शारीरिक स्वास्थासाठी सकस आहार घ्यावा, त्यात जास्तीत जास्त ताज्याभाज्यांचा आणि फळांचा समावेश करावा असे म्हणतात ते काही उगाच नाही.
आपल्या आहारात आपण ज्या भाज्या आणि फळे नियमितपणे घेतो त्याचे आपल्या नकळत आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतात.
खरेतर ही फळे आणि काही भाज्या सुद्धा आपण नियमितपणे, त्या त्या सिझनमध्ये खात असतो.
पण जर या फळांचे नेमके फायदे तुम्हाला समजले तर तुम्ही अगदी आवर्जून त्यांचा समावेश तुमच्या आहारात कराल आणि तुमच्या प्रियजनांना सुद्धा योग्य ते मार्गदर्शन कराल.
तसेच जर कोणाला एखादे फळ आवडत नसेल तर आवड म्हणून नाही, तरी निदान आरोग्यासाठी म्हणून ते फळ का खाल्ले पाहिजे याचे महत्व पटेल.
हाच विचार डोक्यात घेऊन आज या लेखात आम्ही तुम्हाला डाळिंब कसे आरोग्यपूर्ण आहे आणि त्याचे आपल्याला काय फायदे आहेत हे सांगणार आहोत.
जेणेकरून तुम्ही या फळाचा अमावेश तुमच्या आहारात करून तो जास्तीतजास्त आरोग्यपूर्ण करू शकता.
डाळिंब हे एक अत्यंत पौष्टिक फळ आहे.
डाळींबामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असले तरी त्यात कार्बोहायड्रेट्स, फायबर सुद्धा आढळतात.
डाळिंब हे एक लो कॅलरी फळ आहे.
साधारण एका मध्यम आकाराच्या डाळींबात केवळ ८३ कॅलरीज असतात.
लो कॅलरी डायट करणाऱ्यांसाठी डाळिंब हा म्हणून एक चांगला पर्याय आहे.
यामध्ये व्हिटामिन ‘बी’, ‘के’ हे सुद्धा जास्त प्रमाणात असतात.
पोटॅशियम हे खनिज डाळिंबात मुबलक प्रमाणात आढळते.
कॅलरी कमी असल्या तरी व्हिटामिन आणि मिनरल्सने परिपूर्ण असणाऱ्या या फळाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, कसे ते आपण पुढे बघूया.
१. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
ज्यांना वजन कमी करायचे असते त्यांना व्यायामाबरोरच आहारात सुद्धा अनेक बदल करावे लागतात.
त्यांना शक्यतो जास्त करून कमी कॅलरी असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.
फळे जरी आरोग्यासाठी चांगली असली तरी काही फळे ही हाय कॅलरी असतात त्यामुळे डायटमध्ये त्यांचा समावेश करता येत नाही.
पण तुम्ही जर लो कॅलरी डायट करत असाल, वजन कमी करायचे असेल तर डाळिंब हा एक चांगला पर्याय आहे, कारण त्यात अतिशय कमी प्रमाणात कॅलरी असतात.
२ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर
डाळींबात व्हिटामिन ‘सी’ भरपूर प्रमाणात असतात. व्हिटामिन ‘सी’ हे अँटिऑक्सिडंट्स असून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर असते.
यामुळे वेगवेगळ्या इन्फेक्शनचा धोका कमी होतो. व्हिटामिन ‘सी’ चा आहारात नियमितपणे समावेश केल्याने ह्र्दयविकार, स्ट्रोक यासारख्या आजारांचा सुद्धा धोका कमी होतो.
३. भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात
डाळिंबामध्ये असणाऱ्या फिनोलिक कंपाऊंडमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात.
यामध्ये टॅनीन हे अँटिऑक्सिडंट द्रव्य सुद्धा जास्त प्रमाणात असते.
अँटिऑक्सिडंट्स हे आपल्या शरीरासाठी गरजेचे असतात.
यामुळे शरीरातील सर्व पेशी आरोग्यपूर्ण राहतात. वयामुळे होणारे बदल, वेगवेगळ्या रोगांमुळे होणारे बदल हे अँटिऑक्सिडंट्स कमी करत असतात.
म्हणूनच आहारात जास्तीतजास्त अँटिऑक्सिडंट्स
चा समावेश केला पाहिजे. ताजी फळे, भाज्या यामध्ये अँटिऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात.
ग्रीन टी सुद्धा अँटिऑक्सिडंट्स साठी प्रसिद्ध आहे, पण डाळिंबामध्ये ग्रीन टी पेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात, अँटिऑक्सिडंट्स आढळतात.
यामुळे या फळाचा आहारात वापर करावा.
सकाळी नाश्त्याबरोबर डाळींबाचा ताजा रस पिणे आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा एक महत्वाचा पैलू आहे.
४. कॅन्सरपासून बचाव होतो
डाळिंबामध्ये अँटी कॅन्सर गुणधर्म असतात.
म्हणजेच या फळाच्या नियमित सेवनाने कॅन्सर सारख्या आजारांपासून बचाव होतो.
डाळिंबात जास्त प्रमाणात असणाऱ्या व्हिटामिन ‘सी’ मुळे आणि अँटिऑक्सिडंट्समुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
अँटिऑक्सिडंट्समुळे, फ्री रॅडिकल्समुळे शरीरातील विविध पेशींना होणारी हानी कमी होते, ज्यामुळे शरीरातील सर्व पेशी आरोग्यपूर्ण राहतात.
कॅन्सर, म्हणजेच पेशींची अनियमित वाढ.
डाळिंब खाऊन कॅन्सरपासून बचाव होण्यामागे हे महत्वाचे कारण आहे.
५. ह्रदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक
डाळिंबामध्ये असणारे फिनोलिक कम्पाउंड हे ह्रदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात.
यामुळे शरीरातील रक्तवाहिन्यात फॅट साठून राहत नाहीत.
यामुळे वाढत्या वयाबरोबर सुद्धा या रक्तवाहिन्यांची लवचिकता शाबूत राहते.
यामुळे ह्रदयाला होणारा रक्तपुरवठा नियमित राहतो आणि ह्रदयविकार दूर राहतात.
ज्यांना ह्र्दयविकारांचा धोका जास्त आहे, फॅमिली हिस्ट्री आहे, त्यांनी तर हे फळ आवर्जून खावे.
५. हाय ब्लड प्रेशरसाठी चांगले
डाळिंबाच्या रसाने ब्लड प्रेशर आटोक्यात राहते. ज्यांना हाय बिपी, किंवा हायपरटेन्शनचा (उच्चरक्तदाब) त्रास आहे, त्यांनी हे फळ नियमितपणे खावे.
यामध्ये जास्त प्रमाणात आढळणारे पाॅलीफिनोल हे वाढलेला रक्तदाब कमी करते.
यामुळे सुद्धा ह्र्दयविकाराची शक्यता कमी व्हायला मदत होते.
६. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर
मधुमेह ही आजकाल वाढती समस्या आहे.
हा आजार अगदी तरुण वयात सुद्धा होतो.
मधुमेहाच्या अनेक उपद्रवांपैकी एक म्हणजे मधुमेही लोकांना ह्रदयाचे विकार होण्याची शक्यता जास्त असते.
पण डाळिंब हे ह्रदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक असल्याने त्याचा फायदा हा मधुमेह असणाऱ्यांना सुद्धा होतो.
याशिवाय वर बघितल्याप्रमाणे या फळात कॅलरी कमी प्रमाणात असतात.
त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांसाठी मधल्या वेळेला खायला हा एक चांगला पर्याय आहे.
डाळिंब नियमितपणे खाल्याने रक्तातील साखरेची वाढलेली पातळी कमी व्हायला मदत होते.
वाढलेले वजन ही सुद्धा मधुमेहींमध्ये आढळणारी तक्रार आहे.
डाळींब वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त असल्याने ते मधुमेहींसाठी वरदानच आहे.
७. पचनक्रियेसाठी फायदेशीर
आपल्या आतड्यात असणारे जीवाणू (good bacteria) हे आपण खालेल्या अन्नाचे पचन करण्यासाठी गरजेचे असतात.
फायबर हे या जिवाणूंसाठी लाभदायक असते, यामुळे त्यांची व्यवस्थित वाढ होते.
डाळिंबात फायबर जास्त प्रमाणात आढळतात.
म्हणूनच पचनक्रियेसाठी डाळिंब अतिशय लाभदायक आहेत.
यामुळे पचनाच्या तक्रारी दूर होतात.
आहारात जर फायबरचे प्रमाण जास्त असेल तर कॉन्स्टीपेशनचा देखील त्रास होत नाही.
त्यामुळे जर अपचन, कॉन्स्टीपेशन यासारखे त्रास असतील तर रोज डाळिंब नाहीतर डाळींबाचा रस आवर्जून घेतला पाहिजे.
८. जीवाणूंची वाढ कमी करते
डाळिंबाच्या रसात अँटी बॅक्टेरीअल गुणधर्म असतात.
यामुळे शरीरात वाढणाऱ्या हानीकारक जिवाणूंचे, ज्यांच्यामुळे वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते, प्रमाण कमी होती.
डाळींबामध्ये जास्त प्रमाणात असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्स आणि पाॅलीफिनोलिक कम्पाऊंडमुळे शरीरात या जीवाणूंची वाढ होण्यापासून बचाव होतो.
डाळिंब, अशाप्रकारे एक अत्यंत आरोग्यपूर्ण फळ आहे. असे हे वेगवेगळ्या पोषक द्रव्याने परिपूर्ण असे फळ खायला देखील छान लागते त्यामुळे त्याचा आपल्या आहारात समावेश झालाच पाहिजे.
नाश्ता करताना डाळिंबाचा रस किंवा दुपारच्या मधल्या वेळेला भूक लागते तेव्हा ताज्या डाळिंबाचे दाणे खाणे हे डाळिंब आपल्या आहारात आणण्यासाठी चांगले पर्याय आहे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Very nice thought