काही वेळा एखाद्या जोडप्याला लवकर मूल नको असतं. किंवा पहिलं मूल झालेलं असताना दुसरं लगेच नको असतं आणि त्यासाठी प्रत्येकाची आपापली कारणे असतात.
ती योग्यही असतात. परंतु अनेकदा जोडप्यांना ग_र्भधारणा होऊ न देण्याचे उपाय माहीत नसतात आणि मग नको असताना देखील ग_र्भधारणा होते.
म्हणून आज आपण जाणून घेऊया की ग_र्भधारणा होऊ न देण्याचे उपाय कोणते आहेत.
त्यात अनेक घरगुती उपाय देखील आहेत. असे उपाय करणे सहज शक्य आहे.
त्यामुळे नको असलेली ग_र्भधारणा सहजपणे टाळता येऊ शकेल.
मूल होऊ देणे अथवा न होऊ देणे हा सर्वस्वी त्या जोडप्याचा निर्णय असतो.
काही वेळा स्त्रीचे वय लहान असल्यामुळे तिचे शरीर ग_र्भ धारण करण्यास विकसित झालेले नसते तर काही वेळा पहिले मूल झाल्यानंतर स्त्रीच्या शरीराची झालेली हानी भरून येईपर्यंत दुसरे मूल होणे योग्य नसते.
अशा वेळी ग_र्भ नियंत्रण करणे आवश्यक ठरते. पूर्ण निरोगी आणि सशक्त स्त्रीच एका निरोगी बाळाला जन्म देऊ शकते.
त्यामुळे योग्य वेळी ग_र्भधारणा होऊ देणे फार महत्वाचे आहे आणि तोपर्यंत ग_र्भधारणा होऊ न देण्यासाठी योग्य उपाय करणे आवश्यक ठरते.
चला तर मग अशा उपायांविषयी अधिक जाणून घेऊया
१. कॅलेंडर उपाय
स्त्रीच्या मासिक पा_ळीच्या तारखेकडे लक्ष ठेवले असता तिच्या अंडकोशातून बीज बाहेर येण्याचा दिवस जाणून घेता येऊ शकतो.
अशा दिवशी आणि त्याच्या आधी आणि नंतर २ दिवस असुरक्षित सं_भो_ग करणे टाळले असता ग_र्भधारणा होण्याचा धोका रहात नाही.
परंतु ह्यासाठी वर्षभर स्त्रीच्या मासिक पाळीच्या चक्राचा अभ्यास करून पाळीपासून ११ ते १८ दिवसांचा कालावधी ग_र्भधारणेचा असतो असे मानावे.
ह्या दिवसात असुरक्षित सं_भो_ग टाळावा.
२. शरीराचे तापमान
जेव्हा स्त्रीच्या अंडकोशातून बीज बाहेर येणार असते तेव्हा तिच्या शरीराचे तापमान वाढते.
त्यामुळे दररोज जर स्त्रीच्या शरीराचे तापमान मोजले तर ज्यादिवशी तापमान जास्त असेल तो दिवस ग_र्भधारणा होण्याचा असू शकतो हे लक्षात येईल.
अशा दिवशी असुरक्षित सं_भो_ग करणे टाळावे. म्हणजे ग_र्भधारणा होणे टाळता येईल.
३. कों_डो_मचा वापर
हा अर्थातच ग_र्भधारणा टाळण्याचा सर्वात सोपा आणि सुरक्षित उपाय आहे.
कों_डोमच्या वापरामुळे गर्भधारणा होण्याचा धोका तर नाहीच शिवाय कोणत्याही प्रकारचे संसर्ग होण्याचा धोका देखील रहात नाही.
तसेच कों_डो_मचा उपयोग न झाल्याची उदाहरणे अगदी कमी आहेत.
त्यामुळे हा ग_र्भधारणा न होऊ देण्याचा सर्वात लोकप्रिय उपाय आहे.
वर दिलेल्या उपायांपैकी कोणताही उपाय करणे शक्य झाले नाही तर काही घरगुती उपाय करून देखील ग_र्भधारणा थांबवता येते.
आता पुढे काही उपाय बघा. परंतु हे लक्षात घ्या की हे उपाय संपूर्णपणे सुरक्षित नाहीत आणि जर इतर सुरक्षित उपाय करणे जमले नाही तरच हे उपाय करा.
१. जंगली गाजराच्या बिया
जंगली गाजराच्या बियांमुळे प्रोजेस्टेरॉन हॉरमोनचे संतुलन बिघडते आणि त्यामुळे ग_र्भधारणा होण्यास अडथळा निर्माण होतो.
असुरक्षित सं_भो_ग केल्यानंतर सलग ७ दिवस जंगली गाजरांच्या बियांचे सेवन केल्यास ग_र्भधारणा टाळली जाऊ शकते.
२. कडूनिंब
आयुर्वेदात पूर्वीपासून कडूनिंबाचा वापर ग_र्भनिरोधक म्हणून केला जातो.
कडूनिंबाची पाने आणि त्या पानांचे तेल औषध म्हणून वापरले जाते.
कडूनिंबाची पाने आणि तेल ह्या दोन्हीचे सेवन स्त्री पुरुष दोघांनीही केले असता तात्पुरते वं_ध्यत्व येते म्हणजेच ग_र्भधारणा होत नाही.
३. पुदिना
सहजपणे उपलब्ध असणारा पुदिना देखील ग_र्भनिरोधक म्हणून वापरला जातो.
चहाबरोबर पुदिन्याची पाने उकळून त्याचे सेवन केले असता तात्पुरते ग_र्भनियंत्रण शक्य होते परंतु ह्याचा अतिवापर टाळावा.
४. ओवा
ओवा देखील आयुर्वेदात उपयुक्त ग_र्भनिरोधक म्हणून सांगितला गेला आहे.
आणि ओव्याचे काही दुष्परिणाम देखील नाहीत. त्यामुळे उपाय करून पाहण्यास हरकत नाही.
५. विटामीन ‘सी’ युक्त आंबट फळे
लिंबू, आवळा, पेरू अशी विटामीन ‘सी’ असणारी आंबट फळे देखील उपयुक्त आहेत. असुरक्षित सं_भोग केल्यानंतर ३ दिवसांनी ही फळे अथवा विटामीन ‘सी’ असणाऱ्या गोळ्या ह्यांचे २ वेळा सेवन करावे.
६. पपई
पपई हे उष्ण प्रवृत्तीचे फळ असल्यामुळे ग_र्भधारणा रोखण्यास मदत होते. तसेच ग_र्भधारणा झाल्यावर पपई खाल्ली असता ग_र्भपात होऊ शकतो.
७. सुके अंजीर
२ ते ३ सुकी अंजिरे खाल्ली असता ग_र्भधारणा होण्यास अडथळा निर्माण होतो.
परंतु ह्याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर पोट बिघडून त्रास होऊ शकतो. म्हणून हा उपाय करताना खबरदारी घ्यावी.
तर हे आहेत ग_र्भधारणा रोखण्याचे घरगुती उपाय. परंतु अर्थातच हे उपाय पूर्णपणे सुरक्षित नाहीत.
अन्य सुरक्षित उपाय शक्य नसतील तरच हे उपाय करावेत आणि शक्यतो सुरक्षित उपायांचाच वापर करावा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.