मस्त रसरशीत केशरी रंगाचे संत्र पाहिले की ते खावेसे न वाटणारी व्यक्ति विरळाच. आपण सगळेच संत्री अगदी आवडीने खातो.
आणि संत्रे हे अतिशय गुणकारी आणि आरोग्यवर्धक फळ आहे हे आपल्याला माहीत असते, परंतु संत्र्यामध्ये असे ही गुण असतात की ते औषधाच्या स्वरूपात देखील वापरले जाते.
संत्रे हे केशरी रंगाचे रसदार आंबटगोड फळ आहे. संत्रे कफ, वात आणि पित्त अश्या तिन्ही प्रकृतीच्या लोकांनी खाणे गुणकारी आहे.
सर्दी, खोकला आणि कफावर संत्रे विशेष गुणकारी आहे.
संत्र्याचे फूल सुद्धा सुगंधी आणि मनमोहक असते. हे फूल तापावर गुणकारी औषध म्हणून वापरले जाते. तसेच संत्र्याच्या फुलाच्या औषधस्वरूपी सेवनाने मूत्रविकार बरे होतात.
संत्र्याचे विविध फायदे
१. त्वचाविकार – संत्र्याची साल वाळवून त्याची पूड करून मग त्यात गुलाब पाणी घालून ते मिश्रण चेहऱ्याला लावावे. त्यामुळे तारुण्यपिटिका (acne) कमी होऊन चेहरा तेजस्वी होतो.
२. टायफोइड – २०/३० मिलि संत्र्याचा रस नियमित प्यायल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे टायफोइड सारख्या आजारांमध्ये येणाऱ्या तापावर नियंत्रण ठेवता येते.
३. अशक्तपणा – संत्र्याच्या रसाच्या नियमित सेवनामुळे अशक्तपणा कमी होण्यास मदत होऊन तरतरी येते.
४. खाज येणे – संत्र्याच्या फुलाचा रस काढून त्याचे २ थेंब नाकात घालण्यामुळे आणि त्या रसाने शरीरास मालीश केल्यामुळे खाज येणे बंद होते, त्वचविकार बरे होतात.
५. ताप आणि खोकला – ताप आणि खोकला आला असता संत्र्याचा रस मीठ घालून पिण्यामुळे बरे वाटते.
६. भूक वाढण्यासाठी – संत्र्याच्या सालीचा काढा करून त्यात काही थेंब लिंबाचा रस घालूने त्याचे सेवन केल्यामुळे चांगले पचन होऊन अपचनाचा त्रास कमी होतो. तसेच पोट फुगणे, उलटी,जुलाब, भूक न लागणे ह्यावर ही संत्र्याचा रस गुणकारी आहे. पोटातील जंत कमी होण्यासाठी देखील उपयोग होतो.
७. मलेरिया – एका संशोधना अंती असे सिद्ध झाले आहे की संत्र्यामध्ये मलेरिया च्या विषाणूंशी लढण्याची ताकद असते. त्यामुळे मलेरियाच्या रुग्णांना संत्र्याचा रस दिला असता फायदा होतो.
८. रक्तदाब – नियमित संत्रे अथवा संत्र्याच्या रसाचे सेवन करणे हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
९. कॅन्सर – कॅन्सर च्या रुग्णांना संत्र्याच्या सेवनाने फायदा होतो असे दिसून आले आहे.
१०. डोळ्यांची आग/ जळजळ – डोळ्यांच्या विकारांवर देखील संत्रे गुणकारी आहे. डोळ्यांची होणारी आग व जळजळ कमी होण्यास संत्र्याचा रस मदत करतो.
संत्रे औषध म्हणून काढा आणि रस ह्या स्वरूपात सेवन करता येते.
काढा – ५ ते १० मिलि
रस – २० ते ३० मिलि
ह्या प्रमाणात सेवन करावा.
शिवाय संत्रे हे फळ म्हणून खाणे तर उपयुक्त आहेच. त्यात विटामीन ‘सी’ भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ति वाढते.
तर असे हे बहुगुणी संत्रे. त्याचे फळ, फूल, साल, पाने सगळंच गुणकारी आणि उपयुक्त आहे.
तर मित्रांनो तुम्हीही संत्र्याचे नियमित सेवन करा आणि ह्या फायद्यांचा लाभ घ्या.
स्वस्थ रहा. आनंदी रहा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.