ऑगस्ट ते नोव्हेंबर च्या काळात मुबलक प्रमाणात मिळणारे, सीताफळ ज्याला आवडत नाही असं माणूस सापडणं तसं विरळच…
सीताफळ नुसतं चवीसाठीच उजवं असतं असं नाही, तर हे सीताफळ आरोग्यासाठी सुद्धा खूप गुणकारी असते.
आपल्याकडे जुने लोक नेहमी सिझनल फळं खाण्याचा सल्ला देतात…
यामागे बरीच करणं असतात. जसं सिझनल फळं ही त्या त्या विशिष्ट वेळी झाडांवर तयार झालेली किंवा पक्व झालेली असतात त्यामुळे त्यावर प्रक्रिया केलेली नसते, ती त्या-त्या विशिष्ट वातावरणाला पूरक असतात वगैरे…
आता लवकरच ही सीताफळ बाजारात मुबलक प्रमाणात मिळायला सुरुवात होईल, सीताफळ खाण्याचे फायदे काय?
वाचा या लेखात…
फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढवणं, डोळ्याचं तसेच हृदयाचं आरोग्य वाढवण्यासाठी सीताफळ गुणकारी आहे.
तसेच सीताफळाचा उपयोग कफ दोषाला नियंत्रणात ठेवण्यासाठी, शरीरात रक्ताचे प्रमाण वाढण्यासाठी होतो.
१) सीताफळ मूड बुस्ट करणारं फळ आहे.
सिताफळात व्हिटॅमिन B6 (Pyridoxine) चांगल्या प्रमाणात असते.
व्हिटॅमिन् B6 हे सेरीटोनिन, डोपामाईन सारख्या मूड बदलणाऱ्या न्यूरॉट्रान्समीटर्सना शरीरात वाढवते…
B6 च्या आभावाने डिप्रेशन, मूड डिसऑर्डर, समरणशक्तीचा नाश संभवतो.
सिताफळात असलेली मिनरल्स सुद्धा शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी गरजेचे आहेत..
२) कॅन्सर आणि हृद्यरोगाच्या आजारात फायदेशीर
सिताफळात मुबलक प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असल्याने कॅन्सर, हृदयरोग यासारख्या आजारात सीताफळाचे सेवन करणे फायदेशीर असते…
सीताफळाच्या गराबरोबरच त्याची साल सुद्धा अँटीऑक्सिडंट्स ने परिपूर्ण असते.
सिताफळात असलेले कॅरोटेनॉईड हे अँटीऑक्सिडंट्स डोळ्याच्या आरोग्यासाठी सुद्धा हितकारी असते…
३) ब्लड प्रेशर म्हणजे रक्त दाब नियंत्रणात ठेवण्यास गुणकारी.
सिताफळात असलेले पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखे मिनरल्स रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
त्यामुळे हृदय विकाराचे झटके येण्याचा धोका कमी होऊ शकतो.
४) पाचन क्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त
सिताफळात फायबर चे प्रमाण चांगले असल्याने पाचन क्रिया सुधारण्यासाठी सीताफळ चांगले आहे.
५) केस आणि त्वचेसाठी फायदेशीर
सीताफळात व्हिटॅमिन ‘सी’ आणि अँटिऑक्सिडण्ट्स भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेला चमकदार आणि मुलायम करणारे गुण सीताफळात असतात. सीताफळाच्या नियमित सेवनाने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
याशिवाय सीताफळाचे इतरही कित्येक फायदे आहेत, ते खाली बघा.
- दम्याच्या रुग्णांसाठी सीताफळ गुणकारी असते.
- रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सीताफळ गुणकारी असते.
- ऍनिमिया मध्ये सीताफळाचे सेवन फायदेशीर ठरते
- गर्भावस्थेत सीताफळ खाणे चांगले ठरते
https://manachetalks.com/11121/benefits-of-curry-leaves-marathi/
https://manachetalks.com/10938/how-to-keep-good-mindset-marathi-motivational-aarticle-manachetalks/
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.