विरुपाक्ष मंदिरापर्यंत पोहोचायचं कसं?
बंगलोर पासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या या जागेवर पोहोचण्यासाठी NH ६७ ने टॅक्सी किंवा कॅब केल्यास २ तासाचा रस्ता आहे. विरुपाक्ष मंदिरापासून सर्वात जवळचे रेल्वेस्टेशन हे होस्पेटला आहे. तिथून १३.४ किलोमीटर अंतरावर मंदिर वसलेलं आहे. आणि त्याशिवाय हवाई सफरीचा विचार असेल तर मंदिरापासून सर्वात जवळच एअरपोर्ट बेल्लारीला आहे.
भारतात मंदिरांची निर्मिती हजारो वर्षापासून झालेली आहे. कित्येक मंदिरांना १००० वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. इतक्या प्रचंड कालावधी नंतर सुद्धा ह्यातील अनेक मंदिरांचं सौंदर्य आजही टिकून आहे.
ह्यातील प्रत्येक मंदिर हे आपल्यामागे काही न काही इतिहास, पौराणिक कथा, भूगोल, स्थापात्यशास्त्र, कला, संगीत, शास्त्र ते विज्ञान आणि तंत्रज्ञान घेऊन आजही काळाच्या कसोटीवर उभं आहे.
पण काळाच्या ओघात, परकीय आक्रमणांनी त्यांची पडझड झाली असली तरी त्यांच्या निर्मितीमागचं तंत्रज्ञान आजही अनेक वैज्ञानिकांना बुचकळ्यात टाकते.
ह्या मंदिरावर असलेली शिल्पकला, त्यांच्या निर्मिती मध्ये वापरलं गेलेलं गणित, त्यातला स्थापात्यशास्त्र, अभियांत्रिकी, विज्ञानाचा भाग आजही रहस्य आहे.
रहस्य ह्यासाठी की आज विज्ञानाच्या कक्षेत काही प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला तरी ह्या सर्व गोष्टी ७०० ते १२०० वर्षापूर्वी कशा शक्य झाल्या असतील ह्याचं उत्तर आज कोणीच देऊ शकत नाही.
हिंदू धर्मात भगवान शंकराचं महत्व सर्वोच्च आहे. ज्याला सृष्टीचा नाश करणारा ते सृष्टी निर्माता असं म्हंटल गेलं आहे. म्हणून शंकराची सर्वच मंदिरे ही सगळ्याच बाबतीत भव्यदिव्य, कलाकुसरीने नटलेली, विज्ञान- तंत्रज्ञान ह्यांची कास धरणारी बांधली गेली आहेत.
त्यामुळेच आज इतक्या वर्षानंतर त्यामागचं तंत्रज्ञान काही प्रमाणात आपल्या लक्षात आलं तरी त्याची उकल आजही एक कोडं आहे. भगवान शंकराला वाहिलेलं असचं एक मंदिर भारतात आहे ज्याच नावं आहे ‘विरूपाक्ष मंदिर’.
कर्नाटक मधील हंपी मध्ये असलेलं हे मंदिर शंकराला वाहिलेलं असून ह्याची निर्मिती देवराया २ ह्या विजयनगरी साम्राज्याच्या राजाच्या काळात झाली आहे.
विरुपाक्ष मंदिरापर्यंत पोहोचायचं कसं?
बंगलोर पासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या या जागेवर पोहोचण्यासाठी NH ६७ ने टॅक्सी किंवा कॅब केल्यास २ तासाचा रस्ता आहे. विरुपाक्ष मंदिरापासून सर्वात जवळचे रेल्वेस्टेशन हे होस्पेटला आहे. तिथून १३.४ किलोमीटर अंतरावर मंदिर वसलेलं आहे. आणि त्याशिवाय हवाई सफरीचा विचार असेल तर मंदिरापासून सर्वात जवळच एअरपोर्ट बेल्लारीला आहे.
साधारण १५६५ च्या सुमारास विजयनगरी साम्राज्य लयाला गेल्यावर ह्या ठिकाणी परकीय आक्रमणांनी ह्या साम्राज्याची राजधानी असणाऱ्या हंपी शहराची प्रचंड नासधूस केली.
इकडे असलेली अनेक मंदिरे त्यातील शिल्पकला नष्ट केली. पण त्यात विरूपाक्ष मंदिर हे वाचलं. आज तब्बल ७०० वर्षानंतर त्या साम्राज्याच्या खुणा घेऊन उभं आहे.
भारताच्या दक्षिण भागातील मंदिरांप्रमाणे हे मंदिर प्रचंड अश्या शिल्पकलेने नटलेलं आहे. ह्या मंदिरात असलेल्या खाबांची रचना आणि ह्या मंदीराचं स्थापात्यशास्त्र हे खूप उच्च दर्जाचं आहे.
ह्या मंदिरातील प्रत्येक गोष्ट समानतेने उभारली गेली आहे. ह्या मंदिराचा १० वर्षापेक्षा जास्त काळ अभ्यास केल्यावर, यु.ए.बी. डिपार्टमेंट आर्ट आणि आर्ट हिस्ट्रीमध्ये प्रोफेसर असलेल्या डॉक्टर कॅथेलीन कमिन्स यांनी असा निष्कर्ष काढला आहे की,
For a long time, there was an assumption that the sculptures on the outside of Hindu temples didn’t necessarily mean anything as a group. However, these figures are more than just architectural decoration. they were certain, very conscious choices being made as to where deities and specific forms of deities were placed.
हे वाचल्यावर लक्षात येते की कोणतीही मूर्ती कशी असावी, कुठे असावी, कोणत्या पद्धतीची असावी अथवा मंदिराचा कोणत्या भागाचा आकार कसा असावा ह्याचा पूर्ण अभ्यास केला गेला होता. त्यानंतर त्यांची निर्मित केली गेली.
विरूपक्ष मंदिराच्या पूर्वे कडील प्रवेश द्वारावर असणाऱ्या गोपुराची उंची जवळपास ५२ मीटर (१६५ फुट उंच X १५० फुट लांबी X १२० फुट रुंदी ) असून हा गोपूर ९ मजल्यांचा आहे.
ह्याची निर्मिती जवळपास ७०० वर्षापूर्वी झाली असून आजही सुस्थितीत उभा आहे. (आजकाल ४ मजल्यांची बिल्डींग ४० वर्ष उभी नाही रहात तर ९ मजल्यांचा अवाढव्य असा ७०० वर्षापूर्वीचा गोपूर व्यवस्थित आहे.
ह्यात दैवी शक्ती वगैरे नसून त्याकाळी बांधकाम करण्यासाठी वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान, विज्ञान कारणीभूत आहे.) असे गोपूर दक्षिण भारतातील अनेक मंदिरात बघायला मिळतील पण ह्या गोपुराचं वैशिष्ठ थोडं वेगळं आहे.
विरुपाक्ष मंदीरामध्ये तंत्रज्ञानाचा एक आविष्कार बघायला मिळतो ज्याचं रहस्य अजूनही गुलदस्त्यात आहे. ह्या मंदिरात पिनहोल कॅमेरा तंत्रज्ञांनाचा वापर केला आहे.
ह्या गोपुरापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या मंदिराच्या एका भागात ह्या गोपुराची सावली उलट पडते. हा भाग मंदिराच्या आतल्या बाजूस आहे.
त्यामुळे अशी सावली कशी काय पडत असेल ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्याला पिनहोल कॅमेराचं तंत्रज्ञान समजून घ्यावं लागेल.
प्रकाश पडणाऱ्या एखाद्या पडद्यावर असणारं एक लहान छिद्र त्यावर पडणाऱ्या सर्व प्रकाशाला एकत्रित एका ठिकाणी करून समोर असणाऱ्या गोष्टींची प्रतिमा बनवू शकते.
एखादी चांगली प्रतिमा मागच्या बाजूस निर्माण होण्यासाठी ह्या छीद्राचा आकार आणि मागच्या पडद्याचं त्याच्यापासून असलेलं अंतर ह्याचं गुणोत्तर साधारण १/१०० पेक्षा कमी असणं गरजेचं आहे.
विरूपक्षा मंदिराच्या गोपुरामुळे सूर्याची किरणे अडवली जातात. पण गोपुराच्या बाजूने येणारी सूर्यकिरणे मात्र मागे असलेल्या मंदिरावर पडतात.
मंदिर बांधताना एक छोटं छीद्र त्यात योग्य ठिकाणी बनवून “पिनहोल कॅमेरा” तंत्रज्ञान वापरून त्याची प्रतिमा मागच्या भिंतीवर उलटी उमटेल अशी रचना केली केलेली आहे.
कॅमेरा तंत्रज्ञानाने प्रतिमा निर्माण करण्याचा शोध साधारण १८१६ च्या आसपास लागला असा आजचा इतिहास सांगतो. पण सूर्य प्रकाशाच्या किरणांना एकत्र करून एका ठिकाणी फोकस करण्याचं तंत्रज्ञान ह्या मंदिरात तब्बल ७०० वर्षापूर्वी वापरलं गेलं आहे.
म्हणजे छायाचित्र निर्मिती करण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान भारतात अवगत होतं. जर हे तंत्रज्ञान अवगत नसेल तर त्या छीद्राचा आकार किती असावा?
छीद्र आणि मागचा पडदा ह्यांच्या अंतरातील गुणोत्तर किती असावं ह्याचं गणित सोडवल्या शिवाय अश्या उलट्या प्रतिमेची निर्मिती अशक्य आहे. इकडे हे छिद्र आरश्याचं पण काम करून गोपुराची उलटी प्रतिमा मागच्या भिंतीवर आजही दाखवते.
आजही आपण फक्त असं तंत्रज्ञान वापरलं असेल ह्याचा अंदाज बांधू शकतो. त्यांनी ह्याची निर्मिती कशी केली? का केली? हे तंत्रज्ञान पुढे कुठे लुप्त झालं?
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजही आजचं विज्ञान देऊ शकत नाही. भारतातील प्रत्येक मंदिर हे नाविन्यपूर्ण गोष्टी आणि वैशिष्ठय ह्यांनी ओतप्रोत भरलेलं आहे.
पण ते बघण्यासाठी देव, देव न करता त्या मंदिराच्या श्रद्धेला नमन करत तंत्रज्ञानाची कास धरून शोध घेण्याची गरज आहे.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.