नेपाळी कुमारी देवी – हाडामासाच्या जीवाला देवपण देणारी एक परम्परा

नेपाळी कुमारी देवी

चनिरा वज्राचार्या या माजी कुमारी देवीशी बोलून टीम मनाचेTalks ने या प्रथेमागील काही तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. २१ वर्षांची चनिरा वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत हे बंदिस्त देवपण याची देही याची डोळा अनुभवत होती. किनऱ्या आवाजात चनिरा सांगते, पाच वर्षांपासूनचं माझं ते आयुष्य खूप आव्हानात्मक होतं. मासिक पाळी आली तेव्हा कुठे माझ्यातलं देवपण संपलं.

जगभरात ५% लोकांचे दोनही डोळे वेगवेगळ्या रंगांचे असण्याचे कारण काय?

शारीरिक वैशिष्ठ्ये

प्रत्येक मनुष्य प्राणी आपल्या शरीराची विशिष्ट ठेवण घेऊन जन्म घेतो. शरीराचे अवयव तेच, पण इतक्या अफाट जनसागरात एकसारखे दिसणारे लोक असतात का? निर्मात्याने प्रत्येक व्यक्तीला वेगळा चेहेरा आणि शरीराची ठेवण दिलेली आहे. बरेचदा लोक इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी टेक्नॉलॉजी च्या मदतीने आपल्या शरीरातील जडण घडणीमध्ये आर्टिफिशिअल बदल करवून घेतात. हे बरेचदा फक्त दिसण्यासाठी किंवा काही हौस नाहीतर सोय म्हणून केले जाते.

चिरतरुण जपानी लोकांच्या आरोग्याचं रहस्य जाणून घ्या…

जपानी

स्थूलपणा, डायबिटीस, हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल, मायग्रेन, कॅन्सर यांसारखे भयंकर आजार जगभरात पसरत चालले आहेत. पण जपानबद्दल हे ऐकून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही कि तंत्रज्ञान आणि नवनव्या संशोधनांमध्ये सर्वात अग्रेसर असूनही जपान जगातल्या सर्वात सुदृढ देशांच्या यादीत आपलं नाव टिकवून आहे. जपानमध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी रेट जगात सर्वात जास्त आहे.

महाराष्ट्रीयन स्त्रियांचा पारंपरिक पोशाख नऊवारी लुगडं आणि त्याचा इतिहास..

नऊवारी लुगडं

माझ्या लहानपणी मुबईत माझ्या शेजारी राहाणारे बलसाड गावचे गुजराती त्यांचं वाळत घातलेलं धोतर शोधताना ‘मारू लुगडु क्यां गयु..’, असं त्यांच्या बायकोला विचारताना मी ऐकायचो, तेंव्हा मला भारी मौज वाटायची. हा माणूस धोतराला लुगडूं का म्हणतो, असा विचार तेंव्हा मनात यायचा, कारण माझ्या तेंव्हाच्या ठाम समजुतीप्रमाणे लुगडं म्हटलं की, ते नऊवारी असतं.

भारतीय सेना आणि वैज्ञानिक यांनी अमेरिकेच्या सी.आय.ए ला पाजलेला अपयशाचा डोस.

वैज्ञानिक

एक क्षणभर सुद्धा अमेरिकेला भारताच्या ह्या चाचण्यांचा सुगावा लागला नाही. ह्याचे सर्वात मोठे श्रेय हे भारतीय सेनेला जाते. ज्यांनी अमेरिकेच्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करून भारतीय संशोधक आणि वैज्ञानिकांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली. आज ह्या गोष्टीला २० वर्षाचा काळ लोटला पण त्या हसलेल्या बुद्धाचा चेहरा न अमेरिका विसरू शकली आहे न अमेरिकेची गुप्तचर संघटना सी.आय.ए.

का अडकला आहे राज कुंद्रा? ए_रॉटीक फिल्म आणि पो_र्न फिल्ममध्ये काय फरक आहे?

राज कुंद्रा न्यूज़ शिल्पा शेट्टी गहना वशिष्ठ पूनम पांडे

गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा हे नाव चर्चेत आहे. राज कुंद्राला आक्षेपार्ह सिनेमे किंवा कंटेंट बनवण्यामुळे अटक झाली आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरुद्ध सज्जड पुरावे सापडले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

ओल्या नारळापासून खोबरेल तेल बनवण्याची घरगुती पद्धत

संपूर्ण भारतात विविध कारणांनी नारळाचे तेल लोकप्रिय आहे. ते खाद्यतेल म्हणून वापरले जाते, सहजपणे उपलब्ध होते आणि त्याचे अनेकानेक उपयोग आहेत. आपल्या संस्कृतीत सण, उत्सवांची रेलचेल असतेच. ओलं नारळ प्रत्येक उत्सवात मानाचं स्थान घेऊन असतंच असतं. या ओल्या नारळापासून Coconut Oil खोबरेल तेल कसे बनवता येते त्याची कृती आज आपण बघू. ओल्या नारळापासून Coconut Oil … Read more

आपण चवीने खातो ते व्हॅनिला आईस्क्रीम नक्की आहे तरी काय?

व्हॅनिला हे जगातल्या सगळ्यात महाग मसाल्यांपैकी एक आहे. किलोला ४२ हजार असा भाव असलेलं हे व्हॅनिला प्रेशिअस मेटल्सला सुद्धा मागे टाकतं. केशरानन्तर सर्वात महाग असलेला मसाला जर कुठला असे तर तो आहे व्हॅनिला.

माहित करून घ्या मॉर्फ व्हिडीओ, डॉक्टर्ड व्हिडीओ बनवणारं तंत्रज्ञान ‘डिपफेक’

डीपफेक

आजच्या युगात मानव तंत्रज्ञानाची नवनवीन शिखरे सर करत असताना  इतक्या वेगाने प्रगती करतोय की ही प्रगती आहे अथवा अधोगती आहे यातला फरकच दिसून येत नाहीय. तंत्रज्ञान हे एका दुधारी शस्त्राप्रमाणे असते. त्याची एक बाजू जितकी चांगली तितकीच दुसरी बाजू वाईट असते. अश्याच एका नवीन तंत्रज्ञानाचा धोका सध्या जगभर निर्माण झालाय… आणि अर्थातच हे काळेकुट्ट वादळ भारतात सुद्धा येऊन पोहोचले आहे… डीपफेक!

तलकड – वारंवार वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडलं जाणारं रहस्यमयी मंदिर

Rahasy Talkadu

भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी असलेल्या अनेक गोष्टींचं आकलन आजही होत नाही. आजूबाजूची ठिकाणं अगदी सर्वसाधारण असताना त्या ठिकाणी मात्र आपल्याला वेगळी स्थिती बघायला मिळते. त्यामागे अनेक पौराणिक गोष्टींचा संदर्भ असला तरी त्या मागे वैज्ञानिक कारणं ही आहेत. पौराणिक संदर्भांवर विश्वास न ठेवणारे विज्ञानाच्या कक्षेतून जेव्हा ह्या गोष्टीची उत्तरं शोधतात तेव्हा काही ठोस निष्कर्ष ही काढता येत नाहीत.