कविता
वेडं प्रेम..
मला आवडतात ‘गडद रंग’,
आपलं म्हणणं एकचं, “उठुन दिसतं”…
तिला माझं सगळं झकपक वाटतं,
ठळक रंगांचं, तिला का वावडं असतं?…
भांडण शब्दांचं…..
अबोली तु अन् तो निवडुंग
कसा ग!हा नियतिचा रंग…
हा रंग रंगीत व्हावा म्हणुन
आज पुन्हा रूसलेत शब्द माझ्याशी…
काय हरकत आहे?…
कधी झालेच अश्रु अनावर,अन् फोडला, बांध पापण्यांचा तरी,
त्या अनमोल थेंबानी, उमेदीच्या झाडाला, भिजवायला,….
काय हरकत आहे?……
महीला दिन ना आज…
महिलादिन ना आज …
संध्याकाळी ओसरलेला पुर सावरत,
पुन्हा घर गाठायचं होतं,
अन् किचनओट्यावरच्या पसाऱ्यातल्या,
भांड्यांशी दोन दोन हात करायचे होते….
पेढे घ्या पेढे…..
कधी मल्ल्या, कधी मोदी..
समजत नाही गोष्ट साधी,
झोपली होती का यंत्रणा या आधी ?
प्रसूती वेदना जाणवल्या नाहीत का ?
बँकांना,उदरातल्या या ,
भ्रष्ट अभ्रकांच्या…?
तु नेहमीच म्हणायचा, आपल्या प्रेमाचा गूलकंद कसा गं चाखायचा?
तु नेहमीच म्हणायचा,
आपल्या प्रेमाचा गूलकंद
कसा गं चाखायचा…….
तुझं सारखं वार्याशी भांडणं!
माझ्या केसांच्या बटा,
प्रेम असावं आई-बाबांसारखं….
प्रेम असावं आई-बाबांसारखं,
लेकरांसाठी रात्रंदिन झुरणारं…
नको,वासनेनं झपाटलेलं.
प्रेम असावं आई-बाबांसारखं,