डोके सतत खाजवते का? जाणून घ्या कारणे 

“ई, ती बघ सारखं डोकं खाजवतेय तिचं!” किंवा “अरे तो बघ, त्याचा हात थोड्या थोड्या वेळाने डोक्याकडे जातोच डोकं खाजवायला”…..

अशी चिडवणारी वाक्यं कानावर पडली की अगदी कानकोंडल्यासारखं होतं ना…… कुठे तोंड लपवावं कळत नाही…. पण डोक्यात येणारी खाज अस्वस्थ करत असते आणि डोके खाजवल्याशिवाय चैन पडत नाही अशी अवस्था होते.

मित्र मैत्रिणींनो, असा अनुभव तुम्हाला आला आहे का?

आज आपण डोके का खाजवते ह्याची कारणे जाणून घेऊया

बहुतेक वेळा डोके खाजवण्याचे प्रमुख कारण केस स्वच्छ नसणे, डोक्यात कोंडा झालेला असणे, उवा असणे हे असते.

खूप जास्त चिंता, स्ट्रेस हे देखील एक कारण असू शकते.

एखाद्या औषधाचा साइड इफेक्ट म्हणून सुद्धा डोक्यात खाज सुटते. परंतु ते तात्पुरत्या स्वरूपाचे असते.

डोके खाजवण्याची ही किंवा ह्यापेक्षा गंभीर कारणे असू शकतात. आज आपण ती कारणे विस्ताराने जाणून घेऊया.

परंतु त्याआधी डोके खाजवते म्हणजे नक्की काय काय होते, कोणती लक्षणे दिसून येतात ते जाणून घेऊया.

डोके खाजवण्याची लक्षणे 

वारंवार डोक्यात खाज सुटणे ह्याव्यतिरिक्त आणखीही काही लक्षणे दिसून येतात ती खालीलप्रमाणे

१. डोक्यात गोल चकत्या तयार होणे.

२. डोक्याची त्वचा अतिशय कोरडी पडणे.

३. डोक्यात आणि शरीरावर लालसर चट्टे आणि रॅशेस

४. त्वचेवर जखमा दिसणे

५. अंगावर सूज येणे

६. बारिक ताप येणे

ही सर्व लक्षणे दिसत असतील तर डोके खाजण्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरी इलाज करणे आवश्यक आहे.

डोके खाजवण्याची विविध कारणे 

१. कोंडा 

डोक्यात खाज येण्याचे हे सर्वात कॉमन कारण आहे. जर डोक्यात मोठ्या प्रमाणावर कोंडा झाला असेल तर डोके वारंवार खाजवले जाते. ह्यावर उत्तम अँटी डॅन्डरफ शॅम्पू वापरणे, केस वारंवार धुवून स्वच्छ ठेवणे, तसेच केसांना नियमित तेल लावणे असे साधे उपाय करुन मात करता येते.

२. एक्झिमा 

स्काल्प म्हणजेच डोक्याची त्वचा कोरडी पडून त्याचे पापुद्रे निघत असतील तर ते एक्झिमाचे लक्षण आहे. हा त्रास नवजात बालके आणि लहान मुले ह्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो.

डॉक्टरांच्या सल्ल्याने क्रीम लावून आणि स्टिरॉईड औषधे लावून ह्यावर उपाय करता येतो. परंतु हे उपचार स्वतःच्या मनाने करू नयेत. तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.

३. गजकर्ण किंवा नायटा (रिंगवर्म)

गजकर्ण त्वचेवर कुठेही होऊन ते पसरत जाते. असे ते डोक्यापर्यंत पसरत जाऊन केसांच्या मुळांशी पोचते आणि डोक्यात खाज यायला सुरुवात होते. तसेच हलका ताप येणे, केस गळणे अशी लक्षणे देखील दिसतात. हा आजार संसर्गजन्य असून एकमेकांच्या वस्तु वापरुन सहज पसरू शकतो. त्वचारोगतज्ञांकडून ह्यावर औषध घेणे आवश्यक आहे.

गजकर्ण (Ringworm ) खरूज आणि नायटा होण्याची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय

४. उवा 

ऊ हा एक अगदी बारिक किडा असून तो केसात लपून बसतो. उवा डोक्याला चावून आपले रक्त पितात आणि त्यांच्या केसातील हालचालीमुळे आपल्या डोक्याला खाज सुटते.

डोक्यात उवा असणाऱ्याशी संपर्क आला की इतरांच्या डोक्यात देखील उवा होतात. एकदा डोक्यात उवा झाल्या की त्यांची संख्या भराभर वाढते. लहान मुलांमध्ये ही समस्या जास्त आढळून येते.

ह्यावर बारिक फणीने केस विंचरणे, उवा मारणारे औषध किंवा शॅम्पू वापरणे असे उपाय करता येतात. तसेच डोक्यात उवा असणाऱ्या व्यक्तीच्या निकट जाणे टाळणे हा देखील एक उपाय आहे.

५. स्काल्प प्रुरिटस 

ह्या आजारामध्ये डोक्यात आणि शरीराच्या त्वचेवर निरनिराळे चट्टे किंवा गाठी येणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे शरीराला आणि डोक्यात खाज येऊ शकते. काही वेळा अशा गाठी (लिजन्स) पटकन दिसून येत नाहीत, त्यामुळे ह्यावर त्वचारोगतज्ञांकडून योग्य निदान करून उपचार करून घेणे अतिशय आवश्यक आहे.

६. स्काल्प सोरायसिस 

सोरायसिस देखील एक प्रकारचा त्वचारोग आहे ज्यामुळे केसांमध्ये खाज येऊ शकते. हा रोग शरीरावर अथवा डोक्यात होऊ शकतो आणि भराभर पसरतो. ह्यावर त्वचारोगतज्ञांकडून उपचार करून घेणे अतिशय आवश्यक आहे.

तर ही आहेत डोक्यात खाज येण्याची काही साधी तर काही गंभीर कारणे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।