डोळे का फडफडतात आणि ते थांबवण्यासाठी काय करावे?

डोळे हा आपल्या शरीराचा नाजुक अवयव आहे. आणि डोळ्यांचे संरक्षण करणाऱ्या पापण्या देखील महत्वाच्या आहेत.

सहजपणे केव्हातरी आपण गंमतीने डोळे मिचकावतो. आणि एखादे वेळी आपोआप देखील डोळे मिचकावले जातात. परंतु डोळे किंवा पापण्या जर वारंवार, सतत मिचकावल्या जात असतील तर मात्र ती एक समस्याच होऊन बसते.

आज आपण डोळे मिचकावले जाण्याबद्दल अधिक जाणून घेऊया.

खरंतर डोळे मिचकावले जाणं हे अगदी थोड्या कालावधिकरीता असेल तर त्याची फारशी काळजी नसते.

परंतु जर एकच डोळा सतत, वारंवार मिचकावला जात असेल तर ती एक neurological म्हणजेच मेंदूशी निगडीत समस्या असू शकते.

त्याचे नेत्र तज्ञांकडून उपचार होणे आवश्यक आहे.

ह्या समस्येची कारणे –

डोळे मिचकावले जाणे हे खालील गोष्टींमुळे (ट्रिगर) सुरू होऊ शकते.

१. ताणतणाव

२. थकवा

३. डोळ्यांवर दाब येणे

४. Caffeine चे सेवन

५. मद्यपान

६. डोळे कोरडे पडणे

७. कुपोषण होणे

८. एलर्जि

आपल्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करून डोळे/ पापण्या मिचकावल्या जाण्याच्या समस्येवर मात केली जाऊ शकते.
कसे ते आपण पाहूया

१. ताण तणाव – आपल्या मनावर, शरीरावर येणारा ताण हे डोळे मिचकावले जाण्याच्या समस्येचे प्रमुख कारण आहे.

जर आपण ताण तणावावर मात करू शकलो तर ही समस्या उद्भवणारच नाही. हयाकरता नियमित योगासने करणे, प्राणायाम करणे, मित्र मैत्रिणींबरोबर वेळ घालवणे, आनंदी राहणे, अधून मधून कामातून ब्रेक घेऊन फिरून येणे हे आपण करू शकतो.

स्ट्रेस पासून आपण दूर राहिलो तर ही समस्या उद्भवणारच नाही.

२. थकवा – थकवा हे ह्या समस्येचे दुसरे प्रमुख कारण आहे. अपुरी झोप हे थकवा येण्याचे प्रमुख कारण आहे, त्यामुळे ७ ते ८ तासांची गाढ झोप घेणे आवश्यक आहे.

३. डोळ्यांवर दाब/ताण येणे – सततच्या कम्प्युटर, टॅब्लेट किंवा मोबाइल फोनच्या अतिरिक्त वापरामुळे डोळ्यांवर खूप ताण येतो.

त्यामुळे देखील डोळे मिचकावले जाणे ट्रिगर होऊ शकते.

त्यामुळे ह्या डिजिटल उपकरणांचा सलग वापर टाळा. कामातून मध्ये मध्ये ब्रेक घ्या. डोळ्याना थंडावा मिळेल असे वातावरण ठेवा. तसेच डोळ्यांवरचा ताण कमी करणारे खास चष्मे मिळतात ते वापरा.

४. Caffeine – caffeine युक्त पदार्थांचे सेवन खूप जास्त प्रमाणात करणे डोळ्यांसाठी चांगले नाही. म्हणून चहा, कॉफी, चॉकलेट इत्यादीचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळा.

५. मद्यपान – मद्यपान केल्यामुळे जर डोळे मिचकावले जाणे ट्रिगर होत असेल तर काही दिवसमद्यपान करू नका. तुमची समस्या दूर होईल.

६. डोळे कोरडे पडणे – वयोमानानुसार डोळे कोरडे पडतात असा अनुभव व्ययस्कर व्यक्तींना नेहेमी येतो. ह्यामुळे डोळे मिचकावले जाण्याची समस्या सुरू होऊ शकते.

म्हणून ५० वर्षे वयावरील सर्व व्यक्तिनि वारंवार नेत्र तपासणी करून डोळे जर कोरडे पडत असतील तर तज्ञांकडून योग्य उपचार करून घ्यावेत.

७. कुपोषण – काही vitamins minerals ची कमतरता ह्या समस्येला निमंत्रण देऊ शकते. त्यामुळे तुम्ही घेत असलेल्या आहारा कडे विशेष लक्ष द्या.

आपला आहार परिपूर्ण असला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचे कुपोषण होणार नाही ह्याची काळजी घ्या.

८. एलर्जि – एखाद्या गोष्टीची किंवा पदार्थाची एलर्जि असेल तर त्यामुळे डोळे लाल होणे, डोळ्याना खाज येणे, सूज येणे असे होऊ शकते.

अशा वेळी देखील ही eyelid twitching ची समस्या ट्रिगर होऊ शकते. म्हणून ज्याची एलर्जि असेल त्यापासून दूर रहा.

जर हा त्रास क्वचित होत असेल तर ठीक परंतु जर वारंवार असा त्रास होऊन डोळे आणि चेहऱ्याचा काही भाग प्रभावित होत असेल तसेच दोन्ही पापण्या खूप सुजून डोळे उघडण्यास त्रास होत असेल तर ताबडतोब तज्ञ डॉक्टरां चा सल्ला घ्या. कारण ही मेंदुशी निगडीत गंभीर समस्या असू शकते.

स्वस्थ रहा. आनंदी रहा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “डोळे का फडफडतात आणि ते थांबवण्यासाठी काय करावे?”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।