पैसे वाचवण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी काय-काय विचार करू शकतो बरं आपण? किंवा कधी कधी असं पण असतं की हा विचार आपण करतच नाही!! पण म्हणूनच आजचा हा लेख न चुकता वाचा….
श्रीमंत व्हावं, गडगंज प्रॉपर्टी असावी असं प्रत्येकाचंच स्वप्नं असतं.
त्यासाठी गुंतवणूक करणं, वाढवणं, अतिरिक्त इनकम सोअर्स सुरू करणं, बचत करणं असे वेगवेगळे उपाय आपण करतो…
आता या सगळ्या उपायांच्या पलीकडे सुद्धा एक उपाय बरेच लोकं आजमावून बघतात, तो म्हणजे ‘कंजूसी’ करण्याचा….
२५ वर्षांचे ‘क्रेग क्योरलोप’ हे असेच लवकरात लवकर रिटायरमेंट घेण्याच्या तयारीला लागलेले आहेत.
अमेरिकेच्या कोलोरॅडो मधल्या या भागात राहणारे क्रेग, वयाच्या २८ व्या वर्षी रीटायर होता येईल अशी तयारी करण्याच्या मागे लागले आहेत.
अमेरिकेत ‘FIRE’ नावाने एक आंदोलन उभं राहिलं आहे. FIRE म्हणजे Financial Independence, Retire Early….
या आंदोलनाचा हेतू आहे, लवकरात लवकर आर्थिक स्वातंत्र्य आणि सेवानिवृत्ती म्हणजेच स्वेच्छा निवृत्ती मिळवणे!!
FIRE चे एक सदस्य असलेल्या, क्रेग क्योरलोप यांनी २८ व्या वर्षी रिटायर होण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे…
पण हे करता करता, आपल्याकडे सगळं काही असून त्याचा वापर करायचा नाही असं काहीसं मजेदार चित्र क्रेगच्या जगण्याकडे बघून दिसतं…
पण असं असूनही यातून सुध्दा काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत बरंका!!
कसं ते, या लेखात पुढे वाचा
यातून रिटायरमेंट लवकर घेण्याचा एक चांगला विचार अमलात आणता येऊ शकतो हे तर तुम्हाला समजेलच पण, अशी अर्ली रिटायरमेंट आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या नादात आपलं जगणं कसं विसरायचं नाही तेही समजेल…
(यात संबंधित लेखांच्या लिंक्स सुद्धा दिलेल्या आहेत. लेख वाचून झाल्यावर, त्यातील माहितीही तुम्ही वाचू शकता)
कंजूसी न करता पैसे वाचवण्याच्या स्मार्ट टिप्स खास तुमच्या साठी
बचत वाढवण्यासाठी क्रेग यांचे काही उपाय: बचत आणि अतिरिक्त इनकम वाढवण्यासाठी क्रेग क्योरलोप यांनी पहिला उपाय हा केला की, आपली बेडरूम भाड्याने दिली आणि ते स्वतः गेल्या दोन वर्षांपासून लिव्हिंग रूममध्येच राहतात.
क्रेग स्वतः एका मोठ्या कम्पनीत फायनान्शियल ऍनालिस्ट आहेत. त्यांनी आपली कार भाड्याने देऊन, सायकल ने ऑफिसला जाण्याची सुद्धा सुरुवात केली. हे करून त्यांनी दर महिन्याला 400 ते 600 डॉलर चा एक्सट्रा इनकम सुद्धा सुरू केला.
आता यावरून कंमेंट्स मध्ये हे सांगा की आपल्या भारतात, तुमच्या शहरात असं काही करून पाहिलं तर किती एक्सट्रा इनकम होऊ शकतो?
आपल्याला अगदीच एवढं नाही, तर कार पुलिंग चा विचार करायला तरी काही हरकत नाही.
क्रेग क्योरलोप यांचं तत्व असं आहे की, कुठलीही संपत्ती ही तेव्हाच उपयोगी आहे जेव्हा तुम्ही तिच्या पासून काही कमाई करता…
क्रेग असंही सांगतात की, तुम्ही जर एखादं घर खरेदी केलं आणि त्याला भाड्याने देऊन येणारं उत्पन्न हे कर्जाच्या व्याजा पेक्षा जास्त असेल तर कर्ज फिटे पर्यंत दर महिन्याला १०० ते २०० डॉलर इतकं अतिरिक्त उत्पन्न तुम्ही मिळवू शकाल.
आता हा हिशोब अमेरिकेतला असू शकेल, तो नक्कीच आपल्या कडे काहीसा बदलेल.
जाणकारांनी याबद्दल कंमेंट्स मध्ये आपली मतं नक्कीच सांगा. गुंतवणूक सल्लागार याबद्दल नक्कीच सांगू शकतील. आणि इतरांना माहिती सुद्धा देऊ शकतील.
क्रेग सांगतात की तुम्ही अशी संपत्ती उभी करा, ज्यातून तुमचा दुसरा इनकम सोअर्स उभा राहिल जो पुढचे खर्च भागऊ शकेल.
मित्रांनो, पैसा, सेवानिवृत्ती आणि आर्थिक स्वातंत्र्य यावर क्रेग क्योरलोप यांचे हे विचार आपल्याला टोकाचे वाटतील पण खुप चंगळवाद अनुभवल्या नंतर अमेरिकेत आता या विचार सरणीची एक चळवळ उभी राहिली आहे हे बघून यात सुद्धा काही गांभीर्य असू शकतं हे नक्कीच पटेल.
लेख कसा वाटला आणि अशा आर्थिक नीती बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कंमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका.
#आर्थिक नियोजन कसे करावे #आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे #आर्थिक नियोजन म्हणजे काय #आर्थिक नियोजन मराठी #आर्थिक आणीबाणी
https://manachetalks.com/10204/30-days-challenge-4-financial-health-marathi/
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
waah