पपईच्या बियांचे आणि पानांचे हे उपयोग तुम्हाला माहीत आहेत का? 

किंचित गोडसर लागणारी पपई क्वचितच कोणाला आवडत नसेल.

पपई आवडीने खाणारे अनेक जण असतात. तब्येतीला चांगले, पौष्टिक पदार्थ हे चविष्ट नसतात या वाक्याला खोडून काढणारे उदाहरण, म्हणजे पपई.

नुसत्या फोडी नाश्त्यासोबत खायला, कधी दुपारच्या वेळी फोडींना मीठ लाऊन खायला छान लागणाऱ्या पपईचा रस काढून प्यायला छान लागतो आणि तो तितकाच पौष्टिक सुद्धा असतो. 

खरेतर पपईचे फळच नव्हे तर पाने आणि बिया सुद्धा अनेक पोषक द्रव्यांने परिपूर्ण असतात.

यामध्ये व्हिटामिन ए, बी, सी, ई आणि के, मिनरल्स, फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात.

पपईच्या पानांमध्ये फॉस्फरस, पोटॅशिअम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ही महत्वाची खनिजे असतात तर बियांमध्ये फॅट जास्त प्रमाणात असतात.

यामुळे पपई ही आपल्या बिया आणि पानांसह अत्यंत पौष्टिक असते.

पपईबद्दल एक सर्वश्रुत माहिती म्हणजे पपईची पाने औषधी असतात आणि त्यांचा उपयोग डेंग्यूच्या तापात केला जातो. 

पण पपईचे, पपईच्या पानांचे आणि बियांचे  या व्यतिरिक्त सुद्धा अनेक फायदे आहेत. आज या लेखात आपण या फायद्यांबद्दल चर्चा करणार आहोत. 

१. डेंग्यू तापावर हमखास उपाय 

पपईच्या पानांचा रस हा डेंग्यूवर अत्यंत प्रभावी उपाय आहे.

डेंग्यूवर दिल्या जाणाऱ्या आधुनिक उपचारांबरोबरच पपईच्या पानांचा रस घेतला तर ताप झटकन कमी व्हायला मदत होते. डेंग्यू झाल्यावर रक्तातील प्लेटलेटचे प्रमाण कमी होते.

हे प्रमाण जर कमी होत गेले तर त्यामुळे अनेक समस्या होऊ शकतात. पण पपईच्या पानांच्या रसाने शरीरातील प्लेटलेटचे प्रमाण  वाढायला मदत होते.

यामुळे डेंग्यूमध्ये होणारे इतर त्रास जसे की शरीरावर रॅश येणे हे सुद्धा होत नाहीत. 

डेंग्यू झाला असल्यास सकाळ संध्याकाळ एक ग्लास पपईच्या पानांचा रस काढून प्यायल्याने प्लेटलेट काउंट वाढण्यास मदत होते. 

२. मलेरियापासून बचाव 

डेंग्यूच्या उपचारांमध्ये प्रभावी असलेली पपईची पाने ही मलेरिया सारख्या तापापासून बचाव करण्यासाठी सुद्धा परिणामकारक असतात.पपईच्या पानांमध्ये असणारे असीटोजेनीन हे द्रव्य मलेरियापासून बचाव करते. 

३. पचनशक्ती सुधारते 

पपईच्या पानात आणि बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतात. फायबर हे शरीराच्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर असतात.

यामुळे पचनक्रिया सुधारते आणि काॅन्स्टीपेशन सारख्या तक्रारी दूर होतात. 

पपईमध्ये असणारे पपाइन हे द्रव्य पचनक्रिया सुधारण्यास उपयुक्त असते. पपाइन हे विशेषतः प्रथिनांच्या (प्रोटीन्स) पचनासाठी परिणामकारक असते. 

सकाळी एक ग्लास पपई च्या पानांचा रस प्यायल्याने अपचन, काॅन्स्टीपेशनचे त्रास नाहीसे होतात. 

४. कॅन्सरपासून बचाव 

पपईच्या पानांमध्ये असणाऱ्या लायकोपिन या द्रव्यात कॅन्सरपासून बचाव करण्याचे गुणधर्म असतात. शरीरातील पेशींची अति प्रमाणात वाढ झाल्यास कॅन्सर होतो.

लायकोपिनहे श कॅन्सर पेशींना शरीरात तयार होण्यापासून रोखते.

प्रोस्टेट आणि गुदद्वाराच्या कॅन्सरपासून बचाव करण्यात पपईची पाने विशेष परिणामकारक असतात.

पपईच्या पानांमध्ये असणाऱ्या अँरिऑक्सिडंट्समुळे सुद्धा कॅन्सर पेशींच्या वाढीला आळा बसतो ज्यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो. 

५. रोग प्रतिकारशक्ती वाढवते 

पपईच्या पानांमध्ये असणारी द्रवे, जसे की फीनॉलिक कमपाउंड, पपाइन हे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास कारणीभूत असतात.

यामध्ये मुबलक प्रमाणात असणाऱ्या व्हिटामिन आणि अँटिऑक्सिडंट्समुळे देखील रोग प्रतिकारशक्ती सुधारते.

यामुळे वातावरणात बदल झाल्यावर होणाऱ्या इन्फेक्शन पासून बचाव होतो. 

पपईचे  नियमित सेवन केल्यास शरीरात नवीन पेशी जोमाने तयार होतात, म्हणजेच  जखमा भरून यायला पपई हा एक प्रभावी उपाय आहे.

रोज सकाळी एक वाटीभर पपईच्या फोडी नाश्त्याबरोबर खाल्याने हे फायदे शरीराला होतात. 

६. मधुमेह आटोक्यात ठेवते 

पपईच्या पानांच्या रसाच्या नियमित सेवनाने गोड खायची इच्छा हळूहळू कमी होत जाते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही आणि मधुमेह आटोक्यात राहतो. 

७. वजन कमी करण्यास फायदेशीर 

पपईमध्ये कॅलरी जास्त प्रमाणात नसतात, तर फायबर खूप जास्त प्रमाणात असतात. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे.

यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्याने एक ग्लास पपईचा रस प्यायल्याने पोट भरते आणि लवकर भूक सुद्धा लागत नाही. यामुळे जास्तीच्या कॅलरी पोटात जात नाहीत जे वजन कमी व्हायला फायद्याचे असते. 

या फायबरचा अजून एक फायदा म्हणजे यामुळे शरीरारी चयापचय क्रिया (मेटॅबॉलीझम) सुधारते ज्यामुळे वजन कमी करायला फायदा होतो. 

८. मासिक पाळीतील दुखणे कमी करते 

मासिक पाळी दरम्यान गर्भपिशवीचे  आकुंचन होत असते. यामुळे या दिवसात बायकांना ओटीपोटात दुखते. काही वेळा, काहीजणींना या दुखण्याची तीव्रता खूप जाणवू शकते.

अशावेळी  पपईची पाने आणि बिया हे दुखणे कमी करतात.

पपईची पाने आणि बिया गर्भपिशवीचे आकुंचन कमी करतात ज्यामुळे दुखणे कमी व्हायला मदत होते.

पपईमध्ये असलेले पपाइन हे द्रव्य मासिक पाळीत रक्तस्त्राव नियंत्रित करते ज्यामुळे दुखण्याचे प्रमाण कमी होते. 

९. ह्रदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर 

पपईमध्ये जास्त प्रमाणात आढळणाऱ्या व्हिटामिन आणि अँटिऑक्सिडंट्समुळे ह्रदयाच्या आरोग्यासाठी ती अतिशय फायदेशीर असते. यामुळे ह्र्दयविकाराचे धोके कमी होतात.

पपईमध्ये व्हिटामिन ‘सी’ आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात असतात.

यामुळे शरीरातील रक्त पुरवठा सुधारतो यामुळे धामण्यांमधून होणारा रक्तप्रवाह नियंत्रणात राहतो आणि त्यामुळे ह्रदयाला होणारा रक्त पुरवठा सुद्धा सुधारतो.

पपईच्या पानांच्या नियमित सेवन हे ह्रदयाच्या आरोग्यासाठी म्हणूनच उपयुक्त असते. 

१०. निरोगी त्वचेसाठी उपयुक्त 

पपईच्या अनेक फायद्यांपैकी एक म्हणजे पपई आणि तिची पाने हि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या पोषक द्रव्यांमुळे पपई आणि पपईची पाने ही त्वचा निरोगी ठेवण्यात गुणकारी असतात.

पपईच्या नियमित सेवनाने त्वचा टवटवीत, तजेलदार आणि उजळ दिसायला लागते. पपईचा गर काढून चेहरयाला लावला  तर कोरड्या आणि रुक्ष त्वचेच्या सगळ्या तक्रारी नाहीशा होतात. 

पपईमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेवर वयानुसार येणाऱ्या सुरकुत्यांचे प्रमाण कमी होते. याशिवाय जखमा भरून यायला, जखमांमध्ये पू होऊ नये म्हणून सुद्धा पपईच्या पानांचा  वापर केला जातो. 

मित्रमैत्रिणींनो, पपईच नाही तर तिची पाने आणि बिया सुद्धा आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात याची खात्री हा लेख वाचून तुम्हाला पटली असेल.

पचनक्रिया सुधारण्यासाठी, ह्रदयाच्या आरोग्यासाठी तसेच डेंग्यूवर उपाय पपईचा, पपईच्या पानांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.

तसेच बाह्य सौंदर्यासाठी, त्वचेच्या आरोग्यासाठी किंवा जखमा लवकर भरून येण्यासाठी, जखमांचे व्रण राहू नयेत यासाठी पपईच्या पानांचा रस त्वचेला लावणे सुद्धा फायदेशीर असते. 

अशी ही बहुगुणी पपई तुमच्या शॉपिंग लिस्ट मध्ये लिहायची आवर्जून आठवण ठेवा! 

https://manachetalks.com/10828/bebefits-of-papaya-marathi-papaichya-sevnache-fayde-marathi/

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।