आर्थिक गुंतवणूक करताना या चुका टाळा 

आर्थिक गुंतवणूक कशी करायची, का करायची, पैशांची बचत करण्याचे मार्ग याबद्दल अनेक मार्गदर्शन करणारे लेख असतात.

पण काहीवेळा हे सगळे वाचून, समजून घेऊन प्रत्यक्ष गुंतवणूक करताना मात्र आळशीपणा होण्याची शक्यता असते.

तुम्हाला सुद्धा असा अनुभव आलाच असेल. 

भविष्याची तरतूद म्हणून तुम्ही गुंतवणूक करत असालच, कमावणारा प्रत्येक माणूस ते करत असतोच.

पण ते करताना काही गोष्टी तुमच्या कडून राहून जाऊ शकतात…

यामागे दोन कारणे असू शकतात, एकतर तुम्हाला त्याबद्दल पुरेशी माहिती नसते किंवा तुम्हाला माहिती असते, त्याचे महत्व सुद्धा असते पण काहीवेळा केवळ तुमचा आळशीपणा नडतो.

काहीवेळेला तर असेही होऊ शकते की आजचा विचार फक्त केला जातो, उद्याचे उद्या बघू ही युक्ती वापरून गुंतवणूक फार गांभीर्याने केली जात नाही.

पण असे करणे योग्य नाही. पैसे कमवण्याइतकेच ते योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे गुंतवणे हे महत्वाचे आहे. 

तुम्ही जर या दुसऱ्या प्रकारात मोडत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.

काय करायला हवे, कसे करायला हवे या इतकेच महत्वाचे आहे काय करायला नको ते सुध्दा….

या लेखात नेमके तेच सांगितले आहे.

यामुळे जर गुंतवणूक करताना तुमच्याकडून या चुका होत असतील तर त्या टळतील.

तुम्ही जर पैशांची गुंतवणूक करत असाल, नवीन ठिकाणी पैसे गुंतवण्याचा प्रयत्नात असाल तर हा लेख वाचून या चुका तुमच्याकडून होणार नाहीत याची काळजी घ्या. 

पैसे गुंतवताना होणाऱ्या चुका 

१. हेल्थ इन्शुरन्स न घेणे 

हेल्थ इन्शुरन्स का घेतला पाहिजे, त्याचे काय फायदे आहेत हे सांगण्यापेक्षा हेल्थ इन्शुरन्स न घेण्याने काय होऊ शकते हे सांगितले, तर त्याचे महत्व जास्त पटते.

तुम्ही नोकरीला लागून काही काळ लोटला, तुमचा जमा-खर्चाचा हिशोब नीट बसला की सुरुवात होते ती गुंतवणुकीला.

FD, RD काही वेळा शेयर्स या सगळ्या माध्यमातून गुंतवणूक करून तुम्ही मोठी रक्कम गोळा केलेली असते. तुमच्या मनासारखे ‘सेव्हिंग’ झालेले असते. 

पण अगदी अशा वेळेला दुर्दैवाने तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणा एका सदस्याला अचानक मेडिकल इमरजन्सी येते. यामध्ये हॉस्पिटल, डॉक्टर, औषधे असा बराच खर्च होतो.

इतका खर्च झाल्यावर साहजिकच तुम्हाला तुमच्या सेव्हिंगमधून रक्कम काढावी लागतेच, क्रेडीट कार्ड वापरावे लागते पण तरीही पैसे अपुरे पडत असल्याने मित्र/नातेवाईक यांच्याकडून काही रकम उधार सुद्धा घ्यावी लागते. 

देवकृपेने या संकटातून तुम्ही सुखरूप बाहेर पडता पण यामुळे झालेले आर्थिक नुकसान मात्र भरून निघत नाही.

गेलेले सेव्हिंग परत करणे, मित्रांचे किंवा नातेवाईकांचे पैसे परत करणे, क्रेडीट कार्डचे बिल चुकते करणे या सगळ्यामुळे चांगलाच आर्थिक फटका बसतो. 

याशिवाय घरातील व्यक्ती आजारी असताना, पैशांची तजवीज करण्यासाठी होणार मानसिक आणि शारीरिक त्रास हे तर येतेच.

आता हीच परिस्थिती किती वेगळी असती जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढला असता तर? 

गुंतवणूक करण्याची सुरुवात करताना आधी या सगळ्यात महत्वाच्या गोष्टीपासून केली पाहिजे हे कधीही लक्षात असू द्या.

२. रीटायरमेंट नंतरसाठीच्या आर्थिक स्थितीचा विचार करत नाही 

आत्ता तुमचे वय अगदी ३० असेल. तुमचा ऐन उम्मेदीचा काळ.

साहजिकच या वयात तुमचे प्राधान्य वेगळ्या गोष्टींना असेल.

तुम्ही गुंतवणूक करतही असाल, चांगली रक्कम गोळा झाली सुद्धा असेल पण त्यामागे काहीतरी हेतू असेल.

उदाहरण द्यायचे झाले तर अमुक FD नवीन कारसाठी, ही RD नवीन कॉम्पुटरसाठी.

यात काही चूक आहे असे म्हणता येणार नाही पण या सगळ्यामध्ये रिटायरमेंट नंतर लागणाऱ्या पैशांची तरतूद नसते.

कोणीच तिशीच्या वयात रिटायरमेंट नंतर काय म्हणून गुंतवणूक करत नाही.

पण इथेच गुंतवणुकीचे गणित चुकते. 

याचा अर्थ असा नाही की तरुणपणी मजा करायची सोडून फक्त गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे.

याचे अर्थ फक्त इतकाच की म्हातारपणीचा विचार करून खर्च, गुंतवणूक ही तरुणपणापासूनच सुरु केली पाहिजे.

मग या गुंतवणुकीसाठी खूप मोठी रक्कम काढली पाहिजे असे नाही, फक्त सुरुवातीपासून त्यात सात्यत्य हवे.

पण गुंतवणूक करताना सुरुवातीपासूनच सहसा हा विचार केला जात नाही. 

३. खूप जास्त रक्कम FD मध्ये गुंतवणे 

FD ही गुंतवणुकीसाठी सगळ्यात सुरक्षित मानली जाते आणि तशी ती आहे सुद्धा.

पण यामध्ये तुमची रक्कम अगदी सावकाश वाढत असते.

तुम्ही गुंतवलेली रक्कम तर वाढत असते पण इन्फ्लेशनच्या गतीने नाही.

समजा तुम्ही १ लाखाची FD केली तर ३० वर्षांनी तुम्हाला ७ ते ८ लाख मिळतील असे गृहीत धरू.

यावर खुश व्हायचे का नाही हा तुम्हाला प्रश्न पडेल, जेव्हा तुम्हाला समजेल की हीच रक्कम म्युच्युअल फंड किंवा SIP मध्ये गुंतवली असती तर ३० वर्षांनी साधारण ८० लाख सुद्धा होऊन शकले असते.

म्हणजे एफडीच्या काही पट! 

एफडी करून पैसे सुरक्षित राहतात पण इंफ्लेशनच्या प्रमाणात वाढत नाहीत.

४. लोन, क्रेडिट कार्ड यावर जास्त अवलंबून असणे

मोठे खर्च करताना सहसा दोन प्रकारे केले जातात.

एकतर केलेल्या सेव्हिंगमधून किंवा लोन/क्रेडीट कार्डद्वारे.

तुम्ही जेव्हा लोन घेता तेव्हा तुम्हाला त्याबद्दल गांभीर्य नसते.

पण लोन घेणे आणि ते फेडणे म्हणजे भविष्याच्या सेव्हिंगशी तडजोड करणे असे होते.

हफ्ते फेडायचे म्हटले की इतर खर्च करताना नेहमी विचार करावा लागतो.

हफ्ते फेडायचे आहेत हा विचार सारखा मनात घर करून असतो.

या शिवाय जेव्हा तुम्हाला हफ्ते असतात तेव्हा तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी असते.

नोकरी जाणे, धंद्यात नुकसान होणे, इतर काही इमरजन्सी येणे या गोष्टी गृहीत धरलेल्या नसतात पण या सगळ्या गोष्टींचा गुंतवणुकीवर परिणाम होत असतो.

यातली कोणती परिस्थिती दुर्दैवाने ओढवलीच तर हफ्ते फेडायला गुंतवलेले पैसे सुद्धा काढायची वेळ येऊ शकते.

म्हणूनच सहसा लोन घेताना किंवा क्रेडीट कार्ड वापरताना त्याची सवय लागू नये याची काळजी घ्यावी.

शक्यतो गरजेच्या आणि आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठीच हा पर्याय स्वीकारावा. 

क्रेडीट कार्ड किंवा लोन यावर पूर्णपणे अवलंबून असणे हे धोकादायक असते. 

मित्रमैत्रिणींनो, गुंतवणूक कशी करायची या इतकेच ती करताना कोणत्या चुका हूऊ शकतात आणि  त्या कशा टाळायच्या हे सुद्धा महत्वाचे आहे. या गोष्टी लक्षात ठेऊन तुम्ही बरोबर पद्धतीने गुंतवणुकीला येत्या वर्षात सुरुवात करताय ना? 

कमेंट्स मध्ये २०२१ साठी तुमची आर्थिक ध्येये लिहून ती पुर्ण करण्यासाठी नक्की प्रयत्न करा.

तुम्हा सर्वांना नवीन वर्षासाठी आर्थिक उन्नतीच्या लाख लाख शुभेच्छा, धन्यवाद.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।