सौंदर्याबरोबरच आरोग्यदायी त्वचेसाठी फळांचे आणि भाज्यांचे “हे” रस उपयुक्त ठरतात

आरोग्याविषयी आपण आता सजग झालो आहोत. हे आरोग्य टिकवण्यासाठी आपण जिम, योग, सायकलिंग, एक्सरसाइज अशा गोष्टींवर भरपूर लक्ष केंद्रित करतो.

जर डाएटकडे जरासं दुर्लक्षच झालं तर आपल्या व्यायामाचे म्हणावे तसे रिझल्ट्स मिळत नाहीत. त्वचेवरही परिणाम होतो, चेहरा ओढलेला दिसतो.

योग्य डाएट आणि वेळोवेळी शरीर डीटॉक्स करणं हे शरीरासाठी गरजेचं असतं. आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही जपण्यासाठी या दोन्ही गोष्टींची गरज असतेच.

फळांचे आणि काही भाज्यांचे रस शरीरातून विषारी रस बाहेर टाकायला मदत करतात. यासाठी एक ग्लास फ्रुट ज़्युस किंवा एक ग्लास व्हेजिटेबल ज्युस यांचा रोजच्या आहारात नक्की समावेश करावा.

नियमित एक ग्लास ज्युस घेतल्यामुळं शरीराला नियमितपणे अ‍ॅंटी ऑक्सिडण्ट्स मिळतात. एका हेल्दी दिवसाची सुरवात आपण एक ग्लास ज्युसने करु शकतो.

ज्युसमुळे शरीरातील पाण्याचं योग्य प्रमाण राखलं जातं. त्याचबरोबर रक्तशुद्धीसाठी सुध्दा हे रस उपयोगी ठरतात.

पचनशक्ती सुधारणे, वजन कमी करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे या गोष्टीही रसाच्या नियमित सेवनाने शक्य होतात.

फळांच्या किंवा भाज्यांच्या रसाचे फायदे आपण समजून घेतले. आता हे रस तयार कसे करायचे हे समजून घेऊया.

1) आम्ल्पित्तामुळे होणारी जळजळ थांबवण्यासाठी रस : एक काकडी आणि थोडी ओव्याची पानं बारीक चिरून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावीत. हा रस गाळून घेऊन त्यात मीठ आणि काळी मिरी घालून हा ज्युस तुम्ही सकाळी पिऊ शकता.

या ज्युसमधून व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात मिळतं, शिवाय आम्लपितमध्ये जी जळजळ होते ती या रसाने थांबते.

2) शरीरामध्ये प्लेटलेट्स आणि हिमोग्लोबिनचे संतुलन राखण्यासाठी : दोन टोमॅटोंचा मिक्सर किंवा ज्युसर मधून रस काढून घेऊन त्यात एक चमचा मध आणि थोडं पाणी घालावं. या रसाच्या नियमित सेवनामुळे प्लेटलेट्स आणि हिमोग्लोबिनचं योग्य प्रमाण शरीरात राखलं जातं.

3) व्हिटॅमिन्स आणि योग्य पोषणमूल्य मिळण्यासाठी : एक सफरचंद आणि संत्र्याच्या काही फोडी एकत्र करून त्याचा रस काढता येतो. यात आवडीनुसार मध किंवा पाणी घालायचं. या रसाचं आठवडयातून तीनदा सेवन केलं तर शरीराला योग्य त्या प्रमाणात व्हिटॅमिन आणि पोषणमूल्य मिळतात. स्त्रिया आणि विद्यार्थी यांच्यासाठी हा रस विशेष लाभदायक ठरतो.

4) गाजर आणि पपईचा रस प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी : गाजर आणि पपई यांच्या मिश्रणाच्या ज्यूसमुळे शरीरात चांगली उर्जा जाणवते. त्वचेचा उजळपणा वाढतो. या रसामुळे संसर्गजन्य आजारांशी लढण्याची प्रतिकारशक्ती सुधारते. दृष्टी सुधारते.

5) ऍण्टिऑसिडन्ट्स वाढवण्यासाठी गव्हांकुरांचा रस : गव्हांकुर रसामुळे अँटीऑक्साडेंटस शरीरात वाढायला मदत होते. गव्हांकुर रसाच्या नियमित सेवनाने त्वचा तरतरीत रहाते, सुरकुत्या पडत नाहीत.

6) रक्तशुद्धीसाठी डाळिंबाचा रस : डाळिंबाचा रस रक्तशुद्धीसाठी महत्त्वाचा ठरतो. रोज डाळींबाच्या रसाचं सेवन केल्यामुळे पेशींची पुन्हा निर्मिती होऊ शकते. शरीरातील पोषक तत्वात वाढ होऊन त्वचा नितळ होते.
डाळींबाचे दाणे छोटे आणि त्यात बिया असल्यामुळे स्वच्छ सुती कापडात डाळींबाच्या बिया बांधून त्याचा रस काढला जातो.

7) त्वचेचा पोत सुधारण्यासाठी लिंबाचा रस : आलं लिंबाच्या रसाचे बरेच फायदे आहेत. एका लिंबाचा रस मॅन्युअल लेमन ज्युसरने काढून त्यात चार थेंब आल्याचा रस घालायचा.

यामध्ये तुम्ही मध ही मिसळू शकता. हा लिंबू रस त्वचेला तरुण दिसायला मदत करतो.

या वेगवेगळ्या प्रकारच्या रसांची माहिती जाणून घेतल्यानंतर प्रश्न पडतो, नेमक्या कोणत्या रसाचं नियमित सेवन करावं ?

सुरवातीला आपल्या आवडत्या चवीचा रस निवडू शकता. शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यासाठी वेगवेगळ्या रसांची गरज असते.
त्यामुळे तज्ञांच्या मार्गदर्शनाने आपल्या समस्यांनुसार आपल्या डाएटमध्ये आपण फळांच्या आणि भाजीच्या रसांचा समावेश करु शकतो.

रसांसाठी भाज्या आणि फळं ताजी असावीत.
ती सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली असावीत. जी फळं किंवा भाज्या सेंद्रीय पद्धतीने पिकवलेली नसतात त्यावर कीटकनाशकांचा मारा केलेला असतो, त्यामुळे ही फळं किंवा भाज्या आरोग्याला मारक ठरु शकतात.

गरोदर स्त्रिया, मधुमेही व्यक्ती, हृदयविकार आणि ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने रसांचा आहारात समावेश करावा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।