ऍसिडिटी, ज्याला आपण मराठी मध्ये आम्लपित्त म्हणतो तो त्रास हा प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी होतोच.
प्रामुख्याने अनियमित जीवनशैली, हे यामागचं मुख्य कारण असतं.
ऍसिडिटीशी दोन हात करण्यासाठी आधी हे समजून घेतले पाहिजे कि, ऍसिडिटी म्हणजे नेमके काय? आजार असो किंवा आयुष्यातली कोणतीही गोष्ट, एवढं मात्र लक्षात ठेवा कि तिला तोंड देण्यासाठी आधी ती का होते, तीचं मूळ काय हे समजून घेतलं पाहिजे.
ऍसिडिटी किंवा आम्ल्पित्त म्हणजे काय?
आपण जे अन्न खातो ते पचण्यासाठी आपल्या पोटात म्हणजे जठरात एक पाचक रस तयार होत असतो. तो ऍसिडिक म्हणजे आम्लयुक्त असतो आणि पचनासाठी त्याचे असणे गरजेचे असते, पण ते योग्य प्रमाणात….
हा पाचक रस जास्त प्रमाणात तयार झाला किंवा अवेळी तयार झाला तर ऍसिडिटी होते.
यामुळे पोटात दुखणे, छातीत जळजळ होणे, डोकं दुखणे, आंबट ठेकर येणे, उलटी होणे, चक्कर येणे यांसारखे त्रास उद्भवतात. काहींना पित्ताचा त्रास होतो तेव्हा अंगावर खेज येते ज्याला आपल्या बोली भाषेत पित्त उभारणे असेही म्हणतात.
या आधीच उल्लेख केल्या प्रमाणे पित्त हे अनियमित जीवनशैली मुळे म्हणजेच दोन जेवणांमध्ये जास्त अंतर ठेवणे, जेवणाच्या वेळा अनियमित असणे, धूम्रपान, मद्यपान, अति तिखट, तेलकट किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन करणे, नेहमी तणावात असणे हि आम्ल्पित्ताची प्रमुख कारणे आहेत.
मद्यप्रेमींना मद्यपानानंतर दिवसभर ऍसिडिटी मुळे अस्वस्थता जाणवणे हे तर नित्त्याचेच असते. त्यांच्यासाठी या लेखात सांगितलेले उपाय हे नेहमीच्या सवयीचा भाग असणं हे कधीही चांगलं.
सध्या आपले जीवन हे सुपरफास्ट झाले आहे. सकाळी ऑफिसला निघताना चहा, टोस्ट वगैरे थोडं काही घेऊन घाई घाईत घरातून निघणे हि जर आपली सवय असेल किंवा गृहिणींना बरेचदा सकाळ पासूनच्या कामात नाश्ता घेण्याची सवयच नसते.
असे काही होत असेल तर सकाळचा नाश्ता कसा असावा याबद्दलचा लेख नक्की वाचा..
https://manachetalks.com/11287/marathi-healthy-breakfast-5-diet-tips-to-have-a-calcium-rich-breakfast/
या फास्ट फूडच्या जमान्यात रस्त्यावर कुठातरी उभे राहून पाणीपुरी, दाबेली, वडापाव खाणे हा आपल्या जगण्याचा एक महत्त्वाचा हिस्सा बनलं आहे.
पण यामुळे अमिबियासिस सारखे इन्फेक्शन होऊन ऍसिडिटी होण्याची शक्यता असते.
याशिवाय काही औषधांचे साईडेइफेट्स म्हणून सुद्धा ऍसिडीटीला सामोरे जावे लागते. बरेचदा दवाखान्यात ऍडमिट असताना इतर औषधांबरोबर एक ठरलेला डोस असतो… तो म्हणजे अँटासिडचा, ते याचमुळे.
ऍसिडिटी हा सामान्य आजार असला तर तो असह्य होतो, तो त्यामुळे वाटणाऱ्या अस्वस्थतेमुळे….
ऍसिडिटी पासून दूर राहण्यासाठी नियमित जेवण, रोज सकाळी भरपेट न्याहारी करून योग्य वेळी सात्विक आहार घेणे हा नियम जरी पाळला तरी ऍसिडिटीला दूर ठेवणे शक्य होऊ शकेल.
कपालभाती प्राणायाम, हलासन, उष्ट्रासन, भस्त्रिका प्राणायाम, अनुलोम-विलोम हि आसने नियमितपणे करूनही ऍसिडिटी पासून दूर राहणे शक्य आहे.
कुठलाहि आजार होऊन मग उपचाराला सुरु करण्यापेक्षा तो न होण्याची काळजी घेणं हे कधीही शहाणपणाचं आहे.
म्हणूनच या लेखात ऍसिडिटीवर काही घरगुती उपचार आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१) तुळशीची पाने
तुळशीच्या पानांच्या वातानुलोमी गुणधर्मामुळे आम्ल्पित्तात झटकन आराम मिळू शकतो. पोटात जळजळ होत असल्यास किंवा रोज सकाळी नियमितपणे ४-५ तुळशीची पाने खाण्याची सवय ठेवली तरी जठरातील आम्लांचे संतुलन ठेवण्यास मदत मिळते.
३-४ तुळशीची पाने गरम पाण्यात उकळून ते पाणी नियमितपणे पिण्याची सवय कधीही चांगली.
२) बडीशेप
‘जेवणानंतर बडीशेप खाणे’ हि काळजी तर आपण सहज घेऊ शकतोच कि नाही!! जठरातल्या ऍसिडचे संतुलन ठेऊन पचनशक्ती सुधारण्यासाठी बडीशेप इज मस्ट!!
गरम पाण्यात १ चमचाभर बडीशेप ५ ते ७ मिनिटे उकळून ते पाणी पिणेही ऍसिडिटीवर उपयुक्त ठरते.
३) दालचिनी
मसाल्याच्या पदार्थांमध्ये वापरले जाणारे दालचिनी हे नैसर्गिक अँटासिड असल्यामुळे अन्नपचनासाठी हे उपयुक्त ठरते. दालचिनीचा छोटा तुकडा ५ ते ७ मिनिटे गरम पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने ऍसिडिटीवर आराम मिळतो.
४) थंड ताक
आयुर्वेदात दह्यापासून तयार केलेल्या ताकला सात्विक अन्न म्हणून गणलं गेलेलं आहे. यामध्ये लॅक्टिक ऍसिड असल्याने जठरातल्या अनियंत्रित आम्लावर संतुलन ठेवले जाते.
म्हणून रोज जेवण झाल्यावर एक ग्लास थंड ताक घेतले तर ऍसिडिटीचा त्रास नेहमी दूर ठेवता येऊ शकतो.
५) लवंग
आता गम्मत अशीही आहे कि या ऍसिडीटीला जेवणात मसालेदार पदार्थ चालत नसले तरी त्यावरचे औषध हे बरेचशे मसाल्याचे पदार्थ आहेत. त्यातलेच एक म्हणजे लवंग…
लवंग हे सुद्धा तुळशीसारखेच वातानुलोमी असल्याने पोटात तयार झालेला अनावश्यक वायू कमी करण्यासाठी लवंग गुणकारी आहे.
लवंग चघळण्याने ऍसिडिटी वर आराम मिळू शकतो तसेच श्वासाची दुर्गंधी कमी करण्यासाठी सुद्धा लवंग गुणकारी आहे.
याशिवाय थंड दूध, आले, नारळ पाणी हे सुद्धा ऍसिडिटीवर गुणकारी आहेत.
याशिवाय चहा घेणं जर तुम्हाला अगदीच टाळता येत नसेल तर गुळाचा चहा घेण्याची सुरुवात तुम्ही सुरु करू शकता. कारण आम्लपित्त संतुलित ठेवण्यासाठी गूळसुद्धा गुणकारी आहे. म्हणूनच जेवणानंतर गुळाचा तुकडा खाण्याची जुन्या लोकांची सवय आपल्याला माहित असेल.
तुम्हीही काही उपाय करत असाल हि ऍसिडिटीची स्वस्थता घालवण्यासाठी, तर ते कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका.
https://manachetalks.com/11334/accupressure-points-for-stress-anxity-marathi-health-blog-manachetalks/
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
साहेब, मलाही अॕसिडिटीचा प्रचंड त्रास होता. यावर्षीच्या ९ फेब्रुवारीला पुणे येथील डाॕ. पै यांचेकडे गेलो. त्यांनी तुरीचे वरण, चहा, ब्रेड, पाव, मैदा, तळण, मसाल्याची भाजी, आंबवण इ. पदार्थांची यादी दिली आणि हे पदार्थ जीवनातूनच वगळायला सांगितली. तात्पुरता इलाज म्हणून दोन महिन्यांचे औषध लिहून दिले. लाॕकडाऊन असल्यामुळे अकोल्याहून पुण्याला तपासणीसाठी जाणे शक्य नव्हते. त्यांना फोन करून पुढील औषधे लिहून देण्याची विनंती केली. त्यांनी विचारले किती टक्के आराम वाटतो. म्हणालो ९०%. म्हणाले वजन किती कमी झाले ? १० कि. आता तुम्हांला गोळ्या घ्यायची गरज नाही म्हणाले. फक्त यापेक्षा वजन कमी होऊ देऊ नका (६५). आता तुम्हांला आवडेल ते एकदोन घास खायला हरकत नाही म्हणाले. फक्त एकदा खाल्लेला वर्ज्य पदार्थ पुन्हा दहा बारा दिवस खाऊ नका. थकवा जाणवत असेल तर सकाळचे जेवण थोडे वाढवा. पावणे सात महिन्यांपासून पित्ताचा त्रास झालाच नाही.
मला त्या डॉक्टरांचा नंबर आणि नाव सांगा ना
मलापण आम्लपिताचा खूप त्रास आहे.कृपया मार्गदर्शन करावे.डॉ . सरांचा नं.द्या मी औरंगाबाद ला राहतो.🙏
mala pn no. sanga saheb