बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर किंवा इन्शुरन्स एजंट मार्फत ‘मिस सेलींग’ होण्याचे प्रकार

६२ वर्षांचे श्री. विजय कुमार शर्मा (सुरक्षेच्या कारणास्तव नाव बदलले आहे) त्यांच्या बँकेत एफ डी उघडण्यासाठी गेले. तेथे बँकेतील रिलेशनशिप मॅनेजरने त्यांचे स्वागत करून त्यांची चौकशी केली. एफडी काढण्याऐवजी यूलिप (युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी) कशी जास्त फायदेशीर आहे असे रिलेशनशिप मॅनेजरने श्री. विजय कुमार शर्मा यांना सांगितले.

रिटायर्ड असणाऱ्या श्री. शर्मा यांना दहा वर्षाची इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी रिलेशनशिप मॅनेजरने कन्व्हिन्स केले. शर्मा यांचा रिलेशनशिप मॅनेजरवर विश्वास बसून त्यांनी ती पॉलिसी घेतली.

परंतु नंतर त्यांच्या असे लक्षात आले की त्यांच्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये सदर पॉलिसीचा हप्ता भरणे त्यांना शक्य होणार नाही. तसेच पॉलिसीच्या लॉकिंग पिरियडच्या नियमामुळे सुरुवातीला गुंतवलेले त्यांचे पैसे देखील आता लगेच परत मिळू शकणार नाहीत.

तेव्हा श्री. शर्मा यांच्या हे लक्षात आले की बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरने त्यांना चुकीचा सल्ला देऊन अयोग्य ठिकाणी त्यांचे पैसे गुंतवले आहेत.

श्री. शर्मा यांना आलेला हा अनुभव अनेक लोकांना येतो. बँकेतील असे रिलेशनशिप मॅनेजर किंवा इन्शुरन्स एजंट आपले दरवर्षीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसीज घेण्यासाठी कस्टमरचे मन वळवतात. त्यासाठी ते काही वेळा पॉलिसीच्या नियमांची संपूर्ण माहिती कस्टमरला देत नाहीत. परंतु अशा पॉलिसीज कस्टमरसाठी फायदेशीर असतीलच असे नाही.

अशाप्रकारे बँक किंवा एजंट मार्फत होणाऱ्या फसवणुकीच्या घटना बऱ्याच वेळा घडतात. असे होऊ नये म्हणून एक ग्राहक म्हणून आपण नेमके कशा प्रकारे सावध असावे हे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

भारतातील बऱ्याच लोकांना आपल्या जवळील पैसा नेमका कोणत्या प्रकारे गुंतवावा या गोष्टीची नीट माहिती नसते. याचा फायदा घेऊन इन्शुरन्स एजंट किंवा बँकांचे रिलेशनशिप मॅनेजर लोकांसमोर मोठा आर्थिक परतावा मिळू शकेल अशा योजनांचे चित्र निर्माण करतात.

परंतु सर्व लोकांना या योजना फायदेशीर असतीलच असे नाही उदाहरणार्थ एखादी वृद्ध व्यक्ती किंवा पेन्शन मिळवणारी व्यक्ती असेल तर त्यांना अशा योजनेचा काही फायदा होणार नाही.

बँक किंवा एजंट मार्फत होणाऱ्या फसवणुकीचे आणखीही काही प्रकार आहेत ते खालील प्रमाणे, ह्या सर्व प्रकारांचा नीट अभ्यास करून आपली अशी फसवणूक होणार नाही याची आपण सर्व काळजी घेऊया.

१. बँकेतील लॉकर देण्यापूर्वी मोठ्या रकमेची एफडी करण्यास सांगणे.

अनेक लोकांना आपले दागिने आणि मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी बँकेतील लॉकरची गरज पडते. दरमहा ठराविक रक्कम भाड्यापोटी घेऊन बँक असे लॉकर ग्राहकांना पुरवते.

परंतु काही वेळा बँकेतील अधिकाऱ्यांकडून ग्राहकाला लॉकर हवा असेल तर ठराविक रकमेची एफडी करणे, मोठी रक्कम भरून बचत खाते उघडणे किंवा बँकेतर्फे एखादी इन्शुरन्स पॉलिसी घेणे बंधनकारक केले जाते. खरेतर नियमानुसार लॉकरसाठी असे कोणतेही बंधन बँक घालू शकत नाही. उपलब्ध लॉकर ग्राहकांना देऊन त्यापोटी दरमहा भाडे घेणे एवढेच बँकेचे काम असते.

२. गोल्ड बॉन्ड ऐवजी गोल्ड कॉइन खरेदी करण्यास भाग पाडणे.

भारतात बऱ्याच लोकांचा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे कल असतो. आता हे सर्वांनाच माहीत आहे की गोल्ड कॉइन घेण्यापेक्षा गोल्ड बॉन्ड घेणे जास्त फायदेशीर असते.

परंतु काही वेळा बँकांकडून त्यांच्याजवळील गोल्ड कॉइन विकले जावे यासाठी ग्राहकांना गोल्ड कॉइन घेणेच कसे फायदेशीर आहे असे सांगून ते खरेदी करण्यास भाग पाडले जाऊ शकते.

परंतु ह्या बँका असे गोल्ड कॉइन ग्राहकाकडून परत विकत मात्र घेत नाहीत. पैशाची गरज भासल्यास ग्राहकाला ते गोल्ड कॉइन एखाद्या सोनाराकडे विकावे लागतात. अशा व्यवहारात ग्राहकाचा थोडाफार तोटा देखील होऊ शकतो.

३. बँकेत एफडी करण्याऐवजी इन्शुरन्स पॉलिसी घेण्यास सांगणे.

या पद्धतीच्या फसवणुकीचे उदाहरण आपण लेखाच्या सुरुवातीला पाहिले. एखाद्या ग्राहकाने बँकेत एफडी केली असता मुदत संपल्यानंतर अथवा आवश्यकता असेल तेव्हा ताबडतोब पैसे उपलब्ध होऊ शकतात.

परंतु बँकेचे वार्षिक टार्गेट पूर्ण करण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांकडून ग्राहकांना इन्शुरन्स पॉलिसी घेण्याबद्दल सांगितले जाते. असे करण्यामुळे बँकेचे टार्गेट तर पूर्ण होते परंतु ग्राहकाचे पैसे मात्र अडकून पडतात.

कोणतीही पॉलिसी घेताना आपल्याला त्या पॉलिसीची किती आवश्यकता आहे याचा संपूर्ण अभ्यास करून मगच ती घ्यावी.

४. सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ऐवजी इन्शुरन्स पॉलिसी घेण्यास सांगणे.

बऱ्याच वेळा ज्येष्ठ नागरिकांना आपल्याजवळील पैसे नेमके कसे गुंतवावे याची नीटशी माहिती नसते. ते गुंतवणुकीसाठी बँकेतील सल्लागारांवर अवलंबून असतात.

परंतु अशावेळी सीनियर सिटीजनना सोयीच्या असणाऱ्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीममध्ये पैसे गुंतवण्यास सांगण्याऐवजी बँकेतील अधिकाऱ्यांकडून सीनियर सिटीजनना इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा सल्ला दिला जातो.

असे करण्यामुळे बँकेचे टार्गेट पूर्ण होते परंतु सीनियर सिटीजनचा त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारा पैसा जास्त कालावधीसाठी अडकून पडतो.

५. टर्म इन्शुरन्स ऐवजी युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी घेण्यास सांगणे.

कुटुंबाचा आधार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा इन्शुरन्स काढणे आवश्यक असते हे खरे आहे. खरेतर अशावेळी कमी प्रीमियम भरून जास्त रकमेचा विमा मिळणारी टर्म इन्शुरन्स पॉलिसी जास्त फायदेशीर असते. परंतु टर्म इन्शुरन्स पॉलिसीमध्ये दरवर्षी भरला जाणारा प्रीमियम वाया जातो असे कारण देऊन बँकेच्या अधिकाऱ्यांकडून ग्राहकांना युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी घेण्यास सांगितले जाते.

अशा पॉलिसीमध्ये काही कालावधीनंतर तुम्हाला गुंतवलेले पैसे परत मिळतील असे आमिष दाखवले जाते. परंतु युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसीचा प्रिमियम जास्त असून त्यामानाने खरेतर मिळणारे पैसे तितके जास्त नसतात.

परंतु पॉलिसी घेताना या गोष्टी ग्राहकांच्या लक्षात येत नाहीत आणि ते बँक अधिकारी किंवा इन्शुरन्स एजंटच्या सांगण्याला बळी पडतात.

तर मित्र-मैत्रिणींनो हे आहेत असे पाच प्रकार ज्यांचा वापर करून काही वेळा बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर किंवा इन्शुरन्स एजंट यांच्याकडून ग्राहकांची फसवणूक केली जाते.

आम्ही असे म्हणत नाही की सगळ्याच बँका किंवा सगळे रिलेशनशिप मॅनेजर ग्राहकांची फसवणूक करतात. परंतु दरवर्षीचे टार्गेट पूर्ण करण्याच्या दबावाखाली काही बँक कर्मचाऱ्याकडून असे प्रकार केले जातात हे देखील तितकेच खरे. म्हणूनच आपली अशी फसवणूक होऊ नये यासाठी एक ग्राहक म्हणून आपण सतत सजग राहणे अतिशय आवश्यक असते.

मित्रांनो, तुम्हीदेखील कोणतीही गुंतवणूक करताना ती अतिशय डोळसपणे करा. आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांना याबाबत योग्य सल्ला द्या. या लेखातील माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख नक्की शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 thoughts on “बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर किंवा इन्शुरन्स एजंट मार्फत ‘मिस सेलींग’ होण्याचे प्रकार”

  1. बॅंकेचे कम्रचारी आणी एल आय सी चा काही संबंध असतो का असा प्रकार झाला.्तर आणी पैसे मुदतीत नाहीमिळाले तर बॅंक दंखल घेते का

    Reply
    • बॅकैतील रिलेशन शिप किंवा एल आय सी एजंट बाबत

      Reply
  2. खरे तर बँकेला व आँनलाईन वर अर्थविषयक सेवा विक्रीकरीता ठेवणेच चुकीचे आहे… आजकाल तर मोठ्या सरकारी व खाजगी बँकेत मॅनेजर खुप फसवणुक करीत आहे .
    तसेच लोन देणारे संस्थाना पण विक्री करण्यास मनाई केली पाहीजे, कर्जदाराची अडवणुक करुन फसवणूक करतात हरामी मँनेजर लोक !

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।