महिलांच्या बचतीचे महत्त्व आणि बचतीसाठी महिलांना मिळणारे लाभ
भारतात पुरुषांचं सरासरी आयुर्मान ६६ वर्षे आणि ९ महिने आहे तर हेच महिलांचं सरासरी आयुर्मान ३ वर्ष जास्त म्हणजे ६९ वर्षे ९ महिने इतकं आहे. महिलांना बरेचदा घरातल्या जवाबदारीमुळे किंवा आणखी काही कारणांमुळे नोकरी अवेळीसोडावी लागते. भारतातील एका सर्वेक्षणानुसार २००४-२००५ ते २०११-२०१२ या काळात २ कोटी महिलांनी काहीतरी कारणास्तव अवेळी नोकरी सोडली