हे आपल्याला माहीतच असतं की कानात मळ होणं ही एक साधारण गोष्ट आहे. पण हा मळ म्हणजे Ear Wax कानात बॅक्टेरिया आणि इतर घाण जाण्यापासून कानांचा बचाव करण्यासाठी आपल्या शरीराने तयार केलेली एक यंत्रणा आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते.
हा मळ कानाच्या नलिकेचे धूळ, माती आणि बॅक्टेरिया पासून संरक्षण करतो.
त्यामुळे कानात मळ झाला तर घाबरण्याचे असे काहीही कारण नसते. या Ear wax चे सुरुवातीला कानात ल्युब्रिकंट प्रमाणे काम असते. नंतर हा टणक होत जातो.
जेव्हा या मळा मुळे कान ब्लॉक होतो, ऐकू येण्यास अडचण येते किंवा तो खड्या सारखा टणक होऊन जातो तेव्हा हा मळ काढण्याची गरज असते.
हा मळ काढण्यासाठी एअर बड्स किंवा सुती कपडा वापरावा.
त्या आधी खाली दिलेले काही घरगुती उपचार करून किंवा मेडिकल स्टोअर मध्ये मिळणारे ‘एअर ड्रॉप्स’ वापरून हा मळ मऊ होऊ द्यावा. मऊ झाला की आपोआपच मळ कानाच्या बाहेर येऊ लागतो.
हा मळ रोज किंवा सारखा-सारखा काढण्याची गरज नसते. मळाचे प्रमाण वाढल्यावर तो निघण्यासाठी काही घरगुती उपाय आपण करू शकतो.
पण कानामध्ये कुठलीही टोकदार वस्तू किंवा पिन घालून मळ काढण्याचा प्रयत्न करू नये.
या लेखात कानांचा मळ काढण्याचे काही घरगुती उपाय आपण बघू.
१) नारळाचं तेल म्हणजे कोकोनट ऑइल: हा उपाय आपण बरेचदा करून बघितलेला असतो. कोमट केलेलं नारळाचं तेल, दोन थेंब इतकं कानात टाकलं तर कानातील मळ मऊ व्हायला मदत होते.
आणि तो मऊ झाल्या नंतर हळूहळू बाहेर येऊ लागतो तेव्हा सुती कपड किंवा एअर बड्स वापरून हा मळ साफ करावा.
२) बदामाचे तेल: नारळाच्या तेला प्रमाणेच बदामाचे तेल टाकल्यास मळ मऊ होऊन आपोआप बाहेर यायला मदत होते.
हे तेल ल्युब्रिकंट प्रमाणे काम करून टणक झालेला मळ मऊ करण्यात महत्त्वाचे ठरते.
३) बेकिंग सोडा: एक छोटा चमचा पाण्यात चिमूटभर बेकिंग सोडा टाकून नीट एकजीव केलेले मिश्रण कानात दोन थेंब असे टाकले तर मळ मऊ होऊन हळूहळू बाहेर येऊ लागतो.
मळ बाहेर येऊ लागल्या नन्तर एअर बड्स किंवा सुती कापड वापरून कान साफ करावा.
४) मिठाचे पाणी: चमचा भर कोमट पाण्यात, चिमूटभर मीठ घालून ते मिश्रण मळ असलेल्या कानात दोन थेंब टाकल्यास, मळ मऊ व्हायला मदत होते.
५) ग्लिसरीन: ग्लिसरीन चे दोन थेंब, मळ टणक झालेल्या कानात टाकल्यास लवकरच मळ मऊ होऊ लागतो.
आणि हा मऊ झालेला मळ कानुतून हळूहळू बाहेर येऊ लागतो. अशा वेळी मळ सुती कापड किंवा एअर बड्स वापरून कान साफ करणे सोपे जाते.
कानाला जर मळ असण्याशिवाय वेगळी काही समस्या असेल तर त्वरित ENT डॉक्टर कडे जाऊन कानाची तपासणी करणे गरजेचे आहे.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.