी आणि राजकारणी खुर्ची साठी त्याचा वापर करू लागला आहे आंदोलन, मोर्च्या या मध्ये हाल नेहमी हातवार पोट असलेल्याचे होत आहेत. डोकी त्याची फुटत आहेत, कधी पहिले का बड्या धेंडांचे डोके मोर्च्यात फुटल्याचे?जिथे सागराची शांतता उपभोगायला लोक येतात, जिथे स्वप्न पूर्ण करण्याऱ्या मायावी नगरीत येऊन स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतात, अश्या नगरीत जेव्हा माणसाचे लोंढे शत्रूसारखे एकमेकांच्या जीवावर उठतात तेव्हा जीवाचा गोवा असो व जीवाची मुंबई तेही करायला भीती वाटते.
मोर्च्यांचे स्वरूप बदलत चालते आहे. विरोधाभास आढळून येतात. या वर्षात जणू मोर्चांचा पाऊसच पडला. मोर्च्या कसा असावा याचा आदर्श म्हणजे मराठा क्रांती मोर्च्या आणि शेतकरी मोर्च्या. ना कुठला गाजावाजा न कुठली तोडफोड तरीही या मोर्चांनी आपले म्हणणे प्रभावीपणे मांडले. एवढ्या मोठ्या संख्येने लोक सहभागी होऊन सुद्धा कोणतीही बेशिस्त नव्हती. कुठेही सामाजिक मालमत्तेची हानी झाली नव्हती.. आपण कुठल्या कारणासाठी मोर्च्या काढत आहोत, ते कारण प्रभावी पणे कसे मांडता येईल हे जेव्हा आधीच स्पष्ट असते तेव्हा अशा प्रकारे मोर्चे निघतात आणि यशस्वी होतात. वास्तविक लोकशाहीत कोणालाच मोर्च्या काढवा लागू नये पण मोर्च्या काढायचा असला तर तो या वरील दोन्ही मोर्च्यांसारखा असावा या दोन मोर्च्यां शिवाय निघालेल्या मोर्च्यांना हिसक वळण लागलं भीमा-कोरे गाव दंगलीचा निषेध करण्यासाठी निघालेला मोर्च्या हिंसक झाला. हेतू योग्य असला तरी जे घडलं त्याला योग्य म्हणता येणार नाही अन्याय झाला हे सांगण्यासाठी अन्याय करणं हे कधीही उचित नाही. ते सुद्धा संविधानिक व्यवस्था उपलब्ध असताना.
आपलं उपद्रव मूल्य सिद्ध करण्यासाठी समाजाला, जनतेला वेठीस धरणे हा हेतू असेल तर मोर्च्यात दंगल जाळपोळ होतेच. गोव्यातील खाणी अचानक बंद झाल्याने येथील खाणकामगारांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. हाच खाणकामगारांचा प्रश्न धसास लावण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्च्यामध्ये रुग्णवाहिका अडविली जाते, वैद्यकीय रिपोर्ट घेऊन जाणाऱ्यास मारहाण केली जाते. व्यवस्था बिघडू नये म्हणून असलेल्या पोलिसवाहनाची, अग्निशमन दलाच्या वाहनाची तोडफोडकेली जाते, गुंडगिरीचे जाहीर प्रदर्शन होते.
खाणकामगारांनी मोर्च्या काढला तो हे करण्यासाठी की आपल्यावर अन्याय झाला हे सर्वांच्या निदर्शनास आणण्यासाठी. दंगल, जाळपोळ झाली नाही तर आपल्या मागण्या मान्य होणार नाही ही मानसिकता समाजासाठी प्रचंड घातक आहे… सरळ मोर्च्याला हिसंक बनवणारी. मोर्च्या आणि तरुण याचा जवळचा संबध आहे. सळसळत्या रक्ताला जरा जरी चुकीचा मार्ग दाखवला गेला तर ते खदखदून वाहू लागत, त्यातून मग विद्रोह जन्म घेतो. रक्तपात ही होतो. यात दोष कुणाचा भडकलेल्या माथ्याचा,फुटलेल्या माथ्याचा कि भडकवणाऱ्या माथ्याचा.
माथी भडकावयाला संवेदनशील मुद्दे फार उपयुक्त आहेत. ते भडकवलं कि झालं काम. संवेदनशील विषयावर निघणाऱ्या मोर्च्यांना हिंसक वळण लागल्याचे दिसून येते. एक आदर्शवत मोर्च्या काढून जर आपल्या मागण्या प्रभावी पणे मांडायच्या असतील तर, त्या विषयाचा पूर्ण अभ्यास करणे, त्याची मांडणी करणे मोर्च्याची अथ् पासून इतिपर्यत आखणी करणे स्वंयसेवक तयार करणे, कुठल्याही प्रकारे जनतेल याचा त्रास होणार नाही, सामाजिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याचा सखोल विचार करणे आवश्यक आहे. जेव्हा मोर्च्याला दिशा देणारे गुंड प्रवृत्तीचे असतात समाज भान नसणारे असतात तेव्हा लोकांना त्रास देणे मारबडव करणे शिव्या देणे हे असभ्य प्रकार घडतात. आणि याचा नेमका उलट परिणाम होतो. उदाहरणच द्यायचं झालं तर या गोव्याच्या खाणकामगारांविषयी लोकांच्या मनात असलेली सहानुभूती नाहीशी झाली. सरकारच्या धोरणाविरोधात जे जनमत तयार झाल पाहिजे होते, ते जनमत उलट असा मोर्च्या काढण्याविरुद्धच तयार झालं. आणि हा मोर्चा ‘विफळ सम्पूर्ण’ झाला!!
वाचण्यासारखे आणखी काही…..
लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मी!…
पायाने आकाशाला गवसणी घालणारी जेसिका
उत्कृष्टतेचा ध्यास
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.