सहाव्या क्रमांकाची श्रीमंती शोभून दिसण्यासाठी…
यानिमित्ताने एका मुद्द्याचा मात्र गंभीरपणे विचार केला पाहिजे. तो मुद्दा म्हणजे भारताची संपत्ती पूर्वीही मोजक्या खासगी व्यक्तींकडे एकवटली होती आणि आजही ती खासगी व्यक्तींकडेच एकवटली आहे. याचा अर्थ लोकशाहीत राजकीय आणि सामाजिक अधिकारांचे वाटप झाले, तेवढे आर्थिक संपत्तीचे वाटप अजूनही त्या वेगाने होऊ शकलेले नाही.