बॅक्टेरियांच्या संसर्गामुळे होणाऱ्या युरिनरी इन्फेक्शन चा इलाज वेळीच केला गेला नाही तर याचे परिणाम किडनीवर होऊन गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते.
युरिनरी इन्फेक्शनमुळे लघवी करताना जळजळ होणं, दुखणं, ओटीपोटात दुखणं, लघवी थांबवली न जाणं यासारखी लक्षणं दिसू लागतात.
युरिनरी सिस्टीम शरीरात साचलेले विषारी द्रव्य बाहेर टाकण्याचे काम करते आणि यात बिघाड झाला तर आरोग्यावर याचे इतरही परिणाम दिसू लागतात.
लघवी करताना वेदना, बेचैनी जाणवत असल्यास लगेच डॉक्टरांना दाखवून उपचार घेणे गरजेचे आहे. तरीही काही घरगुती उपचार आणि काळजी घेतल्यास युरिनरी इन्फेक्शन पासून नक्कीच आराम मिळू शकतो.
युरिनरी इन्फेक्शन पासून आराम देणारे काही घरगुती उपाय:
१) व्हिटॅमिन ‘सी’ युक्त पदार्थांचा आहारात वापर: पपई, ब्रिकोली या सारख्या व्हिटॅमिन ‘सी’ युक्त पदार्थांच्या सेवनाने युरिनमधले ‘ऍसिडिक’ गुणधर्म वाढून बॅक्टेरिया कमी करण्यास मदत होते.
२) गरम पाण्याने अंघोळ करणे: युरिनरी इन्फेक्शन पासून आराम मिळावा म्हणून रोज गरम पाण्याने अंघोळ करावी तसेच पोटाच्या खालच्या भागात गरम पाण्याचे पॅड लावावे.
३) काकडी चे नियमित सेवन करावे: काकडीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत होते. आणि शरीरातले विषारी तत्व काढून टाकण्यास मदत होते. काकडीतील अल्काईन तत्व शरीराला आतून थंडावा देते आणि पचन क्रिया सुधारायला मदत होते.
काकडीमध्ये अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडन्ट असल्याने शरीरासाठी ते खूप लाभदायक असतात.
४) भरपूर पाणी प्यावे: शरीरातील विषारी पदार्थ उत्सर्जित करण्यासाठी रोज कमीत कमी आठ ग्लास पाणी प्यालेच पाहिजे. याशिवाय वेगवेगळ्या फळांचे रस घेणे युरिनरी इन्फेक्शन मध्ये खूप फायदेशीर ठरते. अल्कोहोल, कार्बोनेटेड ड्रिंक्स यापासून मात्र दूरच राहावे.
५) दालचिनी: दालचिनी मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. बारीक कुटलेली दालचिनी आणि मध याचे चाटण घेणे सुद्धा युरिनरी इन्फेक्शनमध्ये गुणकारी ठरते.
हे काही घरगुती उपाय युरिनरी इन्फेक्शन मध्ये केले जाऊ शकतात. याशिवाय स्वच्छ टॉयलेट चा वापर करणे हेही तितकेच महत्त्वाचे.
युरिनरी इन्फेक्शन वाढल्यास उपचारात हाय अँटिबायोटिक्सचा डोस घ्यावा लागू शकतो. म्हणूनच ‘प्रोव्हेन्शन इस बेटर दॅन क्युअर’ हे ध्यानात ठेऊन युरिनरी इन्फेक्शन ची लक्षणं दिसू लागताच आपला आहार योग्य तसा करून युरिनरी इन्फेक्शनला दूर ठेवणे कधीही फायद्याचे.
Image Credit: metroparent
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.