अवकाशाची स्वप्नं प्रत्यक्षात जगणारी जळगावची अनिमा पाटील – साबळे
मार्च २००० मध्ये अनिमा अमेरिकेत आल्यावर आपला सॉफ्टवेअर मधला जॉब करीत असताना अनिमा च्या मनात असलेलं स्वप्न तिला शांत झोप लागू देतं नव्हतं. आकाशाला गवसणी घालण्याचं जे स्वप्न तिने लहानपणी बघितलं ते कुठेतरी अजूनही सतत तिला अस्वस्थ करत होतं. आपल्या घराच्या जवळच नासाचं एक केंद्र तिला दिसलं आणि पुन्हा तिच्या स्वप्नाला नवीन धुमारे फुटले.