नकली बेसन पिठापासून सावधान, कशी ओळखायची बेसन पिठातील भेसळ?

बेसन हा भारतातील घराघरात वापरला जाणारा पदार्थ आहे. कोणाला बेसनाचे लाडू आवडतात तर कोणाला गरमागरम भजी.

दररोजच्या स्वयंपाकात बेसनाचा काहिनाकाही वापर नक्कीच होतो.

हल्लीच्या धावपळीच्या जमान्यात चण्याची डाळ दळून आणून बेसन करणे शक्य होत नाही. त्यामुळे गृहिणी तयार बेसन आणणे पसंत करतात.

परंतु हल्ली शुद्ध बेसन मिळणे कठीण झाले आहे. नफेखोरीसाठी त्यात काही न काही भेसळ केलेली असते.

अशा भेसळयुक्त बेसनामुळे ग्राहकांची फसवणूक तर होतेच. शिवाय असे बेसन खाऊन तब्येतीची हानी देखील होऊ शकते.

असे भेसळयुक्त बेसन खाण्यामुळे संधीवात, पोटाचे विकार आणि इतरही गंभीर आजार होऊ शकतात.

नक्की कशी करतात भेसळ?

बेसन हे खरेतर चणा डाळीपासून बनवले जाते. परंतु चणा डाळ महाग असल्यामुळे बेसन बनवताना संपूर्ण चणा डाळ न वापरता २५% चणा डाळ वापरून बाकी ७५% पिवळ्या वाटाण्याचे पीठ, रंग लावलेले गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ आणि इतर भुकटी वापरली जाते.

असे रंग मिसळलेले बेसन तब्येतीसाठी अतिशय हानिकारक आहे. शिवाय ही ग्राहकांची मोठीच फसवणूक आहे.

बेसनातील भेसळ कशी ओळखायची?

१. हायड्रोक्लोरिक ऍसिड 

हायड्रोक्लोरिक ऍसिड वापरून बेसनातील भेसळ ओळखणे शक्य आहे. त्यासाठी २ चमचे बेसन एका बाउलमध्ये घेऊन त्यात २ चमचे पाणी मिसळून पेस्ट तयार करा.

मग त्या पेस्टमध्ये २ चमचे हायड्रोक्लोरिक ऍसिड मिसळून ५ मिनिटे तसेच ठेवून द्या. जर बेसनाचा रंग बदलून लाल झाला तर ते बेसन नकली आहे, त्यात भेसळ झालेली आहे असे ओळखावे.

२. लिंबू 

लिंबाच्या रसाने देखील बेसनातील भेसळ ओळखता येऊ शकते. त्यासाठी २ चमचे बेसन पिठात २ चमचे लिंबाचा रस मिसळावा. त्यानंतर त्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड मिसळावे.

जर बेसन लाल किंवा मातकट चॉकलेटी असा झाला तर ते बेसन नकली आहे. त्यात भेसळ झालेली आहे.

तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण घरच्याघरी सहजपणे बेसनातील भेसळ ओळखू शकतो आणि भेसळयुक्त बेसन खाण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. तुम्हाला तुमच्या बेसनाच्या शुद्धतेविषयी शंका असेल तर हे नक्की करून पहा आणि खात्री करून घ्या.

घरच्या घरी दुधातली भेसळ कशी ओळखावी?

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।