या दिवाळीत डिजिटल माध्यमातून सोनेखरेदी करण्याचे पर्याय

“सोना कितना सोना है…” डिजिटल भारतामध्ये सोने खरेदीनेही आधुनिक रूप धारण केले आहे. सोनं जवळ बाळगण्याचा धोका पत्करण्यापेक्षा डिजिटल माध्यमातून सोनेखरेदी नेहमीच लाभदायक ठरते. या दिवाळीला कपडे, गॅजेट्स, इत्यादीच्या ‘ऑनलाईन शॉपिंग’ सोबत सोन्याची खरेदीही ‘डिजिटल’ करता येणं सहज शक्य आहे. या आधुनिक पद्धती नक्की कुठल्या आहेत? त्याचे फायदे/ तोटे काय आहेत?

सोने खरेदीच्या आधुनिक पद्धती:

१. ईटीएफ गोल्ड (ETF Gold): गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक हा सोने खरेदीचा आधुनिक पर्याय आहे. यामध्ये ग्राहक स्टॉक एक्सचेंजमधून सोने खरेदी करू शकतात. यासाठी डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते उघडणे आवश्यक आहे. या गोल्ड ईटीएफच्या खरेदी आणि विक्रीसाठी ग्राहकांना ब्रोकरेज फी (सामान्यतः ०.२५% ते ०.५% दरम्यान) भरावी लागते. तसेच फंड व्यवस्थापन शुल्कासाठी ०.५ ते १% शुल्क भरावे लागते.

२. ई-गोल्ड: राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (एनएसईएल) द्वारे डिमटेरियलाइज्ड स्वरूपात सोन्याची खरेदी करू शकता. ई-गोल्ड अल्प प्रमाणात विकत घेतले जाऊ शकते आणि त्यानंतर ते नंतरच्या सोन्याच्या किमतींमध्ये विकले जाऊ शकते किंवा ते सोन्यामध्ये रुपांतरित केले जाऊ शकते. तसेच, सोन्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे ‘एनएसईएलची’ असल्यामुळे ई-गोल्डचा ग्राहक अगदी निश्चित राहू शकतो. सोने गुंतवणुकीचा हा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग आहे.

३. गोल्ड फंड: गोल्ड फंड हा एक असा फंड आहे जो ग्राहकाच्या वतीने गोल्ड ईटीएफमध्ये (Gold ETF ) गुंतवणूक करतो. गोल्ड फंडमध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया इतर म्युच्युअल फंड योजनांप्रमाणेच आहे. कमी प्रमाणात खरेदी असल्यास गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय चांगला आहे. तर अधिक प्रमाणात खरेदी करत असल्यास गोल्ड ईटीएफ हा पर्याय योग्य ठरेल कारण यामध्ये ग्राहक आपल्या शेअर ब्रोकरला ‘ब्रोकरेज शुल्क (फि)’ कमी करण्याची विनंती करू शकतो.

४. इक्विटी आधारित गोल्ड फंडः यामध्ये थेट सोनं खरेदी न करता सोनेखाण (Gold Mining companies) आणि विपणन (मार्केटिंग) यांच्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. इतर योजनांपेक्षा ही योजना थोडी वेगळी आहे. इथे सोन्यामधील गुंतवणूक ही सोन्याच्या किमतीवरून ठरत नाही. हे फंड ‘इक्विटी-आधारित फंड’ असल्यामुळे या गुंतवणुकीमध्ये ‘इक्विटी जोखीम (Equity Risk)’ आहे. सोन्याशी संबंधित भारतामध्ये एकही सूचीबद्ध (लिस्टेड) कंपनी नाही. म्हणूनच, यासंबंधित सारे व्यवहार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केले जातात.

५. सोव्हरीन गोल्ड बॉंड्स (एसजीबी): हे बॉण्ड्स वेळोवेळी सरकारकडून इशू केले जातात. याची किंमत सोन्याच्या किमतीवर ठरते. या बॉण्ड्सची खरेदी विक्री दुय्यम बाजारातदेखील (Secondary Market) केली जाते. सोने जवळ बाळगण्याची जोखीम पत्करण्यापेक्षा हे बॉण्ड्स खरेदी करणं जास्त सुरक्षित आहे. तसेच यावर व्याजदेखील मिळते.

६. पे टीएम डिजिटल गोल्ड: हा सोने खरेदीचा आधुनिक पर्याय आहे. पेटीएमचे ग्राहक पेटीएमच्या अॅप्स / वेबसाइटद्वारे अगदी एक रुपयांपासून ‘डिजिटल सोने’ खरेदी करू शकतात. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. ग्राहकांनी खरेदी केलेले सोने ‘डिजिटल पद्धतीने स्टोअर करून ठेवले जाते. खरेदीच्या वेळी सोन्याचा जो दर असेल (कर आणि इतर खर्चासहित) त्या दराने ग्राहकांना सोने खरेदी करता येते. यामध्ये ग्राहक भविष्यात हे सोने कॅशमध्ये किंवा सोन्याच्या नाण्यांमध्ये रुपांतरित (Redeem) करू शकतात. जर ग्राहकाने कॅशैवजी सोन्याच्या नाण्यांचा पर्याय निवडला तर त्यासाठी लागणारी घडवणावळ (Making Chrges) आणि वितरण शुल्क ग्राहकाला भरावे लागेल.

‘सोनं जवळ बाळगणे’ हे सध्याच्या काळात जोखमीचे काम आहे. त्यामुळे आपली सोन्यामधील गुंतवणूक सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने या आधुनिक पर्यायांना ग्राहक हळूहळू पसंती देऊ लागले असले तरीही या आधुनिक पर्यायांची माहिती नसणे, त्याबद्दलचे समज- गैरसमज यासारख्या अनेक कारणांमुळे हे पर्याय तसे दुर्लक्षित केले जात आहेत.

ज्वेलर्समार्फत राबवण्यात येणाऱ्या भिशी योजना:

आधुनिक आणि पारंपरिक पर्यायांचा संगम असणाऱ्या विविध ‘भिशी योजना’ अनेक ज्वेलर्समार्फत राबवण्यात येतात. अगदी नामांकित ज्वेलर्सच्या दुकानांमध्येही भिशी योजना राबवली जाते. या योजनेमध्ये कमीतकमी ५००/- रुपये प्रतिमाह पासून पुढे कितीही रकमेचा पर्याय उपलब्ध असतो. साधारणतः भिशी एका वर्षांकरिता असते. यामध्ये ११ महिन्यांचे पैसे ग्राहकाकडून घेऊन उर्वरित एका महिन्याचे पैसे ज्वेलरमार्फत भरले जातात. जमा रकमेएवढे दागिने, गोल्ड बार अथवा सोन्याची नाणी खरेदी करता येतात. काही मोठ्या ज्वेलर्सनी ऑनलाईन भिशी योजनाही सुरु केली आहे. तसंच महिन्याला ठराविक रकम भरण्याऐवजी ऐवजी सुरवातीला निश्चित रक्कम भरून (साधारणतः ही रक्कम १००/- रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असते) नंतर कितीही रक्कम (रु. १००/- च्या पटीत) भरून सुरु ठेवता येणारी भिशी योजनाही अनेक जेवलर्सनी सुरु केली आहे. प्रत्येक योजनेचे नियम, अटी व लाभ हे वेगवेगळे आहेत.

दिवाळीची शुभखरेदी किंवा गुंतवणूक म्हणून अमेझॉन वर २४ कॅरेट सोन्याची नाणी आणि बिस्कीट किंवा ठश्यांचे विविध पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. यावर बँकेकडून दिली जाणारी सूट तसेच इतरही काही चांगल्या ऑफर सोन्याच्या शुद्धतेसह आहेत. १ ग्राम (रु. ३३८४/-) पासून पुढे हे उपलब्ध आहे.  उपलब्ध पर्याय बघण्यासाठी येथे क्लिक करा.

सौजन्य : www.arthasakshar.com

वाचण्यासारखे आणखी काही…

शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक
शेअर-बाजार : वेळ साधणे (timing) नव्हे, वेळ देणे (time) महत्वाचे


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।