दिवसभर एकाच जागी बसून काम करता? मग आरोग्य जपण्यासाठी करा ही ५ सोपी, खुर्चीत बसून करायची योगासने.
जर तुम्ही बैठं काम करत असाल, तर रोज बसून ही योगासने करा.
यामुळे शरीराला व्यायाम घडेल आणि स्नायू मोकळे होतील.
“योग म्हणजे ९९% सराव आणि १% सिद्धांत” असं म्हणतात.
याची अर्थ तुम्ही सातत्याने सराव केला नाही तर तुमचं ज्ञान व्यर्थ आहे.
योगामुळे शरीरात जिथे समस्या आहे त्या भागांचं आरोग्य सुधारतंच पण सर्वांगीण आरोग्याला ही प्रोत्साहन मिळतं.
विशिष्ट समस्यांसाठी खास योगासने उपलब्ध आहेत.
पण ब-याच जणांना त्यात स्वारस्य नसतं, काहीजणांना वेळेअभावी योगासनं करणं कंटाळवाणं वाटतं.
पण ही जी खुर्चीवर बसून करता येणारी ५ आसनं आहेत ना, ती तुम्ही कधीही आणि कुठंही करू शकता.
वेळेची बचत करणारी ही आसनं, दीर्घकाळ बसल्यामुळे निर्माण झालेला स्नायूंचा ताण देखील कमी करतं.
१) मार्जारासन (बसलेली मांजर /गाय मुद्रा)
मांजर किंवा गायीची बसलेली पोझ म्हणजे हे आसन.
वृद्धांसाठी सर्वात फायदेशीर आसन आहे.
ज्या व्यक्ती उभं राहून योग करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे.
या आसनामुळे ताण कमी होतो आणि पाठीचा कणा, मान आणि पाठीचा वरचा भाग यासह शरीराचा वरचा भाग ताणला जातो.
या पद्धतीने करा हे आसन.
मजबूत लाकडी खुर्चीवर बसा.
पाठीचा कणा आणि पाय सरळ ठेवा.
मांडीवर हात ठेवा.
श्वास आत घ्या आणि तुमची पाठीची कमान करा.
आता, श्वास सोडा, आणि छातीवर हनुवटी ठेवून हळू हळू तुमचे शरीराची कमान करा.
ही क्रिया १० वेळा करा.
२) विरभद्रासन किंवा बसलेले योद्धा मुद्रा
खुर्चीवर बसून करता येणारा विरभद्रासन हा सोपा व्यायाम आहे.
या योगासनामुळं हात, मांड्या, पाठीचे स्नायू, मान, छाती, खांदे आणि पोट मजबूत होते.
दररोज ५ मिनिटे खुर्चीवर बसून ही पोझ करण्याचा नेम ठेवलात तर स्नायूतील अडथळे दूर होतात.
हे आसन करण्यासाठी या स्टेप्स नीट लक्षात घ्या.
उजवा पाय समोर ठेवून खुर्चीच्या उजव्या बाजूला बसा.
तुमचा डावा पाय जमिनीला स्पर्श करून खुर्चीच्या डाव्या बाजूला ठेवा.
तुमचा उजवा पाय ९० अंशांवर ठेवा.
तुमचा डावा पाय जमेल तितका मागे ताणून घ्या.
आता हळू हळू हात वर करा आणि स्ट्रेच करा.
३० ते ४० सेकंद या स्थितीत रहा.
आता, रिलँक्स व्हा
ही कृती १० वेळा करा.
३) गरुडासन किंवा बसलेले गरुड मुद्रा
गरुडासनामुळे हात आणि खांदे मजबूत होतात.
ही एक सोपी पोझ आहे जी तुम्ही अगदी ऑफिसमध्ये बसून ही करू शकता.
हे खांदे घट्ट होण्यासाठी आणि हाताची ताकद वाढवायला मदत करते.
आसन करण्यासाठी या स्टेप्स नीट लक्षात घ्या.
मजबूत लाकडी खुर्चीवर बसा.
तुमचा उजवा पाय डाव्या मांडीवर आणि डावी मांडी उजवीकडे ठेवा.
ही एक पद्मासन मुद्रा आहे.
तळहात जोडा, आणि आता छताकडे हात ताणा.
तुमच्या हाताचा कानाला स्पर्श होऊ देऊ नका.
३० सेकंद या पोझमध्ये रहा.
८/१० वेळा पुन्हा करा.
४) अर्ध मत्स्येंद्रासन ( हाफ स्पाइनल ट्विस्ट पोझ)
लवचिकता वाढवण्यासाठी तुम्ही करू शकाल अशा बैठ्या योगासनांपैकी हा एक मूलभूत योग आहे.
जास्त वेळ बसल्यानं स्नायूंच्या ताकदीत अडथळा येतो .
त्यामुळे ही आसनं दिवसातून जेंव्हा जमेल तेंव्हा केली तर ताण कमी आणि खांदेदुखी टाळता येते.
खुर्चीच्या कडेला बसा आणि खुर्ची डाव्या हाताच्या बाजूला येईल अशा पद्धतीने बसा.
खुर्चीचा मागचा भाग घट्ट धरा आणि तुमच्या शरीराचा वरचा भाग डाव्या बाजूला वळवा.
श्वास घ्या आणि पाठीचा कणा न वाकवता ताणण्याचा प्रयत्न करा.
श्वास सोडत हळूहळू मूळ स्थितीकडं परत या.
उजव्या बाजूला असेच करा.
ही क्रिया ८-१० वेळा पुन्हा करा.
५) एक पाद राजकपोतासन (बसलेली एक पाय कबूतर मुद्रा)
पायांचा व्यायाम करण्यासाठी ही पोझ उत्तम आहे. बसल्यामुळे पायाची ताकदसुद्धा कमी होते .
हे योगासन जर दर ४/५ तासांनी केलत तर तुमचे पाय आणि गुडघ्यांचा व्यायाम होतो.
उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा.
गुडघा टाचांना समांतर ठेवा.
सावकाश श्वास घ्या आणि सोडा.
या स्थितीत ३० सेकंद श्वास घ्या.
आता, मूळ स्थितीत परत या आणि आपल्या डाव्या पायाने तेच पुन्हा करा.
८-१० वेळा पुन्हा करा.
ही बैठी योगासनं तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.