सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत जेवणाखाण्याच्या वेळेत अनियमितता, जागरण अशा अनेक कारणांनी पचनाबाबत अनेकांच्या तक्रारी सुरू होतात.
मात्र, त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.
पचनाच्या विकारामुळे तात्पुरती अस्वस्थता येते आणि फार वेदनादायी विकार नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होते.
वास्तविक पचनशक्ती सक्षम असणे हे उत्तम आरोग्यासाठी सर्वाधिक आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
पचनक्रिया बिघडल्यामुळे होणाऱ्या विकारांपैकी एक महत्वाचा विकार म्हणजे आम्लपित्त.
अम्लपित्ताची सर्वसामान्य लक्षणे
1) ओटीपोटात दुखणे, जळजळ
2) मळमळ किंवा उलट्या होणे
3) पोटाच्या आतील भागाला सूज येणे; ओटीपोटचा घेर वाढणे
4) जुलाब किंवा बद्धकोष्ठ
5) भूक न लागणे
आम्लपित्ताचा विकार उद्भवूच नये यासाठी प्रत्येकाने निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करणे आवश्यक आहे.
त्यासाठी खाण्याच्या, जेवणाच्या योग्य वेळांचे पालन करणे, जमिनीवर अथवा टेबल- खुर्चीवर बसून खाणे, अन्न चांगले चावून खाणे, जेवणानंतर कमीतकमी अर्धा तास सरळ बसणे आवश्यक आहे.
कमी किंवा जास्त प्रमाणात आहार एकाच वेळी भरमसाठ जेवण्यापेक्षा कमी प्रमाणात अनेकवेळा जेवणे हे पचनशक्ती सक्षम ठेवण्यास मदत करते.
त्याच प्रमाणे या सर्वांना नियमित व्यायामाची जोड मिळणे आवश्यक आहे.
आपल्या नियमित आहारातील असे काही पदार्थ आणि घरगुती उपचार आहेत ज्यामुळे आम्लपित्त आणि पचनाशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात.
आम्लपित्ताची लक्षणे कमी करण्यात घरगुती उपचार चांगले उपयोगी पडतात आणि आम्लपित्ताला दीर्घकाळ नियंत्रणात ठेवण्याचे महत्वाचे कार्य करतात.
१) ओवा
ओवा हा पोटाच्या विकारांसाठी फार पूर्वीपासून उपयोगात आणला जातो.
ओव्यामध्ये पचनक्षमता मजबूत करण्याचे चांगले गुणधर्म आहेत.
ओव्यामधील ‘थायमॉल’ हा जीवरासायनिक (बायोकेमिकल) घटक पचनक्रिया सक्षम करण्यास चांगली मदत करतो.
चिमूटभर मीठ घालून तळहातावर थोडासा चोळलेला ओवा चघळणे आणि गिळून टाकणे पोटाच्या विकारांसाठी गुणकारी ठरते.
रात्री एक चमचा ओवा पाण्यात भिजवून सकाळी अनशापोटी ते पाणी घेतल्याने अधिक चांगला गुण येऊ शकतो.
वातविकारांवरही ओवा परिणामकारक आहे. ओव्याच्या नियमित सेवनाने पचनसंस्थेला बळकटी प्राप्त होते.
ओव्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
२) बडीशोप
जेवणानंतर चिमूटभर बडीशोप घेणे ही आपल्याकडे पूर्वापार पाळली जाणारी पद्धत आहे.
बडीशोप तोंडाचा दुर्गंध दूर करण्याचे महत्वपूर्ण कार्य करते. परंतु बडीशोप खाण्याची प्रथा पडण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बडीशोप खाण्यामुळे पचनक्रिया सुलभपणे होण्यास त्यामुळे मदत होते.
लहान मुलांना होणारा पोटशूळाचा त्रास कमी करण्यासाठी त्यांना बडीशोप दिली जाते.
लहान मुलांसाठीही तिचा वापर सुरक्षित आणि प्रभावी आहे.
रात्रभर पाण्यात भिजवलेली बडीशोप किंवा तिचे पाणी घेता येऊ शकते.
बडीशोप घालून कोमट केलेले पाणीही गुणकारी ठरते. चहामध्येही बडिशोपचा वापर करता येतो.
बडीशोप आणि साखर यांचे मिश्रण अधिक गुणकारी ठरते.
आरोग्यदायी बडीशेपेचे फायदे या लेखात वाचा
३) दूध आणि दही
आम्लपित्तासाठी दूध हा एक अत्यंत परिणामकारक उपाय आहे.
थंड किंवा सामान्य तापमानाचे दूध भरपूर साखर घालून घेतल्यास आम्लपित्तामुळे होणाऱ्या त्रासापासून त्वरित आराम मिळतो.
दूध घेताना घाई मात्र करू नये. शांतपणे छोटे घोट घेत दूध प्रश्न करणे अधिक गुणकारी आहे.
दूध हे नैसर्गिक अँटासिड आहे. कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेल्या दुधामुळे आम्लाचा असर नाहीसा होतो.
दही हा देखील आम्लपित्त नियंत्रित करण्याचा आणखी एक मार्ग आहे.
दह्यात कॅल्शियम तर असतेच; त्याशिवाय त्यामध्ये मानवी शरीराराला उपयुक्त जीवाणूदेखील असतात.
त्यामुळे आतडे निरोगी राहण्यास आणि पचन क्रिया सुरळीत होण्यास मदत मिळते. दही आतड्यातील चांगल्या जिवाणूंचे पोषण करते.
रात्री दूध पिण्याचे फायदे आणि नुकसान वाचा या लेखात
रोज दही खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
४) मध
कोमट पाण्याबरोबर एक चमचा मध घेतल्यास आम्लपित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.
त्यात थोडा निंबाचा रस घातल्यास ते अधिक गुणकारी ठरते. ते प्राशन केल्याने आम्लपित्तामुळे होणारे त्रास कमी होण्यास मदत मिळते.
जानिए शहद से किन-किन रोगों के उपचार में मिल सकती है मदद
मधुमेह आणि मध: समज, गैरसमज आणि मधुमेहींसाठी मधाचा वापर
५) कोथिंबीर
आम्लपित्तावर कोथिंबिरीची ताजी पाने आणि धने, अर्थात कोथिंबिरीच्या वाळलेल्या बिया यांचा चांगला उपयोग होतो.
कोथिंबिरीचा केवळ १० मिली रस आम्लपित्ताचा त्रास दूर करतो.
हा रस पाणी किंवा ताकात मिसळून घेतल्यास त्याचा चांगला गुण येतो.
वाळलेल्या कोथिंबिरीची पूड भाज्या शिजवताना त्यात घालता येते.
धन्याचा काढा घेणे हा आम्लपित्ताचा त्रास कमी करण्याचा आणखी एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.
वाताचा गोळा येणे, मळमळ आणि उलट्या नियंत्रित करण्यास धने उपयुक्त ठरतात.
कोथिंबीरीचे आपल्या त्वचेसाठी होणारे हे आश्चर्यकारक फायदे
६) फळे
लिंबूवर्गीय फळांसह सर्व फळांमध्ये अल्कली गुणधर्म असलेले घटक असतात. ते आम्लाचा प्रभाव नष्ट करतात.
फळांमध्ये विपुल प्रमाणात फायबर देखील मिळतात. त्यामुळे पचन आणि आरोग्य सुधारते.
आम्लपित्ताचा त्रास टाळण्यासाठी रोज दोन ताजी फळे घेणे ही चांगली सवय ठरते. फळे हा नाश्त्याला चांगला पर्याय ठरतात.
जेवणाबरोबर फळे घेतल्याने पोटातील अस्तरांना हानी पोहोचवणारे आम्ल नियंत्रित करण्यास मदत मिळते.
अम्लपित्ताचे नियंत्रण करणारे हे उपयुक्त असे काही पदार्थ आहेत. परंतु त्याला आरोग्यपूर्ण जीवनशैलीची साथ असणे तेवढेच महत्वाचे आहे.
निरोगी जीवनशैली निरोगी पचनसंस्थेची गुरुकिल्ली आहे आणि निरोगी पचनसांथ हा मानवी आरोग्याचा गाभा आहे.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.