परस्पर निधी अर्थात म्यूचुअल फंड हा एक चलनवाढीवर मात करून आकर्षक परतावा मिळवून देऊ शकणारा गुंतवणूक प्रकार असून यामध्ये अनेक प्रकारच्या योजना आहेत.
आपण त्या काय आहेत हे जाणून घेऊ या. त्याचे गुंतवणूक कालावधीवरून दोन, गुंतवणूक साधनावरून चार, तर उत्पन्न विभागणीवरून दोन असे प्रमुख प्रकार आहेत.
यामध्ये फंडाचे पुरस्कर्ते जनतेकडून अथवा उद्योगाकडून विशिष्ठ ध्येय्य डोळ्यासमोर ठेवून निधी गोळा करतात.
तज्ञ गुंतवणूक व्यवस्थापकाचे मार्गदर्शनाखाली फंडाच्या उद्देशानुसार गुंतवणूक करून मिळालेला फायदा गुंतवणूकदरात वाटला जातो अथवा त्याची पुनर्गुंतवणूक केली जाते.
गुंतवणूक व्यवस्थापनासाठी फी आकारली जाते आणि ती फंडाच्या वर्गणीतून गुंतवणूकदारांकडून घेतली जाते. AMFI (The Association of Mutual Fund in India) या त्यांच्या संघटनेकडून उचित व्यापारी प्रथेचे पालन आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळेल असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
फंडातील गुंतवणूक ही समभाग, कर्जरोखे, अल्प/ दीर्घ मुदतीची कर्जे इ. भांडवलबाजाराशी संबधीत साधनांत केली जात असल्याने यावर सेबी (Securities and Exchange Board of India) या नियामकाचे अंतिम नियंत्रण आहे.
सर्वसामान्य गुंतवणूकदारास भांडवल बाजारात गुंतवणूक करताना काही मर्यादा येतात. म्यूचुअल फंडाकडे अनेक गुंतवणूकदरांकडून एकत्रित रक्कम जमा होत असल्याने आणि एका विशिष्ठ ध्येय्याने आणि मार्गदर्शनाने कामकाज करीत असल्याचा लाभ त्याला होतो.
म्यूचुअल फंडाचे भांडवलबाजारातील गुंतवणुकीचे मूल्यास एकूण वितरित केलेल्या यूनिट्सच्या संख्येने भागल्यास त्याचे नगद मूल्य (NAV) मिळते.
जेव्हा एखादी नवीन योजना बाजारात विक्रीसाठी येते तेव्हा त्याचे मूल्य त्याच्या दर्शनी मूल्याएवढे असते आणि त्यांनी केलेल्या गुंतवणूकीतील भावाचे चढउतारानुसार त्यात वट घट होते.
प्राथमिक विक्री योजना बंद झाल्यावर NAV प्रमाणे त्याची खरेदी विक्री मान्यताप्राप्त शेअर दलाल अभिकर्ते यांचेमार्फत अथवा फंडहाउसकडून थेट होऊ शकते.
योजनेतून बाहेर पाडण्याच्या कालावधीनुसार त्यावर अधिभार द्यावा लागतो, तो गुंतवणूक कालावधीनुसार कमी कमी व नंतर शून्य होतो.
खरेदी अथवा विक्री यासाठी कामकाजाचे दिवसाची दुपारचे तीन ही महत्वाची वेळ आहे. यापूर्वीची खरेदी विक्री त्याच दिवशीचे NAV प्रमाणे होते तर त्यानंतरची खरेदीविक्री कामकाजाचे पुढील दिवसाचे NAV प्रमाणे होते.
गुंतवणूक कालावधी वरून म्यूचुअल फंडचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.
निरंतर (Open Ended): यामध्ये आपणास कधीही गुंतवणूक करता येते आणि कधीही काढून घेता येते.
मुदतबंद (Close Ended): यामधे प्राथमिक विक्रीचेवेळी यूनिट खरेदी करता येतात आणि ठराविक मुदतीनंतर यूनिटचे विमोचन (Redeem) अथवा सदर यूनिट आपोआपच निरंतर योजनेमधे वर्ग केले जातात.
म्यूचुअल फंडाचे ते प्रामुख्याने करीत असलेल्या गुंतवणूक साधनांवरून चार प्रकार पडतात
Equity Mutual Fund : नावाप्रमाणे या फंडाची गुंतवणूक प्रामुख्याने समभागात केली जाते त्यामुळे या गुंतवणूकीतून अधिक आणि आकर्षक परतावा मिळू शकतो. समभाग वर्गवारीनुसार लार्ज /मिड /स्मॉल/इनफ्रास्ट्रक्चर/ डायवर्सीफाईड/ सेक्टरल/ इंडेक्स फंड असे याचे उपप्रकार आहेत. या शिवाय करबचतीसाठी ई. एल. एस. एस. ही योजना आहे.
Debt Mutual Fund : या फंडातील गुंतवणूक ही कर्जरोख्यात असते त्यामुळे यातून मिळणारा परतावा तुलनेने कमी त्याचप्रमाणे धोकाही कमी असतो. रोख्याचे कालावधीवरून याचे लॉन्ग /शॉर्ट टर्म डेट फंड असे उपप्रकार आहेत.
Hybrid Fund: यामधे इक्विटि व डेट यांचा समतोल साधण्यात येतो. अनेक गुंतवणूकदाराना कर्जरोख्यांची सुरक्षितता व समभागाचा आकर्षक परतावा या दोन्ही गोष्टी हव्या असतात. त्याचप्रमाणे अनेकांना विशेषत: सेवानिवृत्त लोकाना दरमहा ठराविक रक्कमेची गरज असते परंतु जोखिम घेण्याची तयारी नसते. या योजना बॅलन्स फंड अथवा मासिक उत्पन्न फंड योजना या नावाने विकल्या जातात.
Money Market Mutual Fund : यामधील सर्व गुंतवणूक अल्प/दीर्घ मुदतीच्या कर्जात केली जाते तुलनेत सर्वात सुरक्षित असा हा फंड प्रकार असून उच्च उत्पन्नधारक आणि भरपुर गंगाजळी असलेल्या कंपन्या यामधे गुंतवणूक करतात.
म्यूचुअल फंडाचे उत्पन्न विभागणी वरून दोन प्रकार पडतात.
Divident : यामध्ये ठराविक कालावधीनंतर उत्पन्नाचे वाटप लाभांश रूपाने केले जाते तो धारकास दिला जातो अथवा जर त्याने या रकमेचे यूनिट घेण्याचा पर्याय दिला असल्यास तेवढे यूनिट घेतले जातात.
Growth : यामधे उत्पन्नाची वाटणी केली जात नाही सातत्याने फायदेशीर पुनर्गुतवणूक केली जात असल्याने दीर्घकाळात एन. ए. व्ही. वाढत असल्याने आकर्षक लाभ होतो.
आयकरात लाभ देणाऱ्या समभागसलग्न करबचत योजना (ELSS) आहेत. यामधे डीवीडेंड व ग्रॉथ हे पर्याय असून हे यूनिट तीन वर्ष विकता येत नाहीत तसेच लाभांश रकमेचे युनिट घेता येत नाहीत.
त्याचप्रमाणे सर्वसाधारण गुंतवणूकदारास ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या न्यायाने गुंतवणूकीस वाढ करण्यासाठी एस आई पी हा पर्याय उपलब्ध आहे यामध्ये दररोज /आठवड्यास /पंधरवड्यास /मासिक /त्रीमासीक गुंतवणूक करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.
यामुळे गुंतवणूकीत आवर्ती वाढ आणि बाजारातील चढ उतार यामुळे सरासरीचा फायदा मिळू शकतो.
अनेक फंड योजना व त्यांचे पुरस्कर्ते यामुळे अधिकाधिक आकर्षक आणि गुंतवणूकदाराच्या विविध आपेक्षा पूर्ण करणाऱ्या कल्पक योजना बाजारात आणत आहेत व येत आहेत.
आपल्याकडील पैसे,परताव्याची आपेक्षा, जोखिम घेण्याची तयारी आणि गरजा पूर्ण करणारी योजना निवडावी. यातील जोखिम तीव्रता सहजपणे सर्वांना समजावी म्हणून सेबीने सर्व जुन्यायोजनांचे अर्ज माहितीपत्रक जाहिराती यामधे अर्धवर्तूळाकृती धोकामापक टाकणे सक्तीचे केले असून यातील धोका हा पाच प्रकारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाढत जातो.
त्याचे खाली त्या धोकामापकाची माहिती देणे सक्तीचे केले आहे. यातील ज्या योजना समभागावर किंवा ज्या योजनातील ६५% गुंतवणूक समभागात आहे अशा योजनेतील गुंतवणूकीवर आयकर कायद्यान्वये असलेल्या अल्प व दीर्घ मूदतीच्या भांडवली नफ्यास उपलब्ध असलेल्या तरतुदी लागू होतात त्यामुळे बऱ्यापैकी करही वाचू शकतो.
तरी याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. www.moneycontrol.com तसेच www.valueresearchonline.com या संकेतस्थळांवर विविध योजना त्यांचा परतावा त्यांचे कामगिरीनुसार क्रमवारी यांची माहिती उपलब्ध आहे तिचा लाभ घ्यावा. गुंतवणूक योजनेचा सातत्याने आढावा घेऊन त्यात आवश्यक बदल करावेत.
आपल्या उत्पन्नातील काही भाग हा किमान दोन एस. आई. पी. मध्ये विभागून टाकावा जेणेकरून एक एस आई पी दीर्घ मुदतीचे ध्येय आणि दूसरी एस आई पी सेवानिवृत्तीनंतर उपयोगी पडू शकेल.
म्यूचुअल फंडाप्रमाणेच ETF हा एक गुंतवणूक प्रकार असून याचे व्यवहार फक्त शेअर मार्केट मध्येच होतात यामध्ये तो ETF ज्या निर्देशांकाचे प्रतिनिधित्व करतो त्यांतील शेयर्सचे प्रमाणानुसार गुंतवणूक केली जात असल्याने मार्केटमध्ये ज्याप्रमाणे चढ उतार होत असतील, त्याचप्रमाणे मागणी आणि पुरवठा या तत्वानुसार त्याचे कीमतीत (रिअल टाइम) फरक पडत असतो. मार्केट खाली असल्यास खरेदी करून आणि वाढल्यावर ETF विकून फायदा मिळवणे शक्य आहे.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Very Good,
Finan. Portfolio suggestions Required for Short And long term
Mutual fund ची खुप छान माहिती सांगितली आहे. या व्यतिरिक्त अधिक माहिती असेल तर कृपया आणखी काही लेख पाठवा.
धन्यवाद.
khup chhan mahiti.. mala mutual fund che je vegvele prakar ahet jase ki balance fund,fund of fund, asset allocation, balance advantage asha sarv prakaranchi sakhol mahiti havi ahe..shakya aslyas krupaya hi mahiti dyavi.
dhanyawad