जाणून घ्या दोडक्याचे ५ आरोग्यदायी गुणधर्म

मराठीत ज्याला आपण दोडके म्हणतो त्याला हिंदीमध्ये तोरी/ तोरई आणि इंग्लिश मध्ये Ridged Gourd म्हणतात.

दोडक्याची भाजी म्हटली की आपल्यापैकी बहुतेक सगळे जण नाक मुरडतात. परंतु दोडका किती गुणकारी आहे हे समजले की आपण नियमितपणे दोडका खाऊ हे मात्र नक्की. चला तर मग आज आपण दोडक्याचे गुणधर्म जाणून घेऊया.

दोडका ही भाजी खरंतर भारतात सर्वत्र मुबलक प्रमाणात आढळते. पण ही भाजी मुळची सपक चवीची असल्यामुळे ती फारशी लोकप्रिय नाही.

चव वाढवण्याकरता बरेचसे मसाले वापरून ही भाजी केली जाते. परंतु चवदार नसली तरी ही भाजी वजन कमी करायला, डोळ्यांचं आरोग्य सुधारायला आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवायला खूप उपयोगी पडते.

आशिया खंडात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी हि वेल साधारण ९ मी. उंचीपर्यंत वाढते. झाडाला पिवळ्या रंगाची फुले लागतात व त्यानंतर हिरव्या रंगाचे, लांबट आकाराचे दोडके येतात, जे भाजी म्हणून वापरले जातात.

दोडके बाहेरून हिरवे तर आतून पांढऱ्या रंगाचे असते. आतला भाग मऊ असतो. बाहेरच्या बाजूने त्यावर रेषा असतात, त्या सोलून त्याचाही स्वयंपाकात उपयोग केला जातो.

दोडक्यामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूट्रीअंटस् असतात. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, विटामीन ए, विटामीन सी, आयर्न, मॅग्नीशियम, विटामीन बी ६ आणि पाणी मोठ्या प्रमाणात असते.

दोडक्यामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात तसेच कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील अतिशय कमी असते. भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असणारे दोडके पचनास हलके आणि भरपूर पोषण देणारे असते.

आता फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात दोडके खाल्ले जाते ते त्याच्या ह्या गुणधर्मामुळेच. आज आपण हे सगळे गुणधर्म सविस्तर जाणून घेऊया…

१. डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

दोडक्यामध्ये भरपूर प्रमाणात बिटा कॅरेटीन आणि विटामीन ए असल्यामुळे दृष्टी सुधारण्यासाठी तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी दोडका अतिशय गुणकारी आहे.

उतारवयात होणारा दृष्टिदोष होऊ नये म्हणून आधीपासून नियमितपणे दोडका आहारात असावा.

२. ऍनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता ह्यावर गुणकारी 

दोडक्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असल्यामुळे दोडका हा ऍनिमियावर अत्यंत गुणकारी आहे. तसेच दोडक्यामध्ये विटामीन बी-६ असल्यामुळे शरीरातील तांबड्या रक्त पेशींचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील सर्व अवयवांपर्यन्त रक्तपुरवठा होण्यास खूप मदत होते.

३. वजन कमी करण्यासाठी उपयोगी 

दोडक्यामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात. तसेच त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटस् आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील अतिशय कमी असते.

त्यामुळे दोडका शरीरातील प्रोटीन, कार्बस् आणि फॅटचे विघटन करण्यास मदत करतो. तसेच जास्त प्रमाणात मेद शरीरात साठून राहू देत नाही. पचनास मदत करतो. ह्याशिवाय रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो. ह्या सर्व गुणधर्मांमुळे दोडक्याचे नियमित सेवन वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

४. बद्धकोष्ठते वर गुणकारी 

दोडक्यामध्ये वॉटर कंटेंट म्हणजेच पाणी मोठ्या प्रमाणात असते. तसेच दोडक्याच्या आतील पांढरा भाग सेल्युलोजने बनलेला असतो.

सेल्युलोज हा एक फायबरचा प्रकार आहे ज्यामुळे पचनास मदत होते. म्हणून दोडक्याची भाजी अथवा दोडका घालून केलेली आमटी नेहेमी आहारात ठेवली की पचनाच्या समस्या कमी होतात. कॉनस्टीपेशन होत नाही. दोडक्याचा रस चमचाभर मध घालून घेतला असता अपचनाच्या समस्येवर त्वरित आराम मिळतो.

५. यकृत म्हणजेच लिवरचे कार्य सुधारते 

दोडक्यामध्ये रक्तशुद्धीचे गुणधर्म देखील आहेत. टॉक्सिन्स्, ऑक्सिडंट्स, अल्कोहोल, न पचलेले अन्न ह्यामुळे शरीरात निर्माण होणारी अशुद्धी दूर करून रक्त शुद्ध करण्यासाठी दोडक्याचे नियमित सेवन मोठा हातभार लावू शकते.

त्यामुळे लिवरचे कार्य सुधारते तसेच शरीरात होणारा पित्तरसाचा स्त्राव नियंत्रणात राहतो. ह्या गुणधर्मामुळे दोडका काविळीवर अत्यंत गुणकारी आहे.

तर हे आहेत दोडक्याचे आरोग्यदायी असे ५ गुणधर्म. दिसायला फारशी चांगली नसली आणि सपक चवीची असली तरी ही भाजी अतिशय गुणकारी आहे हे आता आपल्या लक्षात आले आहेच.

तर आपण सर्वांनी ह्या भाजीचे नियमित सेवन करुया आणि तिच्या गुणधर्मांचा जास्तीत जास्त लाभ घेऊया.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।