फोनची बॅटरी भरभर डिस्चार्ज होण्याची ६ कारणे

मोबाईल फोन हे आजच्या धावपळीच्या युगात आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचे उपकरण बनले आहे. मोबाईल फोन शिवाय आता आपण एखादे काम करण्याचा विचारही करू शकत नाही. मोबाईल फोन आता आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे.

आजकाल सगळे जण स्मार्टफोनचा वापर करतात.. स्मार्टफोनच्या मदतीने आपली कामे चुटकीसरशी केली जातात. परंतु त्यासाठी आवश्यक असते ते आपल्या मोबाईल फोनचे सतत चार्ज असणे. आपल्या फोनची बॅटरी जर भरभर संपत असेल, म्हणजेच फोन लवकर डिस्चार्ज होत असेल तर होणारी गैरसोय फारच मोठी असते.

आपण एखादे महत्त्वाचे काम ऑनलाईन पद्धतीने करत असताना जर अचानक लो बॅटरी होऊन फोन बंद पडला तर होणाऱ्या त्रासाचे काय वर्णन करणार? कुठलाही स्मार्टफोन वापरण्यासाठी त्याची बॅटरी योग्य पद्धतीने चार्ज असणे सर्वात महत्त्वाचे असते.

बरेचदा असे होते की आपण अनेक तास फोन चार्जिंगला लावून तो चार्ज करून घेतो आणि वापरायला सुरुवात केल्यावर मात्र अगदी थोड्या वेळात बॅटरीचे चार्जिंग संपून जाते. आपल्या फोन मध्ये नक्की काय बिघाड झाला आहे हे आपल्याला समजत नाही. खरे तर स्मार्ट फोनची बॅटरी भरभर संपण्यामागे अनेक कारणे आहेत. फोनच्या बॅकग्राऊंडला अनेक गोष्टी घडत असतात ज्यांच्यामुळे बॅटरी वापरली जाऊन लवकर संपते. परंतु त्यांची आपल्याला कल्पनाही नसते.

आज आम्ही तुम्हाला फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होण्याची अशीच सहा कारणे सविस्तरपणे सांगणार आहोत.

१. फोनचा ब्राईटनेस जास्त असणे 

फोनची बॅटरी भरभर ड्रेन होण्याचे फोनचा ब्राईटनेस जास्त असणे हे एक प्रमुख कारण आहे. बहुतांश जणांना आपल्या मोबाईल फोनचा ब्राईटनेस जास्तीत जास्त ठेवण्याची सवय असते.

परंतु असे करण्यामुळे बॅटरी जास्त प्रमाणात वापरली जाऊन ती लवकर संपते. म्हणून आपल्या फोनचा ब्राईटनेस शक्यतो कमीत कमी ठेवावा किंवा आजकालच्या आधुनिक फोन्स मध्ये असते तशी ब्राईटनेस ऑटोमॅटिकली ऍडजेस्ट करण्याची सोय असणारा असावा. असे केल्यामुळे बॅटरी भरपूर प्रमाणात वाचवली जाते.

काही लोकांना डोळ्यांचा त्रास असल्यास फोनचा ब्राईटनेस जास्त ठेवण्याची गरज भासते. अशावेळी वारंवार वापरले जाणारे ॲप्स डार्क मोड वर ठेवावेत. तसे करण्यामुळे ब्राईटनेस कमी न करता सुद्धा भरपूर प्रमाणात बॅटरी वाचवता येते.

२. फोनवर बॅकग्राऊंडला सुरू असणारी ॲप्स 

आपल्या स्मार्टफोन वर आपण न वापरता देखील अनेक ॲप्स बॅकग्राउंडला सुरू असतात. अशा ॲप्स मध्ये VPN, अँटिव्हायरस, आरोग्यविषयक ॲप्स आणि कॅलेंडर यांचा समावेश होतो.

काहीही न करता देखील फोन मध्ये बॅकग्राऊंडला हे ॲप्स सुरू असतात आणि त्यामुळे बॅटरी वापरली जाते. जर यातील काही ऍप्स आपल्याला अनावश्यक वाटत असतील तर आपण आपला फोन “ऑप्टीमम यूज ऑफ बॅटरी“ ह्या मोडवर ठेवू शकतो. असे करण्यामुळे आपला फोन बॅकग्राऊंडचे अनावश्यक ॲप्स बंद करून बॅटरी वाचवू लागेल.

३. पिक्चर इन पिक्चर मोड 

आपण एखादे ॲप वापरत असताना त्याच स्क्रीनवर दुसरा एखादा व्हिडिओ उघडणे म्हणजे पिक्चर इन पिक्चर मोड. ही सुविधा सोयीस्कर जरी असली तरी त्यामुळे बॅटरी जास्त प्रमाणात वापरली जाते.

या सुविधेमुळे एकापेक्षा जास्त ॲप्स एकावेळी वापरता येतात हे जरी खरे असले तरी त्याचा बॅटरीच्या लाईफवर निश्चितच परिणाम होतो. बॅटरी वाचवण्यासाठी हे पिक्चर इन पिक्चर मोड डिसेबल करावे. फोनच्या ॲडव्हान्स सेटिंग मध्ये तशी सुविधा असते.

४. स्मार्टफोनवर २४ तास इंटरनेट चालू ठेवणे 

आपला फोन संपूर्ण वेळ वाय-फाय किंवा डेटाला जोडून ठेवला तर आपण २४ तास जगाच्या संपर्कात तर राहतो परंतु आपल्या फोनची बॅटरी मात्र भरभर संपते.

फोन सतत इंटरनेटला जोडलेला असल्यामुळे त्यावर वेगवेगळे नोटिफिकेशन्स, बॅकग्राऊंडला अपडेट्स आणि इतर ॲप्स संपूर्ण वेळ सुरू राहतात ज्याची खरे तर आवश्यकता नसते.

यावरचा अगदी सोपा उपाय म्हणजे आपण झोपताना आपल्या फोनचे वाय-फाय आणि डेटाचे कनेक्शन बंद करणे. असे करण्यामुळे भरपूर प्रमाणात बॅटरी सेव्ह करता येईल.

५. फोनची बॅटरी जुनी होणे 

फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होण्यामागे नेहमीच अनावश्यक ॲप्स किंवा सेटिंग हे कारण नसून काहीवेळा फोनची बॅटरी जुनी झालेली असणे हे कारण देखील असू शकते. स्मार्टफोन जुना झाला की त्याची बॅटरी देखील जुनी होऊ लागते.

फोनचा जितका जास्त वापर तितके त्याचे चार्जिंग जास्त आणि त्यामुळे बॅटरीचा वापर देखील जास्त.

त्यामुळे दोन ते तीन वर्ष जुना फोन वापरत असल्यास बॅटरी लवकर ड्रेन होण्याची समस्या उद्भवू शकते. (हे फोनच्या मॉडेलवर अवलंबून असून वेगवेगळ्या फोन्सचे आयुष्य वेगवेगळे असते).

अशावेळी काय करता येईल? यावर दोन उपाय आहेत. एकतर जुना झालेला फोन बदलून नवीन फोन घेणे किंवा आहे त्या फोनची बॅटरी बदलून घेणे. आहे त्या फोनची बॅटरी बदलून घेणे अर्थातच स्वस्त पडते, परंतु नवा फोन घेतल्यास नवी टेक्नॉलॉजी वापरायला मिळू शकते. त्यामुळे हा निर्णय ज्याचा त्यांनी घेण्याचा आहे.

६. फोनचे लोकेशन सतत ऑन असणे 

आपल्या मोबाईल फोनवर अनेक ॲप्स डाऊनलोड करताना आपण नकळत त्यांना आपले लोकेशन ट्रॅक करण्याची परवानगी देतो. तसे करण्यामुळे ते सर्व अॅप्स आपल्या फोनचे लोकेशन ट्रॅक करत राहतात. त्यामुळे आपल्या फोनची बॅटरी जास्त प्रमाणात वापरली जाते.

हल्ली जीपीएसचा वापर करून रस्ता शोधणे कितीही सोपे झाले असले तरी सतत लोकेशन ऑन ठेवल्यामुळे फोनची बॅटरी मात्र भरभर संपते.

असे होऊ नये म्हणून ज्या ॲपला आवश्यक असेल त्याच ॲपला लोकेशन ऑन ठेवावे. त्यामुळे बॅटरीची भरपूर प्रमाणात बचत होईल.

तर ही आहेत आपल्या फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होण्याची सहा प्रमुख कारणे.

याव्यतिरिक्त फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज न होऊ देण्यासाठी आणखी काही ट्रिक्स 

१. फोनची बॅटरी चार्ज करण्यासाठी ओरिजनल चार्जर वापरावा.

२. स्मार्ट फोनवर भरमसाठ ॲप्स डाऊनलोड न करता आवश्यक असतील तेवढीच ॲप्स डाऊनलोड करावीत.

३. रात्रीच्या वेळी शक्य असल्यास फोन फ्लाइट मोडवर ठेवावा.

तर अशाप्रकारे आज आपण आपल्या फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होण्याची कारणे जाणून घेतली तसेच तसे न होण्यासाठीच्या काही ट्रिक्स देखील जाणून घेतल्या. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख शेयर करायला विसरु नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।