स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला आजारांपासून दूर ठेवतील

जाणून घ्या आपल्या स्वयंपाक घरात असलेल्या नैसर्गिक प्रतिजैवकांविषयी

आपण कधी न कधीतरी आजारी पडतो. पण काही वेळा लगेचच डॉक्टर गाठायची गरज नाही पडत.

आपल्या घरातच असणारी काही अँटिबायोटिक्स वापरुन आपण बरे होऊ शकतो. ती नैसर्गिक प्रतिजैवके कोणती आहेत? त्यांचे उपयोग काय?

त्यांच्या वापरायच्या पद्धती कोणत्या? याबद्दल जाणून घेऊयात आजच्या लेखात.

माझी आजी आम्ही लहानपणी आजारी पडलो कीं लगेच डॉक्टर कडे न्यायची नाही. खोकला झाला कीं हळद आणि दूध, तुळस-मिरे-लवंग-सुंठ घालून केलेला काढा हें औषध ठरलेलंच….

पोटात दुखू लागले एरंडेल प्यायला द्यायची. ओवा खायला द्यायची.

हे नुसखे तुमच्या बाबतीतही वापरले असतील न तुमच्या आजीने, आईने?

खरे तर आपल्या घरातच आपण रोज वापरतो असे काही पदार्थ असतात की ज्यांचा उपयोग आपल्याला फारसा माहीत नसतो.

तशीच आपल्या सर्वांच्या घरात असणारी नैसर्गिक प्रतीजैवकेही सुद्धा मोलाचे काम करतात.

त्यांच्या वापराने आपल्या शरीरातील कृमी, विषाणू नष्ट होतात. चला पाहुयात की नैसर्गिक प्रतिजैवके (अँटिबायोटिक्स) कशी काम करतात.

नैसर्गिक प्रतीजैवकांचे काम- प्रतिजैवके साधारणपणे मानवी शरीरातील कृमी आणि विषाणू नष्ट करण्यासाठी वापरली जातात.

सध्याच्या आधुनिक वैद्यकीय उपचारांमध्ये याचा जास्त वापर होतो आहे. मात्र ही प्रतिजैवके खूप प्राचीन काळापासून वापरली जात आहेत.

बहुतांश प्रतिजैवके ही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून तयार केलेली आहेत.

अनेक औषधी वनस्पति, तेल, पिठे यांच्यातील अंश आधुनिक प्रतिजैवकांमध्ये वापरण्यात आला आहे.

हळद, लसूण, मध, तुळस यांसह असंख्य पदार्थांमध्ये प्रतिजैवकांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ते जसेच्या तसे खाल्ले तर त्याचा दुष्परिणाम होत नाही.

पण काही पदार्थ मात्र आपण थेट तोंडवाटे खाऊ शकत नाही. त्यासाठी त्यावर प्रक्रिया करावी लागते. चला तर मग जाणून घ्या आपल्या नैसर्गिक प्रतिजैवकांविषयी.

1) मध– मध हा प्राचीन उपचार पद्धतीमध्ये खूप महत्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे नैसर्गिक प्राचीन प्रतिजैवकांमध्ये मधाचा वापर खूप केला जात होता.

त्यामुळे भारतासह इजिप्त देशातही याचा वापर त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठी केला जात होता.

मधात हायड्रोज पॅराक्सोईडचा अंश असतो. त्यामुळे मध हा बहुतांशपणे प्रतिजैवक म्हणून वापरला जातो.

मध चवीला मधुर रसचा असल्याने त्यात साखरेचे प्रमाण अधिक असते. तसेच तो उष्ण गुणाचा आहे. त्यामुळे मधाच्या सेवनाने शरीरात तयार होणार्‍या कृमीवर नियंत्रण राहते.

मध शरीरातील आद्रता शोषून घेतो, त्वचेचा वर्ण सुधारतो. मधाचा वापर अनेक पदार्थांसोबत केला जातो. मध तुम्ही जसा आहे तसा खाऊ शकता. तसेच काही पदार्थांसह खाऊ शकता, वापरू शकता.

  • त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठी- मध आणि लिंबू किंवा मध आणि हळद एकत्र करून चेहर्‍यावर लावावे.
  • वजन कमी करण्यासाठी- गरम पाण्यासह एक चमचा शुद्ध मध आणि एक चमचा लिंबाचा रस घालून सकाळी पिणे.
  • जखम भरण्यासाठी- जखम झाली त्या ठिकाणी मध लावणे.

2) लसूण- आपल्या स्वयंपाक घरातील महत्वचा घटक म्हणजे लसूण.

याच्याशिवाय कोणताही तिखट आणि झणझणीत पदार्थ होऊ शकत नाही. त्यामुळे लसूण हा किचनमध्ये असायलाच हवा.

पण या एवढ्या लहान लसणाच्या पाकळ्यांमध्ये खूप मोठी औषधी शक्ति दडलेली आहे.

लसूणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रतिजैवकांचे प्रमाण असते. त्यामुळे तुम्ही आहारात त्याचा वापर कराच.

लसणाचे तेलही खूप लाभदायक आसते. हे तेल तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता.

त्यासाठी ऑलिव तेलामध्ये (जैतून तेल) चार पाच लसूण पाकळ्या आणि लवंग टाकून तेल बनवू शकता. लसूण हा जरी पोटाच्या तक्रारीवरती चांगला उपाय असला तरी जास्त सेवनामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो.

त्यामुळे लसूण अति प्रमाणात खाऊ नये. लसूण हा अतिउष्ण गुणाचा आहे.जाणून घ्या प्रमाणात लसूण खाण्याचे फायदे.

  • रक्त पातळ करणे- लसूण खाण्याने शरीरातिल रक्त पातळ होते.
  • सर्दी, पडसे- सर्दी,पडसे झाल्यास लसूण पाकळ्या घालून धुरी घ्यावी. तव्यावर भाजून खावा.

3) लवंग- लवंग दातांच्या मजबुतीसाठी वापरलं जातं हेच नेहमी आपल्याला ज्ञात असतं. पण वेगवेगळे बॅक्टेरिया संपवण्यासाठी सुद्धा लवंग उपयुक्त ठरू शकते.

4) थाईमचे तेल ओव्याच्या चविसारखी साधारण चव असणारी ही वनस्पति आहे. यापासून तेलही बनवतात.

सर्व स्वच्छतेच्या द्रव्यांमध्ये थाईम पासून तयार केलेल्या तेलाचा वापर खूप प्रमाणात केला जातो. कारण हिच्यामध्ये विषाणू नष्ट करण्याची क्षमता अधिक आहे.

त्यामुळे या वंनस्पतीपासून तयार केलेल्या तेलाचा वापर अँटीबॅक्टेरियल म्हणून केला जातो.

थाईम आणि लवेंडरच्या तेलाचा मिश्रित वापर केल्यास 120 प्रकारचे विषाणू, कृमी नष्ट होऊ शकतात असे संशोधनात आढळून आले आहे.

पण थाईमच्या तेलाचा वापर हा फक्त बाहेरील कृमी, विषाणू मारण्यासाठी होतो.

मानवी शरीरावर त्याचा थेट वापर होत नाही. तुम्ही थाईम तेल पिऊ शकत नाही.

थाईम तेलाच्या थेट त्वचेवर वापर झाल्यास जळजळ होते आणि खाज सुटते. थाईरॉईड आणि उच्चरक्तदाब असणार्‍यांनी याचा वापर टाळावा.

5) ओव्याच्या पानाचे तेल- ओवा आपल्या सर्वांनाच माहीत आहे. प्रत्येकाच्या घरात पोटदुखीवर हमखास घेतले जाणारे हे पारंपरिक औषध.

ओवा चवीला तुरट, तिखट असतो आणि त्याला एक उग्र वास असतो. पोटदुखी, पित्त-गॅसमुळे पोट फुगणे यावर ओवा गुणकारी आहे.

ओव्याच्या हिरव्या पानाचाही रस अश्या आजारात दिला जातो.

ओव्याच्या हिरव्या पांनापसून तेल तयार करतात. ज्याचा वापर प्राचीन काळापासून अनेक उपचारांमध्ये केला जोत आहे. ओव्याचा वापर कसा करायचा, ते पाहुयात.

  • गॅस आणि अपचनासाठी- ओवा चावून खवा किंवा भाजून खवा.
  • सर्दी- ओवा विस्तवावर टाकून त्याची धुरी घ्यावी.
  • इसब-नायटा अश्या त्वचा रोगासाठी- ओव्याच्या पानाचे तेल खोबरेल तेलात मिसळून त्वचेच्या भागावर लावावे.
  • घरातील विषाणू नष्ट करण्यासाठी- ओव्याच्या पानाचे तेल, व्हीनेगर, पाणी आणि लिंबू रस यांना एकत्रित करून तुम्ही घरच्या घरी घरच्या स्वच्छतेसाठी, फरशी पुसण्यासाठी क्लीनर बनवू शकता. यामुळे घरात डास, माशी आदि किटकही येणार नाहीत आणि वासही छान राहील.

6) आलं – काही संशोधनांमध्ये हे सुद्धा आढळून आलेलं आहे कि आळ्यामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात. वेगवेगळ्या बॅक्टेरियांना मारण्याची क्षमता आल्यात मूलतःच असते. आजारपणात काहीवेळा जाणवणारी मळमळ आणि रक्तातल्या साखरेच्या प्रमाणाच्या नियंत्रणाबद्दल आल्याचे काही उपयोग यावरही काही संशोधन चालू आहेत.

तरीही नैसर्गिक असणारे सगळेच घटक सुरक्षित असतात असेही नाही. आल्याचे जास्त प्रमाणात सेवन हे एखादी सर्जरी झालेली असताना टाळावे. तसेच आल्याचे जास्त सेवन केले तर HIV साठी असणाऱ्या काही औषधांचा योग्य तसा परिणाम होऊ शकत नाही. म्हणून काही आजार असल्यास डॉक्तरांच्या सल्ल्याने आहार घ्यावा.

अश्या प्रकारचे हे नैसर्गिक प्रतिजैवके अर्थात अँटिबायोटिक पदार्थ आपल्या घरात तर असतात व त्यांचे उपयोग आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.

आपल्या आसपासच्या निसर्गातून त्याहीपेक्षा आपल्या स्वयंपाक घरातून औषधी जिन्नस मिळतात, त्याचे उपयोग कधी माहीत असतात तर कधी नसतातही.

निसर्गाने दिलेल्या या औषधी खजिन्याचा योग्य वापर करा आणि आपले आरोग्य जपा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।