तब्बेत कशी सुधारायची, सुंदर कसं दिसायचं, यशस्वी कसं व्हायचं हे सगळे विचार आपण करतो पण स्मरणशक्ती कशी वाढेल याचा विचार मात्र आपण करत नाही.
विचार करत नाही म्हणण्यापेक्षा ती आपल्याला अशक्य कोटीची गोष्ट वाटते… तो भाइयों और बेहेनों 😍 ये भी कोई इम्पॉसिबल बात नाहीं……
स्मरण शक्ती म्हणजे तुमच्या मेंदूचं एक महत्वाचं डिपार्टमेंट आहे. तिथं जर अगदी जोशात काम चालत असेल तर एखाद्या वेळी तुमच्याकडून अचूक आणि पटकन उत्तर दिलं जातं.
ह्याचाच अर्थ तुमची स्मरण शक्ती उत्तम आहे. तुम्ही केलेला अभ्यास तुमच्या चांगला लक्षात राहतो. हीच ती तल्लख बुद्धिमत्ता…
जी आपल्याला सगळ्यांपेक्षा वेगळ्या स्थानावर बसवते. उगाच नाही अशा तल्लख बुद्धी असलेल्या व्यक्तीला जिनिअस म्हणत..!!
खूप काळापर्यंत तुमच्या लक्षात राहणं म्हणजे जास्त काळापर्यंत वापरली जाणारी तुमची स्मरण शक्ती. आणि अगदी तात्पुरतं लक्षात राहणारी स्मरण शक्ती म्हणजे थोड्या वेळच वापरली जाणारी स्मरण शक्ती. असे दोन प्रकार आपल्याला करता येतील.
तात्पुरती वापरली जाणारी स्मरण शक्ती म्हणजे थोड्या वेळाने एखादी गोष्ट आपण विसरून जातो. ती गोष्ट तेवढी महत्वाची नसते म्हणून ती आपण विसरतो.
पण एखाद्या विद्यार्थ्यांसाठी विषयाचा अभ्यास, किंवा कलाकारासाठी एखाद्या नाटकाचं पाठांतर करून ते लक्षात ठेवणं जरुरीचं असतं. म्हणून ते जास्त काळ लक्षात रहावं म्हणून ते आपण परत परत वाचून ठेवतो.
आणि परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्याला किंवा नाटक असेल तर त्या कलाकाराला स्टेजवर बरोबर त्या त्या वेळी ते आठवते.
चांगली स्मरण शक्ती असेल तर हे चांगले आठवणीत राहते असं आपण म्हणू शकतो. कार्यक्षम मेंदूचं हे डिपार्टमेंट असं काम करतं.
स्मरण शक्ती कमी म्हणजे ‘अकार्यक्षम सरकारी ऑफिस मधलं एखादं डिपार्टमेंट जसं काम करतं तसं.’ उत्तर अचूक आणि पटकन मिळेल याची खात्री नसते. म्हणजे मेंदूचं ते डिपार्टमेंट चांगलं काम करत नाही??
पटतंय का?
स्मरणशक्ती कमी असते किंवा कमी होते त्याची बरीच कारणं असतील. पण इथं आपल्याला कमी असलेली, किंवा कमी झालेली स्मरण शक्ती कशी वाढवायला पाहिजे ह्याचा विचार करायचाय.
चांगल्या संशोधनातून ह्या सात गोष्टी समोर आल्यात. त्या आपली स्मरण शक्ती वाढवायला कशी मदत करतात ते आपण बघू.
आपल्या शरीरात कोणत्याही गोष्टीची कमतरता निर्माण झाली की आपल्या शरीरावर त्याचे परिणाम दिसायला लागतात.
मग आपण, हे व्हिटॅमिन घे… ते व्हिटॅमिन घे असं करून आपलं शरीर तंदरुस्त करतो. तसंच आपला मेंदू पण ह्या परिणामांना बळी पडू शकतो.
हे आपण कधी लक्षातच घेत नाही हो. मग ह्या मेंदूला सुधारायला काय करायला पाहिजे ह्याचा पण आपण कधी विचार करत नाही.
कारण ते आपल्याला सहज कळत नाही. बऱ्याच गोष्टी आपण विसरून जायला लागल्यावर कळायला लागतं, की आपण सारखं सारखं विसरून जातोय.
तरी सुद्धा मेंदूला चांगलं कार्यरत ठेवणं हे आपल्या नोकरी, व्यवसायात इतकंच काय कुठल्याही कामात यशस्वी होण्यासाठी, आपली छाप उमटवण्यासाठी महत्त्वाचं ठरतं.
तब्बेत कशी सुधारायची, सुंदर कसं दिसायचं, यशस्वी कसं व्हायचं हे सगळे विचार आपण करतो पण स्मरणशक्ती कशी वाढेल याचा विचार मात्र आपण करत नाही.
विचार करत नाही म्हणण्यापेक्षा ती आपल्याला अशक्य कोटीची गोष्ट वाटते.
तो भाइयों और बेहेनों 😍 ये भी कोई इम्पॉसिबल बात नाहीं……
मग बघा आता तुमची स्मरण शक्ती तुम्हाला खरंच वाढवायची असेल तर ह्या घ्या भन्नाट अशा सात टिप्स…
१) पहिली टिप म्हणजे… आपण दिवसभरात जे काही खातो त्याचा आपल्या मेंदूला काही उपयोग आहे का ते बघायला पाहिजे ना?
तुमच्या जेवणात रोज हिरव्या भाज्या, पालेभाज्या असतात का? काही लोक जेवणात त्यांना आवडतात त्याच भाज्या घेतात. म्हणजे बटाटा, बटाट्याची भाजी असल्याशिवाय काहीजण जेवत नाहीत.
काही लोक रोज नॉनव्हेजच खाणारे आहेत. अशा एकाच पदार्थचं सेवन जर रोज केलं गेलं तर सगळी पोषक तत्व आपल्या शरीराला कशी मिळणार?
मेंदूचं कार्य चांगलं चालायला पाहिजे तर रोज जेवणात हिरव्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत.
त्यानं तुमची मेंदूची ताकद वाढून स्मरण शक्ती वाढायला मदत होईल. जे ह्या भाज्या खात नाहीत त्यांचं स्मरण शक्ती चं डिपार्टमेंट चांगलं काम करू शकत नाही हे लक्षातच ठेवा.
पालेभाज्या घरात आवडत नाहीत असं काही होत असेल तर वेगवेगळी थालीपीठ करून, सूप करून पालेभाज्या या जेवणात आल्याच पाहिजेत याची काळजी घ्या.
त्यानंतर मेंदूला फायदा देणारी काही फळं आहेत ती आपण खायला पाहिजेत. ‘स्ट्रॉबेरी’ हे फळ आपल्याकडे मुबलक प्रमाणात मिळतं.
आठवड्यातून दोन तरी स्ट्रॉबेरी आपल्या खाण्यात आल्या पाहिजेत. अशा लोकांना स्मरण शक्ती कमी होंण्याची भीतीच राहणार नाही असं मेंदूच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे.
ओमेगा- ३ चरबीयुक्त मासे खाणे हे आपल्या स्मरणशक्ती च्या वाढी साठी खूप उपयुक्त ठरतात. ह्या चरबी युक्त माशांच्यामध्ये ओमेगा-३ ऍसिड असतं ते स्मरण शक्ती वाढीचं काम करते म्हणून ह्या माशांचं सेवन करणं जरुरीचं आहे.
रावस (Solman) किंवा कॉड (Cod) मासे खाणे सुद्धा फायदेशीर ठरतं. तुम्ही म्हणाल आता जे लोक मासे खात नाहीत त्यांचं काय??? त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने बाजारात ओमेगा ३ च्या सप्लिमेंट्स, गोळ्या मिळतात त्याचा वापर ते करू शकतात.
२) दुसरी टिप म्हणजे…. व्यायाम.
सगळ्या आजारांवर मात करणारा हमखास उपाय म्हणजे नियमित केला गेलेला व्यायाम.
व्यायामाने संपूर्ण शरीर ताकदवान बनतं. संपूर्ण शरीराला ऑक्सिजन चा पुरवठा होतो. शरीराचं रक्ताभिसरण सुधारतं, स्नायू बलवान होतात. मेंदू चांगलं कार्य करतो.
आणि स्मरण शक्ती आपोआप वाढायला लागते. ब्रिटिश कोलंबिया युनिव्हर्सिटी ने शोध लावलाय की एरोबिक्स नावाचा व्यायाम प्रकार केला तर स्मरण शक्तीत चांगली वाढ होते.
३) तिसरी टिप म्हणजे… मेंदूला चालना देणारे बोर्ड गेम्स
मेंदूला चालना देणारे बोर्ड गेम्स रोज थोड्यावेळ खेळा. बुद्धिबळ, कॅरम, लुडो सारखे बैठे पण मेंदू कार्यरत राहील असे खेळ. मेंदूला विचारांचा खुराक मिळेल आणि तुमची स्मरण शक्ती पण सुधारेल.
४) चौथी टिप… ब्रेन ट्रेनिंग ऍप्स
आजच्या इंटरनेट युगात इंटरनेटवर सहज उपलब्ध असलेली ‘ब्रेन ट्रेनिंग ऍप्स’ वापरून मेंदूची कार्यशक्ती जोरदार वाढवता येईल. आणि जोमाने कार्य करणारा मेंदू स्मरण कार्य पण अतिशय चांगलं करायला लागेल. मेंदूचं हे ट्रेनिंग आजकाल सगळीकडे उपलब्ध झालंय. आपल्याला त्याचा फायदा करून घ्यायचाय.
५) पाचवी टिप… मनाच्या आरोग्यासाठी ध्यान. (मेडिटेशन)
आपल्या मनात असंख्य विचार दिवसभर येत असतात. त्यातल्या नकारात्मक विचारांनी आपल्या मनाचा ताण वाढतो.
हा ताण कमी झाला पाहिजे, तो कमी झाला नाही तर आपलं मानसिक आरोग्य बिघडतं. मेंदूला थकवा येतो.
स्मरण शक्ती कमी होते. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी रोज सकाळी मेडिटेशन करून आपला मनावरचा ताण कमी होतो.
सकारात्मक विचार केले जातात. मेंदूवरचा ताण कमी होतो आणि स्मरण शक्ती वाढते.
६) सहावी टिप म्हणजे… रोज रात्री ८ तास झोप घेणे…..
बरेच लोक मोठी चूक करतात, ती म्हणजे रात्रीची झोप कमी घेतात. अहो रोज झोपायला रात्री ११ अन १२ वाजवतात.
टी. व्ही. बघणे, गप्पा मारणे, ह्यात रोज “अर्धी” रात्र वाया घालवतात. त्यामुळे झोप कमी मिळते. मग दिवसभर जांभया देत बसतात.
पण त्याचा परिणाम फक्त शरीरवरच होतो असं नाही, तर तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं, समस्या सोडवण्याची तुमची शक्ती कमी कमी होत जाते.
निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. मेंदूची कार्यक्षमताच कमी होते, आणि तुमच्या स्मरण शक्तीवर परिणाम होतो. म्हणून रोज रात्री लवकर झोपून ८ तासाची झोप पूर्ण करायलाच पाहिजे. त्यासाठी झोपण्याची ठराविक वेळ असली पाहिजे.
चांगली आणि शांत झोप झाली की सकाळी कसं ताज तवानं वाटतं. झोप कमी झाली तर सकाळी उठवत नाही. शरीर जड होतं. शरीराच्या हलचाली झटपट होत नाही. आळस येतो. मग काय? मेंदू झोपलेला असेल तर स्मरण शक्ती पण झोपणार.
म्हणजेच ||एकमेकां साह्य करू, अवघे झोपू निवांत|| 😴 😴
७) सातवी टिप म्हणजे…. मेंदूला भरपूर ट्रेनिंग
तुमच्या मेंदूला तुम्ही भरपूर ट्रेनिंग दिलं तर तुम्हाला काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकायला पाहिजेत, कारण तुम्ही अनेक गोष्टीत अगदी ‘मास्टर’ झाला असाल तर मेंदूला आणखी काहीतरी नवीन खुराक द्यायला लागतो.
कारण मास्टर झाल्यावर नवीन काहीतरी पाहिजे असतं, नाहीतर मेंदू सुस्त होऊन जाईल ना… म्हणून तुम्ही काहीतरी नवीन छंद शोधून काढा.
नवीन भाषा शिकायचा छंद किंवा एखादं वाद्य वाजवणं, किंवा आणखी कोणतातरी तुम्हाला आवडेल असा छंद शोधून त्यात तुमच्या मनाला गुंतवायचं, म्हणजे नवीन गोष्ट शिकायला तुमचा मेंदू आणखी काम करायला लागेल, आणि स्मरण शक्ती सुद्धा आपोआप वाढायला लागेल.
मेंदूला खुराक दिला की त्याची ताकत वाढते आणि स्मरण शक्ती डिपार्टमेंट जोरात काम करायला लागतं एवढंच लक्षात ठेवा. खुराक द्या आणि स्मरण शक्ती वाढवा.
किती सोपं आहे हे. चला मग… फक्त सात गोष्टी तर करायच्यात. त्यात तुमचाच फायदा होणार आहे. आता विसरायचं नाहीच.
तुम्हाला कोणी आता म्हणायला नको… विसरला का? किंवा काय विसरभोळा आहे..
आणि हो मनाचेtalks चे आगामी डोक्याला 🧠खुराक देणारे नवीन लेख वाचायलाही विसरू नका बरं का….
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Good