प्रत्येक जोडप्याला त्यांचं मूल हे सुदृढ सुसंस्कारित, हुशार, बुद्धिमान असावं असं वाटतं.
एखादं मूल कसं घडतं?
तर त्याच्या आसपासचं वातावरण जसं असेल, आई वडिलांचा स्वभाव, आई-वडिलांचे संस्कार कसे असतील यावर त्या मुलाचा व्यक्तिमत्व निश्चित होतं.
भारतीय प्राचीन शास्त्रानुसार असे काही नियम निश्चित केले आहेत, ज्यामुळे होणारं मूल हे सर्व गुणसंपन्नष यशस्वी, उत्तम जन्माला येऊ शकतं.
गरुड पुराणानुसार उत्तम संततीसाठी गर्भधारणेची वेळ कशी निश्चित करावी याबद्दल काही माहिती पुढे वाचा.
१) पती पत्नी दोघांचीही मनापासून संमती असावी.
मुल होण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघेही मनापासून तयार असले पाहिजेत.
मनाविरुद्ध झालेली गर्भधारणा ही होणाऱ्या मुलावर नक्कीच वाईट परिणाम करू शकते.
होणा-या आई-बाबांचं शारीरिक आरोग्य सुद्धा उत्तम असावं.
मासिक पाळीच्या वेळी संबंध ठेवल्यामुळे जर गर्भधारणा झाली तर होणारी संतती रोगी आणि अल्पायुषी ठरू शकते.
२) गर्भधारणेसाठी योग्य दिवस.
स्त्रीच्या मासिक पाळी नंतर ८वा, ९वा आणि १०वा दिवस गर्भधारणेसाठी उत्तम मानले जातात.
या काळात जर गर्भधारणा झाली तर होणारं मूल दीर्घायुषी, हुशार आणि सुदृढ होतं असा उल्लेख गरुड पुराणात आहे.
मासिक पाळीनंतरच्या १२व्या, १४व्या-१५व्या आणि १६व्या दिवशीचा कल सुद्धा गर्भधारणेसाठी उत्तम काळ मानला जातो.
या दिवशी गर्भधारणा झाली तर होणाऱं मुल पालकांचं नाव उज्वल करतात.
३) गर्भधारणे साठी उत्तम मानली जाणारी नक्षत्रं
रोहिणी, पुष्य, मृग, उत्तराषाढा, हस्त, चित्रा, उत्तरा फाल्गुनी, पुनर्वसू, शततारका, उत्तराभाद्रपदा, श्रवण, धनिष्ठा, अनुराधा आणि स्वाती नक्षत्रं ही गर्भधारणेसाठी उत्तम नक्षत्रं मानली जातात..
गर्भधारणेच्या वेळी पती-पत्नीचा चंद्र प्रबळ असावा असंही हिंदू धर्मशास्त्रानुसार मानलं जातं.
तर सूर्य, मंगळ, गुरु मंगल स्थानी असावेत. त्याचा संतती वरती चांगला प्रभाव पडतो.
गर्भधारणेची इच्छा मनात ठेवताना पती-पत्नी दोघांच्याही मनामध्ये सकारात्मक विचार हवेत.
कारण गर्भ उदरात रुजत असताना जशी आई-वडिलांची भावना असते तसेच गुण मुलांच्या मनामध्ये रूजतात.
तर प्राचीन शास्त्रानुसार गर्भधारणेसाठी ही काही ठराविक उत्तम वेळ नमूद केलेली आहे.
यातून जन्मणारी संतती ही बुद्धिमान, दीर्घायुषी, सुदृढ असते.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.