देख, देख, देख, यहॉ वहॉ न फेक कचरा
फैलेगी बिमारी होगा बुरा हाल
गाडीवाला आया है कचरा निकाल
आमच्या एरियात सकाळी साधारणतः ९ वाजता कचरा वाहून नेणारी गाडी हे गाणे वाजवत वाजवत येऊन अख्खी सोसायटी जागी करते आणि ऑफिस ची घाई असो की प्रत्येकाला कुठे ना कुठे जायचं असो गाडी आली की सर्वजण आपापल्या कचरा बास्केट घेऊन गेट बाहेर तयार दिसतात..
असं वाटतंय काही विकायला आलंय किंवा निवडणुका आल्यात की काय असे वाटायला लागते 😀
आपोआप पाय बाहेर पडतात.. समोर असते ती महानगर पालिकेची कचरा वाहून नेणारी गाडी..
आता प्रत्येक महानगरपालिका आमचे शहर स्वच्छ दिसावे याकरिता रणांगणात उतरली आहे.. आता रिक्षा किंवा हातठेले न दिसता स्वचलीत गाडी बघायला मिळते..
सोबतच संकलन केंद्राची माहिती तसेच ओला आणि सुका कचरा कसा जमा करायचा, त्याचे वर्गीकरण, घरचा कचरा घरीच जिरवावा आणि त्यापासून कंपोस्ट कसे बनवायचे ही माहिती सांगतात पण अजूनही पाहिजे तशी जनजागृती झालेली नाही काही जन अजूनही कचरा गाडीमध्ये न टाकता जमा करून रस्त्यावर फेकतात किंवा जाळतात.
त्यामुळे बाकी नागरिकांना याचा त्रास होतो परिणाम दुर्घन्धी आणि त्यामुळे आजार आपले डोके बाहेर काढते याकडे महानगर पालिकेने लक्ष द्यायला हवे किंवा कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची अशाप्रकारचे उपक्रम राबवायला हवेत…,🙏
माझा स्वतःचा अनुभव म्हणजे रोजचा जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न आम्हाला सतत भेडसावत होता..
आधी कचरा गाडी एकतर रोज यायची नाही आलीतर सकाळी १० वाजता नंतर यायची आणि आम्ही त्याआधीच घराबाहेर पडायचो..
निवडलेल्या भाज्यांचा कचरा शेंगाची टरफले, फळांच्या साली, चहाचा चोथा खूप निघत असत आणि बाकी पण.. मग आम्ही तो बोरीत भरून गेटबाहेर ठेऊन जायचो.
कधी कधी गाडी यायचीच नाही आणि आली तरी गाडीवर नवीन आलेला व्यक्ती बोरी खालीच करीत नसे. परिणाम कचऱ्याचा दुर्गंध येत होता त्यामधून दुर्गंधीयुक्त पाणी निघत होते..
नंतर त्याची विल्हेवाट जाळून करीत होतो मग त्यामधून निघणारा धूर व त्यामुळे होणारे प्रदूषण आणि इकडे तिकडे उडायला नको म्हणून त्यावर सतत पहारा..
याकरिता नागपूरमधील GMVB ग्रुप म्हणजेच “गच्चीवरील मातीविरहीत बाग“… यांनी पुढाकार घेतलेला आहे. हा उपक्रम श्री. प्रमोद तांबेकर, पुणे यांनी सुरू केलेला असून त्यामधून त्यांचा वारसा आता नागपूरमध्ये सुद्धा हा उपक्रम (GMVB) ग.मा.वि.बा. ग्रुप राबवत आहेत.
आता प्रश्न पडतो मातीविरहीत म्हणजे काय? (मातीनिर्मिती) हे कसे शक्य आहे तर ते म्हणजे माती निर्माण करणे..
ही माती आपल्याला घरच्याच कचऱ्यापासून मिळते..
त्यामुळे आमचा कचऱ्याचा प्रश्नच सुटला. आता आमच्याकडील कचरा बाहेर जातच नाही .
कचऱ्यापासून कंपोस्ट बनविणे ही प्रक्रिया खूप कठीण नसून अगदी सोपी आहे. आपण घरीच माठामध्ये (ड्रिंलने छेद करून), छोट्या मोठ्या ड्रमला छेद करून किंवा खड्डा करून किंवा सिमेंट बोरी मध्ये तयार करू शकतो.
आम्ही एक ड्रम आणि 20ली. पेंटची बकेट यांना छिद्र करून यामध्ये रोज निघणारा स्वयंपाकघरातील वरील ओला कचरा जमा करतो.एक बकेट भरायला साधारण एक ते
दिड महिना लागतो.
जर त्यामध्ये जास्तच ओल असेल तर कागदाचे कपटे किंवा सुका पालापाचोळा टाकतो. त्यामध्ये अळ्या पण होतात परंतु त्या कचऱ्याचे विघटन करण्यास त्या आवश्यक असतात..
पूर्ण माहिती ही कार्यशाळेत मिळून आपण सुद्धा घरच्या घरी ही क्रिया करून कम्पोस्ट बनवू शकतो.. त्याला दोन तीन दिवसाआड फिरवत राहायचे.
थोडं गोमूत्र आणि मुठभर शेणखत टाकुन किंवा जुन्या तयार झालेल्या कंपोस्ट मधील थोडं culture म्हणून पण टाकू शकतो या प्रोसेसला जवळपास अडीच ते तीन महिने लागतात.
जेव्हा मातीसारखा वास येतो तेव्हा ते झाले आहे असे समजावे. बाहेर काढून थोडे वाळवून बारीक करून चाळून ठेवावे.
बनविलेले हे कम्पोस्ट आपण घरच्याच बागेसाठी वापरून त्यामधून सुंदर फुलझाडे किंवा भाजीपाला लागवड करू शकतो.
आमची बाग आता फुललीय हे केवळ शक्य झालंय ते ग.मा.वि.बा. मुळे.
जवळपास दोन वर्षांपासून आम्ही उभयतानी याची सुरुवात केलीय त्यामुळे या ग्रुपच्या सर्वेसर्वा असणाऱ्या मान्यवरांना धन्यवाद..🙏
कारण कुठलीही आर्थिक मदत नसून सुद्धा स्वखर्चाने आणि आपला अमूल्यं वेळ देऊन ते मार्गदर्शन या कार्यशाळेच्या माध्यमातून करीत असतात..
याशिवाय बरीच, अजून काय काय बनविता येईल याची सविस्तर माहिती दिल्या जाते.
पुढील वर्षी याच कचऱ्यापासुन गच्चीवर भाजीपाला लागवड करण्याचा आमचा मानस आहे. प्रशासनाने सुद्धा याची दखल घ्यावी आणि या उपक्रमाला काय काय लागतं याची आवश्यक ती मदत करावी.
याशिवाय टाकाऊतून टिकाऊ हे सुद्धा सहज शक्य होतंय कारण कुठलीही वस्तू बाहेर न फेकता त्याचा उपयोग आपण विविध प्रकारे करू शकतो..
जसे प्लॅस्टिक बॉटल, रिकामे पेंटचे डबे यांना वेगवेगळा आकार देऊन कापून पेंट केले तर त्यामध्ये आपण झाडे लावून घराला सुशोभित करू शकतो..
म्हणजेच वस्तू बाहेर जाणार नाही आणि इतरत्र फेकून कचरा होऊन थोडंफार का होईना प्रदूषनाला आळा घातल्या जाईल.
अशा प्रकारच्या कार्यशाळा वगैरे जर घेतल्यात तर निश्चितच जन जागृती होऊन आपले शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यास आणि प्रदूषणमुक्त शहर ठेवण्यास खारीचा वाटा उचलू यात चला तर मग कशाला वाट बघता…
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Plz.inform or mail me.the manner to revive my jasmine plant.n general mode of reviving any plant viz. Kaduna limbu.
कडूलिंब हे किटनाशक,जंतुनाशक आणि बुरशीनाशक म्हणून वापरले जाते.निम पेंड ,निम तेल विविध प्रकारे वापरू शकतो.कोणत्याही प्लांटला निंबोळी पेंड जर आपण जर टाकले तर नायट्रोजन चा झाडांना पुरवठा होतो.या झाडाची पाने ,साल ,बिया या सर्वांचा उपयोग आपण करू शकतो.. निम तेलाची फवारणी केल्यास सर्व कीड नाहीशी होऊन आपले झाड heathy राहते..
कडुलिंबाची पाने कोवळ्या काड्यासाहित उकळायला ठेवावे त्यात थोडे खोबरेल तेल आणि चिमुतभर तुरटी पावडर टाकून पानं काळे होईपर्यंत उकळावे मिश्रण गाळून घ्या थंड झाल्यावर एक लिंबू पिळून टाकावे. फवारणीसाठी तयार…