शहीद मेजर शशिधरन नायर यांची ‘एक छोटीसी लव्ह स्टोरी’
२००७ साली मेजर शशिधरन नायर ह्यांची ओळख त्यांच्या एका मित्राने तृप्तीशी करून दिली. बघताक्षणीच तृप्ती आणि शशिधरन नायर एकमेकांच्या प्रेमात पडले. तृप्तीने कॉम्प्यूटर एप्लिकेशन मधून आपलं मास्टर पूर्ण केलं होतं. ‘लव्ह एट फर्स्ट साईट’ अशा वेगळ्या प्रेमकथेत दोघांनाही कळून चुकलं की ‘अपनी जोडी तो उसने बनाई है।’