एक गुंतवणूकदार म्हणून आपल्या गुंतवणुकीवर आपले लक्ष हवे. त्याची अधिकृत माहिती मिळवण्याचे पुस्तके, अहवाल, संकेतस्थळे, मोबाईल अँप यासारखे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी Moneycontrol हे सर्व उपयुक्त माहितीचे सर्वसमावेशक अँप आहे. या अँप विषयी पूर्वी माहिती देताना मी त्यास गुंतवणूकदारांचा मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या आशा अर्थाने ‘मितवा’ असे म्हटले होते. या अँपमध्ये अनेक उपयोगी गोष्टी असून ते पूर्ण क्षमतेने वापरले तर अन्य कोणत्याही माहितीची गरज पडणार नाही. अनेकांना हे अँप शेअर, म्युच्युअल फंड युनिटचे भाव पाहण्याचे आहे असे वाटते. यापलिकडे त्याचा कसा वापर करावा याची माहितीच नसते. अलीकडेच या अँपने आपला चेहरा मोहरा बदलल्याने थोडा गोंधळ होण्याची शक्यता आहे. तेव्हा थोडक्यात ह्या अँपचा कसा उपयोग होऊ शकतो ते जाणून घेऊयात.
ज्यांच्याकडे Moneycontrol हे अँप पूर्वीपासून आहे किंवा ज्यांच्या मोबाइल मध्ये आधीपासूनच (Inbuilt) आहे. त्यांना त्याचे रूप बदलले आहे हे लक्षात आले असेलच. ज्यांच्याकडे ते नाही त्यांनी प्ले स्टोरवरून इंस्टोल करून घ्यावे. ते सुरू झाल्यावर होमपेज दिसेल.
पेजच्या वरील डाव्या बाजूस Home तर उजव्या बाजूस गोलात app चे, त्याच्या शेजारी दुर्बिणीचे (म्हणजे Search ), त्याच्या बाजूस एका गोलात व्यक्तीचे चित्र आहे. त्याखाली एक व्यावसायिक जाहिरात, त्याखाली शेअरचे भाव दाखवणारी धावती पट्टी त्याखाली Top news आणि Indises यामध्ये Moneycontrol pro ची जाहिरात दिसेल.
तर एकदम तळात डावीकडून उजवीकडे Home, Market, Portfolio, News आणि Menu यांचे आयकॉन दिसतील. आपण आत्ता Home वर आहोत हे त्याखाली असलेल्या निळ्या रेषेवरून समजेल. येथील Home आणि Menu सोडून आयकॉन हे वेगवेगळ्या विभागाचे शॉर्टकट्स आहेत. तेव्हा आपण Home पेजवरील उजव्या बाजूस तळाला असलेल्या Menu ला क्लिक करू.
Menu ला क्लिक केले की अलिबाबाच्या गुहेसारखा ‘खुल जा सिमसीम’ म्हणून सर्व खजिनाच उघडेल. (दुसरे चित्र पहा) अगदी वरती एका गोलात व्यक्तीचे चित्र त्याशेजारी आपला ई मेल त्याखाली आपली प्रोफाइलची खात्री करून घेतली असेल/नसेल तर verified / not verified असे येईल. त्याशेजारील उजव्या बाजूस चौकोनी दाते असलेले चक्र दिसेल त्यावर क्लिक केले असता आपण पुन्हा होम पेजवर जाऊ शकतो. याखाली Moneycontrol Pro कडे जाण्याचा मार्ग आणि त्याखाली विविध विभाग उप विभाग दिसतील. ते क्रमानुसार असे
- Home: येथूनही होम पेजवर जाता येईल. येथे Menu मधील 60% हून अधिक गोष्टींचे शॉर्टकट आहेत.
- News: याचे Top news, My news, Markets, Stocks, Opinion, Podcast, Business, Moneycontrol research, Mutual funds, Commodities, Economy, Politics, International आणि Startups हे उपविभाग दिसतील. सर्व प्रकारच्या बातम्या येथे मिळतील.
- Stock Premier Leage: हा एक शेअर मार्केट वरील क्रिकेटसारखा खेळ आहे ज्यात कोणीही भाग घेऊ शकतो तो कसा खेळायचा याची माहितीही आहे. याचे दैनिक, साप्ताहिक व मासिक विजेते जाहीर केले जातात.
- Media : हा या खालील विभाग असून त्यात CNBC चे TV18, AWAAZ, BAJAR हे चॅनल लाईव्ह पाहता येतील. तर या चॅनेलवरील काही निवडक भागांचे व्हिडीओज Vedios on demand मध्ये उपलब्ध आहेत.
- Foram: याचे My Forum, Explore, Surch Massages असे उपविभाग आहेत. यातून आपल्या गुंतवणुकीच्या संबधी इतरांची मते समजतात तसेच आपण आपले मतही तेथे व्यक्त करू शकतो.
- Specials: या विभागात गुंतवणूक संबंधित चालू विषयावरील लेख / पीपीटीज आहेत त्यातील 5/6 निवडक लेखांचे शिर्षक दिले असून त्यावर क्लिक केले तर तो लेख / पीपीटी पहाता येईल.
- My Portfolio: यात आपल्या शेअर, म्युच्युअल फंड युनिट, एसआयपी, सोने, पीपीएफ, एफडी, रिअल इस्टेट, युलीप अशा सर्व प्रकारच्या बचत आणि गुंतवणुकीची नोंद ठेवता येऊन त्याचे गुंतवणुकीप्रमाणे तसेच एकत्रित मूल्य पाहता येईल तसेच असलेल्या कर्जाची नोंद ठेवून त्याचा आढावा घेता येईल.
- My Watchlist : या विभागात आपण लक्ष ठेवीत असणाऱ्या Stocks, Mutual Funds, Commodities, Futures, Currencies याची सर्व माहिती मिळेल. ही यादी हवी तेव्हा अद्ययावत करता येऊन यासंबंधीची अधिक महत्वाची बातमी My Alerts या उपविभागातून मिळेल.
- Personal Finance : या विभागातून आपल्या गुंतवणुकीच्या संदर्भातील विविध विषयांवरील लेख वाचयाला मिळतील.
- Current Affairs : या खालील विभाग चालू घडामोडीवर असून सध्या निवडणुका चालू असल्याने यासंबंधीत लेख तेथे आहेत
- Markets : या विभागात Indian Indices, Global Indices, Market Moovers, Earnings, F&O Action, IPO, FII, DII & MF Activity, Broker Research असे उपविभाग आहेत. यात विविध निर्देशांक, त्यातील शेअर्स, त्याचे दिवसातील, 5 दिवसातील, 1,3,6 महिन्यातील व एक वर्षातील सर्वात कमी/जास्त भाव, उलाढाल, सर्वाधिक मागणी असलेले/ नसलेले शेअर्स, त्याचे दर्शनी मूल्य, बाजारभाव, विशेष माहिती, ऑप्शन फ्युचर्स चा लॉट , कंपनीच्या विषयीची सर्व माहिती, लोकांच्या प्रतिक्रिया, ब्रोकरेज हाऊसचे मत, ओपन इंटरेस्ट अशी सर्व आवश्यक माहिती मिळेल.
- Commodities : Top Commodities आणि Commodities Movers वस्तुबाजारातील विविध वस्तूंचे दर, त्यांच्या मागणी पुरवठ्यातील फरक आणि भविष्यातील दर समजू शकतील.
- Currencies : Top Currencies, Currency Movers आणि Exchange Rate असे उपविभाग असून त्यामधून चलनांसंबंधी सर्व माहिती मिळून विविध चलनांचा विनिमय दर समजेल.
- Mutual Funds: Top Ranked Schemes आणि Top Performed Schemes असे उपविभाग आहेत यात योजनेविषयी सर्व माहीती- त्याचा प्रकार, गुणवत्ता आणि 1 महिना ते 5 वर्षात मिळालेला परतावा समजू शकेल, ज्यामुळे म्युच्युअल फंड योजनेची निवड करता येईल.
- Tools : यात नेहमीच्या उपयोगाची सूत्रे आहेत. ज्यायोगे झटपट निष्कर्ष काढता येईल.
- Supports: यात आपण आपल्या प्रतिक्रिया देऊ शकतो.
- Saved Articles: यात आपण आपणास सवडीने वाचावा वाटेल असा लेख घेऊन तो ऑफ लाईन वाचू शकतो.
- App Info : यात Privacy Policy, Share this App, Rate this App आणि More Apps हे विभाग असून यात अँप विषयीची माहिती, ते मित्रांना पाठवायची विनंती, त्याचे आपण केलेले मूल्यांकन नोंदवायची सोय आहे तसेच या प्रकाराची अन्य अँप्स कोणती आहेत ती डाउनलोड करून घेण्याची सोय उपलब्ध आहे. यातील प्रत्येक विभाग, उपविभाग परिपूर्ण असून जेवढे खोलवर जाऊ तेवढी अधिक माहिती मिळेल. यातील प्रत्येक विभागावर स्वतंत्र लेख होऊ शकतो आणि मुख्य म्हणजे उपविभागात क्लिक करून थेट जाता येते. सर्वात शेवटी तज्ञ व्यक्तींचे सल्ले आहेत. जे थोड्या प्रमाणात मोफत तर अधिक प्रमाणात फी आकारून दिले जातील.
जे लोक पुर्वी हे अँप वापरीत होते त्यापेक्षा अधिक माहिती या अँपमध्ये असल्याने ते सर्वांना उपयुक्त ठरेल. हे फ्री अँप असल्याने यात काही व्यावसायिक जाहिराती आहेत पण त्या व्यत्ययकारक नाहीत. जाहिराती नसलेले पेड व्हर्जन हवे असल्यास आहे आवश्यकतेप्रमाणे घेता येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.