रात्री झोपण्याआधी केळी खाण्यामुळे होणारे फायदे

तुम्हाला रात्री शांत झोप लागत नाही का? रात्री तुम्ही टक्क जागे असता का? रात्रीच्या वेळी पायात पेटके येण्याचा त्रास तुम्हाला होतो का? असे असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे.

रात्री झोपताना केळ खाण्याचे फायदे

झोपण्याआधी एक केळ खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याला नेमका कसा फायदा होतो ते जाणून घ्या. रात्रीची शांत झोप लागण्यासाठी झोपण्याआधी एक केळ खाण्याचा खूप उपयोग होतो.  कसा ते जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

झोपण्याआधी भूक लागली असताना खाण्यासाठी केळ हा एक अतिशय योग्य पदार्थ आहे.  कसा ते आज आपण जाणून घेऊया.

भारतात सगळीकडे अगदी सहज उपलब्ध असणारे आणि सगळ्या लोकांना सहजपणे परवडेल असे फळ म्हणजे केळी.  केळे  हे फळ  अगदी सहजपणे उपलब्ध असणारे,  खाण्यास सोपे,  चविष्ट आणि पोटभरीचे असते.

केळे अतिशय पौष्टिक असून त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम, विटामिन सी, विटामिन बी ६  आणि फायबर असते.

नियमित केळी खाण्यामुळे  अंगावरील सूज कमी होण्यास मदत होते,  शरीरातील पांढऱ्या पेशी वाढण्यास मदत होते आणि पर्यायाने त्याचा वजन कमी होण्यास उपयोग होतो.

केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असल्यामुळे  कॅन्सर सारख्या आजारांपासून बचाव होण्यासाठी नियमित केळी खाण्याचा उपयोग होतो.

केळी खाण्याचे हे सर्व फायदे तर सर्वांना माहीत आहेतच परंतु आपल्याला हे माहीत नव्हते की केळी खाण्याचा शांत झोप लागण्यासाठी देखील उपयोग होऊ शकतो.  झोपण्याआधी एक केळ खाल्ल्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते कारण केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन  आणि मिनरल्स असतात त्यामुळे  शरीराची पोषणाची गरज पूर्ण होते तसेच  मानसिक दृष्ट्या असणारा ताणतणाव, anxiety आणि स्ट्रेस कमी होण्यास मदत होते.  केळ्यामध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे  मसल cramps  होण्याचे प्रमाण देखील कमी होते  आणि झोप लागणे आणि जाग येणे यांच्या वेळा नियमित होण्यासाठी देखील मदत होते.

झोपताना केळ खाण्यामुळे एवढे सगळे फायदे कसे होतात हे आपण सविस्तर जाणून घेऊया. 

१.  स्नायूंमध्ये पेटके  येण्याचे प्रमाण कमी होते. (muscle cramps)

रात्रीच्या वेळी स्नायूंमध्ये पेटके येण्याचे प्रमुख कारण शरीरातील पोटॅशियमची कमतरता हे असते.  अशा पेटके येण्यामुळे रात्रीची झोप डिस्टर्ब होते.  असे होण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये विशेषतः गरोदर स्त्रियांमध्ये जास्त आढळून येते.  केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असल्यामुळे जर झोपण्याआधी एक केळ खाल्ले तर स्नायूंमध्ये पेटके येण्याचे प्रमाण खूप कमी होते.  आणि शांत झोप लागण्यास मदत होते.

२.  ताणतणाव आणि चिंता कमी करण्यास मदत होते. (स्ट्रेस आणि anxiety  कमी होते)

आजकालच्या धावपळीच्या जगात कामाच्या स्वरूपामुळे आपण सतत ताणतणाव आणि चिंतेत असतो.  असा ताण आणि चिंता कमी करण्यासाठी आहारात मॅग्नेशियमचा अंतर्भाव करण्यास सांगितले जाते. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असल्यामुळे झोपण्याआधी जर एक केळ खाल्ले तर मानसिक दृष्ट्या स्वस्थता लाभून शांत झोप लागण्यास मदत होते.

३.  निद्रानाश कमी होतो. (insomnia)

निद्रानाशाचा त्रास असलेल्या व्यक्तींना रात्र रात्र झोप येत नाही.  अशावेळी रक्तातील मॅग्नेशियम या मिनरलचे प्रमाण जर योग्य प्रकारे वाढले  तर झोप येण्यास नक्कीच मदत होते.  अशावेळी झोपण्याआधी एक केळ खाणे अतिशय फायदेशीर ठरते.  मॅग्नेशियमच्या गोळ्या घेण्यापेक्षा केळ खाणे हे केव्हाही अतिशय फायदेशीर आणि  स्वस्त देखील आहे.

४. सेरेटोनिन  आणि मेलॅटोनिन  या  द्रव्यांचे रक्तातील प्रमाण वाढते. 

शांत झोप लागण्यासाठी रक्तातील सेरेटोनिन आणि मेलॅटोनिन या द्रव्यांचे प्रमाण योग्य असणे अतिशय आवश्यक आहे.  या द्रव्यांचे शरीरातील प्रमाण योग्य असेल तर दररोज ठराविक वेळी गाढ व शांत झोप लागणे  आणि ठरलेल्या वेळी जाग येऊन उत्साही आणि ताजेतवाने वाटणे  असे घडते.  दररोज रात्री एक  केळ खाऊन झोपल्यास  या  दोन्ही द्रव्यांचे शरीरातील प्रमाण वाढवून शांत झोप लागण्यास मदत होते.

५.  रक्तदाब कमी होण्यास मदत होते. (ब्लड प्रेशर)

नियमित केळे खाल्ल्यामुळे  शरीरातील रक्तदाब कमी होण्यास मदत होते.  रक्तातील जास्त प्रमाणात असणाऱ्या सोडियमचे शरीरावर होणारे दुष्परिणाम कमी करून पोटॅशियमचे फायदे शरीराला मिळवून देण्यासाठी  याचा उपयोग होतो.  असे  करण्यामुळे रक्तदाब नियंत्रणात  येण्यास मदत होते.

तर अशा पद्धतीने  झोपण्याआधी एक केळ खाण्याचा  फायदा होताना दिसतो.

रात्री झोपण्याआधी काय टाळावे?

रात्रीच्या वेळी आपली झोप डिस्टर्ब होऊ नये आणि  रात्री शांत झोप लागावी यासाठी झोपण्याआधी किमान चार तास कोणतेही कॅफीन युक्त पेय जसे की चहा किंवा कॉफी घेऊ नये.  त्याचप्रमाणे झोपण्याआधी खूप जास्त प्रमाणात पाणी देखील पिऊ नये. थोडेसे पाणी प्यावे.  झोपण्याआधी  केळ किंवा तत्सम  साधेसे पदार्थ खाणे फायदेशीर असते परंतु  झोपण्याआधी पचण्यास जड असणारे आणि  तेलकट पदार्थ खाणे टाळावे.  रात्रीचा आहार हलका असावा. पोटाला तड लागेपर्यंत जेवू नये.

आज आपण पाहिले की  झोपण्याआधी एक केळ खाण्यामुळे शरीराला विविध प्रकारचे फायदे होऊन शांत झोप लागण्यास मदत होते.  हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.  तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख शेअर करायला विसरू नका.

केळी आपल्यासाठी जशी पौष्टिक असते तसेच बागकामातही सुपीक माती तयार करण्यासाठी केळ्याच्या सालीचा उपयोग करता येतो, कसे ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।