तहान

तहान

तो घरी आला जवळची बॅग त्याने ठेवली. फ्रेश होउन छोट्या पुतणीच्या शेजारी बसून थोडा तो खेळला. आता वडिल आल्यावर ते माझ्याकडे पैसे मागणार नाही. कारण नोकरीला लागून पाच महिने झाले. अजून पर्यंत संजयने न मागताच पैसे दिले होते. आज माझा पगार झाला असणार हे वडिलांना माहित आहेच.

आधार

कथा

अचानक तिचे लक्ष समोरील रस्त्यावर गेले. नुकतीच पावसाची सर येऊन गेलेली आणि त्यावर लखलखते सोनेरी किरण पडलेले त्यामुळे तो डांबरी रस्ता अधिकच चमकत होता आणि किरण गेले की पूर्ववत…

॥कोंड॥ (एक घुसमट)

Marathi-katha

वरच्या माडीवर आभाळ न्याहाळत रुख्माक्का ऊभ्या होत्या. आषाढ सरला तरी पावसाचे नामोनिशाण कुठे नव्हते. आभाळ तर काठोकाठ भरून होतं. रोजचा दिवस पावसाची वाट बघत उगवायचा आणि आभाळाचा डोंब बघत मावळायचा. सारी सृष्टी स्तब्ध होती, झाडं, पानफुलं, माती आणि मातीत रूजलेल्या माणसांना आता एकच ओढ होती कोंड फुटण्याची.

किमया

किमया

किमयाला सख्ख्या आईच्या जाण्याला अप्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरवलच होतं तिने; अन् आता तर दुर्दैवाने किमया सोबत असतानाच अपघाताने ओढावलेल्या बाबांच्या मृत्युलाही किमयाच जबाबदार आहे; असं तिचं ठाम मत झालं. एक दिवस तिच्या मनातील भावनांच्या ज्वालामुखीचा उद्रेकच झाला व ती किमयावर कडाडलीच,

तो आणि ती – एक सुंदर प्रेम कथा

प्रेम कथा

पहिल्या ‘प्रपोज’चा पहिलाच गंध… पहिलं हे पहिलंच असतं, असा आपण वारंवार उल्लेख करतो. कारण पहिल्याचं महत्त्व आपण जाणतो. तर चला पहिल्या प्रपोजचा थोडा अनुभव घेऊ या.

👫 लग्न गाठ 👫

लग्न गाठ

किती तरी नाती अबोल असतात ती समजून येतच नाहीत आणि जेव्हा समजतात तेव्हा अधिक परिपक्व आणि घट्ट झालेली असतात. मनुश्री आणि जगदीशची लग्न गाठ बांधली गेली.. नक्की कोणाच्या प्रयत्नांमुळे? अहो, लग्नाच्या गाठी तर परमेश्वरच बांधतो.. बाकी सगळे निमित्त मात्र.

प्रेम तुझं माझं

प्रेम तुझं माझं

रेल्वेस्टेशनवर गजरे विकणार्‍या आजीपासून ते ऑफिसमधल्या अडगळीच्या डिपार्टमेंटमध्ये काम करणार्‍या क्लार्कपर्यंत.. कधी त्यांच्याशी बोलणं होत नाही की, निमित्त निघत नाही… मग अचानक कुठेतरी निमित्त निघतं आणि खऱ्या अर्थाने संबंध रूजायला लागतात..

पालखी

पालखी

पलीकडून चुलते म्हणाले “शेवटची पालखी त्यांनी खांद्यावर घेऊन घरात आणली तेव्हाच म्हणाले होते जो पर्यंत माझा मुलगा पालखी स्वतःच्या खांद्यावर घेत नाही तोपर्यंत मला मरण देऊ नकोस.” काल तुम्ही दोघांनी पालखी खांद्यावर घेतलीत तेव्हाच त्याचे जाणे नक्की झाले होते.

बहुरूपी

बहुरूपी

अंगाला निळा रंग फासून…. गळ्यात रबराचा नाग गुंडाळून ….डोक्यावर जटांचा टोप आणि हातात त्रिशूल घेऊन तो दारोदारी फिरत होता. नेहमीचे होते ते त्याचे. कोणाचा दिवस असेल तर त्याचे वेषांतर करायचे . शनिवार मारुती… तर मंगळवारी गणपती.. हीच तर कला होती त्याच्या अंगात.

ओव्हन!! आवाज आणि आग नसलेला पण आच असलेला

ओव्हन

“परदुःख शितल असतं गं! तुझ्या मुली सांभाळुन घेतात म्हातारपणी तुला काय कळणार सुनांचं वागणं.” माई उसळलीच. सुमतीबाईंनाही वाटलं ताडकन् बोलावं, सांगावं, ” बायांनो, मला पण तडजोडी कराव्याच लागतात तुमच्यासारख्या…”

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।