शार्पनिंग स्टोन अर्थात धार काढायचा दगड याच्या मदतीन चाकू, सुरीला घरातच धार लावा.
पुर्वीच्या काळी तलवारी, कु-हाडी अशा धारदार हत्यारांना धार काढावी लागायची.
सह्याद्रीच्या डोंगरातल्या दगडावर एका लयीत पातं पुढं मागं आणि वर खाली करत धार काढण्याचा सीन तुम्ही कदाचित सिनेमात पाहिला असेल.
आता तलवारी, कु-हाडी, विळ्या यांचं फार काम उरलं नाही.
मात्र किचनमध्ये धारदार सुरी किंवा चाकूचा सर्रास वापर होतो.
सुरी किंवा चाकूची धार शाबूत असेल तर भाज्या, फळं, सलाड पटापट कापली जातील आणि वेळ ही वाचेल.
पुर्वी या चाकू सु-यांना धार काढायला काही लोक दारोदारी फिरायचे.
“चक्कू छुरीयां तेज करालो” हे फक्त गाणं नाही तर गृहिणींसमोरचा नेहमीचा यक्षप्रश्न आहे.
बदलत्या काळानं अनेक पर्याय उपलब्ध करून दिले, तसं डोंगरातल्या दगडालाही मॉडर्न किचन मध्ये जागा दिली.
या नव्या धार लावणा-या दगडांना, व्हेटस्टोन म्हणतात, ते नैसर्गिक ही असतात किंवा कृत्रिम पदार्थांपासून तयार करतात.
ते दगड तुम्ही कोरडे वापरू शकता किंवा तेल किंवा पाण्याचा वापर करू शकता.
दगडाच्या विविध प्रकारातून तुमच्या गरजेला पूरक व्हेटस्टोन निवडलात की, बोथट झालेलं ब्लेड पुन्हा तीक्ष्ण होईपर्यंत त्या दगडावर घासून घ्यावं लागतं
एकसमान, स्थिर हातांनी ब्लेड घासलं तर, तुमचा चाकू धारदार आणि पुन्हा अगदी नवा दिसेल!
1) पण हा धार लावणारा दगड कसा निवडायचा.
टोमॅटो किंवा फळ चिरताना तुम्ही सहजरित्या ते चिरू शकत नसाल तर तुमच्या चाकू सुऱ्यांना धार लावण्याची गरज आहे.
सातत्याने तुम्ही चाकू सु-यांचा वापर करत असाल तर नियमित धार ही काढावी लागणार.
2) चाकूला धार काढण्यासाठी दगडाचा योग्य प्रकार निवडा.
बाजारात उपलब्ध असणाऱ्या दगडातून तुम्ही नैसर्गिक किंवा सिंथेटिक दगडाची निवड करू शकता, जो पाण्यात भिजवून वापरता येतो किंवा तेलाबरोबर तसंच कोरडा ही वापरता येतो.
डायमंड स्टोन जे मार्केटमध्ये मिळतात ते धातुमध्ये जडवलेले असतात त्यांचा आकार ही हि-यासारखा असतो.
पाण्यात भिजवावे लागणारे दगड मऊ असतात, ज्यामुळं ते पटकन तुमच्या चाकूला धार लावू शकतात.
3) या प्रकारचे दगड बाकीच्या दगडांच्या तुलनेत लवकर खराब होतात.
तेलाबरोबर वापरता येणारे दगड जरा कमी फायदेशीर असतात. ते टणक पदार्थापासून तयार करतात.
हे तेलाचे दगड वापरून, स्वच्छ करुन ठेवणं सोपं असतं. हे दगड खूप दिवस टिकतात.
डायमंड स्टोन सर्वात महाग असतात. पण ते ही बराच काळ टिकतात.
4) दगडाची निवड करताना ही काळजी घ्या.
चाकूची धार तीक्ष्ण करणारे दगड अनेक वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत.
तुम्ही छोटे, मध्यम, किंवा मोठे खडबडीत दगड निवडू शकता.
जर तुमच्या चाकूची धार खूप बोथट झाली असेल, तर तुम्ही बारीक काजळी कण जे या दगडांवर असणारी बारीक वाळू किंवा दगडाचा चुरा असतो त्या बारीक काजळीचा किंवा खडबडीत दगड वापरा.
जर तुमच्या चाकूला थोडी धार असेल, तो फार बोथट झाला नसेल, तर मध्यम काजळी वापरण्याचा विचार करा.
तुम्ही असा ही एक दगड निवडू शकता ज्याच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या काजळीकणांचे थर असतात.
5) प्रत्यक्ष धार लावताना काय काळजी घ्यावी?
बाजारात मिळणारा दगड तुमच्या गरजेनुसार सिलेक्ट करा आणि मागवून घ्या.
त्याबरोबर ज्या सूचना आल्या असतील त्या नीट फॉलो करा.
त्यामध्ये दगड पाण्यात बुडवावा लागेल की तेल घालावं लागेल याविषयी सांगितलं असेल.
व्हेटस्टोन वापरताना चाकू 20 अंश कोनात वापरायची प्रँक्टिस करा.
याचं कारण सरळ चाकूला 20 अंशात धार लावावी लागते.
हा कोन साधण्यासाठी हा चाकू तुमच्या समोर उभा धरून ठेवा. हा 90 अंश झाला.
आता चाकूला टेबलाच्या दिशेने अर्ध्या मापात झुकवा. हा झाला 45 अंश.
याच्या ही निम्मं वाकवा, टेबलापासून एक इंच किंवा अडीच सेंमी वर रहा. हा होईल तुमचा 20 अंशाचा कोन.
जर तुमची सुरी किंवा चाकू मोठा असेल तर तुम्हांला तो मोठ्या शार्पनिंग अँगलवर ठेवावा लागेल.
जर तुमचा शार्पनिंग स्टोन मोठा असेल तर तुम्हांला लहान अँगलची गरज भासेल ज्यामुळं चाकूला फार धार लागणार नाही.
तज्ञांचा सल्ला
घरी व्हेटस्टोन जरी मागवलात तरी वर्षातुन एक दोनदा तरी, व्यावसायिक धार काढणारे असतात त्यांच्याकडून धार काढून घ्या.
1) वॉटर व्हेटस्टोन 45 मिनीटं भिजवा.
तुम्ही जर वॉटर व्हेटस्टोन मागवला असेल तर कमीत कमी 45 मिनिटं तो भिजायला हवा.
हा स्टोन संपूर्ण भिजेल असा ट्रे घ्या पाण्यात बुडवा आणि 45 मिनिटं तसाच राहू दे.
जर हा स्टोन नीट भिजला नाही कोरडा राहिला तर सुरीच्या पात्यावर स्क्रँचेस पडतात.
ऑईल स्टोन मागवला असेल तर तो पाण्यात बुडवण्याची चूक करु नका.
2) व्हेटस्टोन ओल्या कापडावर ठेवा.
एक जुनं कापड पाण्यात भिजवून पिळून घ्या. जिथं धार काढणार असाल त्या जागी हे ओलं कापड पसरा, त्यावर व्हेटस्टोन ठेवा.
दोन्ही बाजूंनी काजळी किंवा ग्रिट असलेला स्टोन जर तुम्ही निवडला असेल तर खडबडीत बाजू वर ठेवा.
यामुळं चाकू सु-यांची धार लवकर निघेल.
काम करण्यापूर्वी ओलं कापड आठवणीने पसरा, स्टोन ओला करणारा असो कोरडा असो की तेलवाला जुनं कापड नक्की पसरा.
धार काढताना काजळीचे कण खाली पडून डाग पडू शकतात, जे धुतल्यावरही निघत नाहीत.. त्यासाठी ओलं, जुनं कापड गरजेचं आहे.
3) ऑईल स्टोनला व्यवस्थित तेल लावा.
ऑईल स्टोन तुम्ही मागवलेला असेल तर तो वापरण्यापुर्वी स्प्रेने तेल लावा किंवा थेट स्टोन वर तेल घालून बोटांनी सगळीकडे नीट पसरा.
ऑईल स्टोनला व्यवस्थित आणि भरपूर प्रमाणात तेल लागल्याची खात्री करून घ्या.
व्हेटस्टोन कोटींगसाठीचं जे तेल वापरलं जातं ते खास चाकू सुरी शार्पनिंगसाठीचं तेल असतं जे मिनरल्स ऑईलपासून तयार केलेलं असतं.
नॉन-पेट्रोलियम प्रॉडक्टपासून तयार केलेलं हे तेल तुमच्या चाकू सु-यांच्या धातुला प्रोटेक्ट करतात.
स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं तेल या शार्पनिंग स्टोनसाठी अजिबात वापरू नका.
4) चाकू सुरी स्टोनसमोर पकडा.
प्रत्यक्ष धार लावताना तुमच्या एका हातात चाकू अशा पद्धतीने पकडा ज्यामुळं ब्लेड 20 अंश कोनात राहील.
ब्लेडची दिशा तुमच्या चेहऱ्याच्या विरूद्ध दिशेला ठेवा.
चाकूच्या ब्लेडचं दुसरं टोक दुसऱ्या हाताच्या बोटांनी पकडा.
ब्लेडवर स्थिरावलेली तुमची बोटं धार लावताना ब्लेडवरचं प्रेशर आणि दिशा कंट्रोल करू शकतात.
5) ब्लेडची एक बाजू दगडावर घासा.
चाकूला धार ज्या बाजूला काढायची ती बाजू हलक्या हाताने दगडावर सरकवा आणि ते सरकवताना, वरखाली होत असताना त्याला अर्धगोलाकार हलवा.
तुम्हाला ब्लेडची संपूर्ण धार, तळापासून वरपर्यंत, एकाच वेळी दगडावर करावी लागेल
तरच ब्लेड एकसारख़ तीक्ष्ण होईल. ब्लेडची पहिली बाजू दगडावर तीक्ष्ण होईपर्यंत चालवत रहा.
स्टोन कोरडा पडला तर परत ओला करा किंवा तेल लावण्याची काळजी घ्या.
6) दोन्ही बाजूने धार काढा.
चाकूची धार वरखाली दोन्ही कडे असते.त्यामुळे दोन्ही कडून धार काढून घ्या.
चाकू बोटांवर अलगद तोलून दोन्ही बाजूला व्यवस्थित धार काढून घ्यावी.
7) धारेची तीक्ष्णता तपासा.
जेंव्हा धार व्यवस्थित झाली असं वाटेल तेंव्हा खात्री करण्यासाठी एका पेपरच्या तुकड्याला कापायचा प्रयत्न करा.
धार व्यवस्थित लागली असेल तर पेपर पटकन कापला जाईल. तसं झालं नाही तर आणखी धार काढण्याची गरज आहे हे लक्षात ठेवा.
8) चाकू आणि स्टोन दोन्ही स्वच्छ करा.
धार लावण्याचं काम पुर्ण झाल्यावर चाकू व्यवस्थित धुवा.
स्टोन धुवायचा की नाही ते स्टोनच्या प्रकारानुसार ठरेल.
ऑईल स्टोन असेल तर कडक फायबर ब्रशने स्क्रब करा.तेल सगळं निघून जायला हवं.
वॉटर स्टोन व्यवस्थित धुवून घ्या, पूर्ण वाळल्यानंतर कोरडया कपडयात गुंडाळून ठेवा.
तुमचे चाकू लवकर बोथट होऊ नये म्हणून त्यांना चाकूच्या ब्लॉकमध्ये, चुंबकीय पट्टीवर किंवा चाकूच्या संरक्षक कव्हरसह ठेवा.
धोक्याची सूचना
चाकू वापरताना नेहमी काळजी घ्या. अगदी निस्तेज किंवा कमी धार असलेला चाकूही तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरला तर तुम्हाला दुखापत होऊ शकते.
धार लावायला आवश्यक गोष्टी
1) धार लावणारा दगड
2) कपडे
3) पाणी किंवा तेल
4) स्प्रे बाटली
5) चाकू गार्ड, ब्लॉक किंवा चुंबकीय पट्टी
अशा आधुनिक पध्दतीने तुम्ही घरच्या घरी चाकू सुरी यांना धार लावू शकता.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
नेहमी स्वयंपाक करताना या चाकु सुरी ची मुलभूत गरज असते, त्यामुळे त्यांना वारंवार धार लावणे आवश्यक आहे, प्रत्येक वेळी धार लागणार्या कडे जाण्यापेक्षा या वरील उपायांनी गृहिणी, घरातील लोक धार लावु शकतील, अत्यंत महत्त्वाची, गरजेची पोस्ट प्रकाशित केली, धन्यवाद!