सि_गरेट ओढण्याचा शौक अनेकांना असतो. अनेकांना ते स्टायलिश वाटते, काहीतरी भारी करतो आहोत असे वाटते.
पूर्वीप्रमाणे आता सि_गरेट ओढणे ही पुरूषांची मक्तेदारी राहिली नाहीये. हल्ली तरुण मुली, स्त्रिया देखील सि_गरेट ओढताना दिसतात.
परंतु सि_गरेट ओढणे हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. सि_गरेटमुळे शरीराची, त्यातूनही मुख्यत्वे तोंडाच्या आरोग्याची खूप हानी होते.
सिगरेट ओढण्यामुळे हिरड्या आणि दात कायमस्वरूपी खराब होतात, तोंडाला दुर्गंध येतो आणि तोंडाचा कॅन्सर होण्याचा देखील धोका असतो.
आज आपण सि_गरेट ओढण्याचा तोंडाच्या आरोग्यावर नक्की काय काय परिणाम होतो हे विस्तृतपणे जाणून घेणार आहोत.
सि_गरेट ओढण्याचा दातांवर होणारा परीणाम
बरेचदा लोकांना सि_गरेट ओढणे हे आरोग्यासाठी वाईट आहे हे माहीत असते परंतु त्याचा दातांवर, हिरड्यांवर नक्की काय परिणाम होतो हे माहीत नसते.
सि_गरेट मुळे दातांवर डाग पडणे, दात किडणे आणि हिरड्या खराब होणे असे त्रास होतात तसेच तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो हे तर सर्वश्रुतच आहे.
सि_गरेट मुळे खाली दिलेले डेन्टल प्रॉब्लेम्स होऊ शकतात
१. श्वासाची दुर्गंधी
२. टाळूतील लाळ उत्पन्न करणाऱ्या ग्रंथीना इजा होणे
३. दातांवर डाग पडणे
४. दातांवर प्लाक आणि टार्टरचा थर निर्माण होणे
५. जबड्याची हाडे ठिसुळ होणे
६. तोंडाच्या आत पांढरे चट्टे उमटणे
७. हिरड्या डॅमेज होणे
८. दातांचा इलाज करताना अडथळे येणे.
हिरड्यांवर होणारे दुष्परिणाम
आपले दात निरोगी असण्यासाठी हिरड्यांचे आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे.
परंतु सि_गरेट ओढण्यामुळे हिरड्यांवर देखील परिणाम होतो. हिरड्या खराब होतात. त्याची लक्षणे खालीलप्रमाणे…
१. सुजलेल्या, लालसर हिरड्या
२. कमकुवत, लगेच रक्त येणाऱ्या हिरड्या
३. चावताना त्रास होणे
४. हिरड्यातुन रक्त येणे
५. हिरड्या आणि दात ह्यांच्यात फटी निर्माण होणे
सि_गरेट ओढण्यामुळे दात आणि हिरड्यांचे विकार होण्याची शक्यता दुप्पट होते. आपल्या दातांची आणि हिरड्यांची योग्य काळजी घेणे, तसेच सि_गरेट पासून दूर राहणे हे तोंडाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
सि_गरेटमुळे दातांवर पडलेले तंबाखूचे डाग कसे घालवाल
मुळात सि_गरेट ओढणे हेच गैर आहे. त्यापासून सुटका करून घेणे आवश्यक आहे. आणि त्यामुळे दातांवर डाग पडून दात वाईट दिसतात, ते घालवण्यासाठी खालील उपाय करता येऊ शकतात…
रोज दोन वेळा दात स्वछ घासणे
१. ऍक्टिव्हटेड चारकोल
२. हायड्रोजन पेरोक्साईड
३. बेकिंग सोडा
४. हळद
५. नारळाचे तेल
ह्यापैकी काहीही वापरून दातांचे डाग घालवता येतात.
तसेच डेंटिस्ट कडे जाऊन दातांना शुभ्र करण्याची प्रक्रिया देखील करता येऊ शकते.
अर्थात सि_गरेट ओढण्यामुळे दातांवर पडणारे डाग हे पूर्णपणे जाऊ शकत नाहीत. ते फक्त कमी होऊ शकतात.
आपल्या तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी आणि तोंडाचा, फुफ्फुसाचा कॅन्सर, इन्फेक्शन हे टाळण्यासाठी सि_गरेट ओढण्याचे व्यसन न लागू देणे हाच उपाय आहे.
सि_गरेट ओढण्यापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी खालील उपाय करा
१. स्वतःला कामात गुंतवून घ्या. सि_गरेट ची आठवण होणार नाही असे काम करत रहा.
२. दुसऱ्यांना सि_गरेट ओढताना पाहून आपल्याला देखील तलफ येते, म्हणून अशा मित्रांचा सहवास टाळा.
३. निकोटिन रिप्लेसमेंट ट्रीटमेंट घ्या, ह्यामध्ये सि_गरेट ची तलफ आली की खाण्यासाठी एक च्युइंग गम मिळते, त्यामुळे सि_गरेट ओढणे कमी होते.
४. आपण सि_गरेट बंद करणार आहोत असा निर्धार करा आणि त्याची सतत स्वतःला आठवण करून घ्या. समोर सहज दिसेल अशा ठिकाणी नो स्मोकिंग च्या सूचना लिहून ठेवा.
तर अशा प्रकारे तुम्ही ह्या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवू शकता. त्यामुळे पर्यायाने तोंडाचे आरोग्यही राखले जाईल आणि कॅन्सर सारख्या भयंकर रोगापासून स्वतःला वाचवता येईल.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.