पैसा खेचणारा चुंबक बनायचंय? मग या दृष्टिकोनाने काम करा

मला काहीही करून कामात यश येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, पैसा कमवण्यासाठी काम करण्याच्या नादात जगणंच राहून जात, हे प्रश्न बरेच जणांना पडतात.

म्हणूनच हा लेख वाचा या दृष्टिकोनाने आपल्या कामाकडे पहिले तर पैसा आपोआपच चुंबकासारखा तुमच्याकडे खेचला जाईल.

बाकी सगळ सोंग आणता येतं पण पैशाचं सोंगं आणता येत नाही असं म्हणतात. सगळ्यांनाच पैसे कमवायचे असतात, श्रीमंत व्हायचे असते, चांगल्या घरात राहायचे असते, मोठ्या गाडीतून फिरायचे असते पण हे जमणार कसे हा प्रश्न बहुतेक जणांना पडलेला असतो.

पैसे कमावणे जेवढे महत्वाचे तेवढाच महत्त्वाचा असतो आपला दृष्टिकोन. लेखाला सुरवात करताना आधी एक गोष्ट सांगतो.

एका शहरात राजेश आणि तारा नावाचे जोडपं राहत होतं. राजेश चांगल्या कंपनीत सेल्समध्ये कामाला होता आणि तारा लहान मुलांच्या शिकवण्या घ्यायची.

त्यांची फार मोठी स्वप्नं होती पण कमाई तेवढी नव्हती. स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कर्ज घेण्याचा सगळ्यात सोपा मार्ग निवडला.

कर्ज घेऊन त्यांनी मोठं घर घेतलं, गाडी घेतली, क्रेडीट कार्डच्या जोरावर भरमसाठ खरेदी केली, भरपूर फर्निचर सुद्धा घेतले. क्रेडीट कार्ड आणि ईएमआय अशा वेगवेगळ्या पद्धती वापरल्यामुळे खर्च करताना तर त्यांच्या लक्षात आलं नाही पण हळूहळू त्यांच्या कमाई पेक्षा लोनचे हफ्ते, क्रेडीट कार्डचे हफ्ते इत्यादी जास्त होऊ लागले.

थोडक्यात क्रेडीट पेक्षा डेबिट जास्त झाले आणि ते अडचणीत सापडले.

एवढ्या संकटात सापडल्यावर त्यांना आता पुढे काय करावं हे सुचेना. शेवटी त्यांनी त्यांचं काय चुकलं हे शोधायला अगदी मुळापासून सुरवात केली आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा पैशांकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे.

त्यांनी आता खूप विचारपूर्वक आपला पुढचा प्रवास सुरु केला. सगळ्यात आधी ते राहतं घर, गाडी विकून एका छोट्या गावात, छोट्या घरात राहायला आले. नवऱ्याने होती ती नोकरी सोडून थोड्याशा भांडवलावर लहानसा धंदा सुरु केला आणि बायकोला गावात सुद्धा मुलांच्या शिकवण्या मिळायला काहीच त्रास झाला नाही.

आता त्यांचा खर्च खूपच कमी झाला होता आणि उत्पन्न त्यामानाने जास्त होत. अशीच काही वर्षे गेली आता राजेशच एक मोठं इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे शोरूम आहे आणि ताराच्या क्लासच्या तीन शाखा त्यांच्या आजूबाजूच्या गावात सुद्धा उघडल्या आहेत.

कर्जबाजारी असण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास गावातील एक मोठे प्रस्थ बनण्यापर्यंत आला होता.

ह्या गोष्टीतुन आपल्या लक्षात येईल की पैसे कमावण्याचा, पैशांबाबतचा दृष्टिकोन किती महत्वाचा आहे.

तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात पैसे कमवण्याचा प्रयत्न करत आहात? अनेक लहानमोठे उद्योग करून, भरपूर कष्ट करून पैसे कमवायच्या प्रयत्नात आहात पण कुठेतरी कमी पडताय असं वाटतंय?

मनाचे Talks च्या फेसबुक पेजवर आपण जे ३० डेज फायनान्शिअल चॅलेंज घेतले त्यात बरेच जण सांगतात कि रोज ठरल्याप्रमाणे १०० रुपये पिगी बँक मध्ये टाकणं काही शक्य होत नाही.

किंवा नव्याने एखादा व्यवसाय सुरु करायचा आहे? मग हा लेख तुमच्यासाठीच आहे.

या लेखात आपण अशाच काही टिप्स बघणार आहोत ज्याने आपला सुद्धा पैसे कमवण्यासाठी योग्य असा दृष्टीकोन बनायला मदत होईल आणि हळूहळू आपली श्रीमंतीकडे वाटचाल होईल.

१. प्रयत्नांचं बक्षीस नजरेसमोर ठेवा :

आत्ता तुमच्यासमोर कागद पेन असेल तर लगेच तुम्हाला आयुष्यात करायच्या असलेल्या 10 गोष्टींची यादी करा व ती रोज दिसेल अशा ठिकाणी लाऊन ठेवा.

या 10 गोष्टींमध्ये अगदी लहान लहान गोष्टींपासून सुरवात करून शेवटी मोठ्या गोष्टींकडे जा.

ह्यात अगदी एखादा आवडत मोबाईल फोन घेणे, आवडती बाईक घेणे, इथपासून सुरवात करून मग बाहेर कुठेतरी फिरायला जाणे, स्वतःचा बंगला बांधणे अशा मोठ्या गोष्टींकडे ह्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात.

ही यादी तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ नेईल आणि तुम्हाला काम करायला, पैसे वाचवायला प्रवृत्त करेल तसंच जर तुम्ही तुमच्या ध्येयापासून विचलित झालात तर तुम्हाला परत योग्य मार्गावर आणण्यासाठी मदत करेल.

आपल्या प्रयत्नांना मिळणारे बक्षीस जर आपल्या समोर असेल तर अजून जास्त जोर लावायला आपल्याला हुरूप येतो.

२. परिणामापेक्षा कामावर लक्ष केंद्रित करा :

जसं आपल्याला गीतेत सांगितले आहे की कर्म करत रहा, फळाची अपेक्षा करू नका तेच आपण थोडं वेगळं करून अमलात आणायचं आहे.

आपण फळाची अपेक्षा तर करायची आहे पण त्यावर लक्ष केंद्रीत न करता पूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित करायचे आहे.

समजा आपण एखादी वस्तू विकत असू तर आपण ती जास्त प्रमाणात विकली कशी जाईल यावर जास्त भर देत असतो किंवा समजा आपण एखाद्या कोचिंग क्लासेसचे मालक असू तर आपल्या क्लासमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कसे येतील याचाच आपण विचार करत असतो.

जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे कसे आकर्षित करता येईल हाच आपल्या मनात विचार असतो आणि त्या दृष्टीनेच आपले प्रयत्न असतात.

पण इथेच आपलं गणित चुकत असतं. आपण फळावर जास्त लक्ष दिल्यामुळे आपल्या कामाकडे दुर्लक्ष होते आणि आपल्या वस्तूचा दर्जा घसरतो किंवा आपल्या क्लास मधून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा घसरतो आणि आपलं फळ सुद्धा आपल्यापासून दूर जाते.

आपल्या कामावर लक्ष देऊन ते उत्तम केलं तर ग्राहक आपोआप आपल्या वस्तूकडे खेचला जाईल किंवा विद्यार्थ्यांना क्लास लावण्याशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाही.

कुठलाही बिजनेस असो व नोकरी आपल्याला यातून काय मिळणार यावर लक्ष केंद्रित केले कि संपले. तुम्ही तुमचे बेस्ट द्यायला सुरुवात करा पैशांचा ओघ आपोआप तुमच्याकडे वयात येईल.

३.  स्वतःला ओळखा :

आपण बऱ्याच यशस्वी लोकांच्या गोष्टी ऐकतो किंवा त्यांच्याबद्दल वाचतो. ह्याचा आपल्याला प्रेरणा मिळण्यासाठी चांगला उपयोग होतो पण त्याचबरोबर आपण कधीकधी त्या लोकांना कॉपी करायचा प्रयत्न करतो.

स्टीव्ह जॉब्सने जे केलं किंवा धीरूभाई अंबानींनी जे केलं ते करू शकले करण त्यांच्या अंगात काही गुण होते. पण आपण कोणालाही कॉपी करायचा प्रयत्न करण्यापूर्वी आपल्यामध्ये कोणते गुण आहेत हे ओळखणे गरजेचे आहे.

असं न करता जर आपण त्यांनी केलं तेच करायचा प्रयत्न केला तर आपण नक्कीच अयशस्वी होऊ. ह्या ऐवजी स्वतःमध्ये कोणते गुण आहेत आणि त्यांचा वापर आपण कोणत्या प्रकारे करू शकतो हे ओळखणे सगळ्यात महत्वाचे आहे.

घोडा पोहण्याच्या स्पर्धेत किंवा मासा पळण्याच्या स्पर्धेत जसं जिंकू शकत नाही त्याचप्रमाणे दुसऱ्या कुणाला तरी जमलं म्हणून विचार न करता त्या गोष्टी केल्या तर आपण त्यात यश नाही मिळवू शकत. म्हणून स्वतःला ओळखा, स्वतःची बलस्थाने ओळखा आणि कामाला लागा.

आता याचं एक उदाहरण बघा, माझ्या परिचयाचे एक शर्माजी आहेत (काल्पनिक नाव). त्यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये मोबाईल ऍक्सेसरीजचे दुकान, बँक रिकव्हरी एजन्सी, किराणामालाचे दुकान असे तब्बल तीन उद्योग केले.

सगळीकडे नुकसान झाल्याने सरतेशेवटी डोक्यावर मोठा कर्जाचा बोजा घेऊन ओला, उबर मध्ये लावण्यासाठी एक कार घेतली. एवढे सगळे सांगण्याचा उद्देश हा कि स्वतःला आणि स्वतःच्या बलस्थानांना ओळखा.

४. आयुष्यभर विद्यार्थी राहा:

असं म्हणतात की माणूस आयुष्यभर विद्यार्थी अवस्थेतच असतो. सतत काहीनाकाहीतरी शिकत राहणे म्हणजे उत्तम प्रकारे जगणे!

पैसे कमवायचे असतील तर ज्ञान कमवायची तयारी ठेवली पाहिजे. नवनवीन गोष्टी शिकून त्या आचरणात आणल्या पाहिजेत. नोकिया ही कंपनी एकेकाळी मोबाईल जगाची सम्राट होती पण नवीन तंत्रज्ञानाकडे केलेले दुर्लक्ष त्यांना एवढे भारी पडले की ती कंपनी काही काळ बंद करावी लागली.

स्वतःला अपडेट ठेवणे हे सगळ्यात महत्वाचे आहे. आपण जे काही करत असू त्यातले नवीन ज्ञान सतत मिळवत राहा. त्यामुळेच तुम्ही तुमच्या इतर स्पर्धकांच्या नेहमी पुढे राहू शकता.

५. अल्प संतुष्ट राहू नका :

दर दिवशी, प्रत्येक सेकंदाला आपण निर्णय घेत असतो.

या लहान-मोठ्या निर्णयांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो. प्रत्येक निर्णय, कितीही छोटा का असेना, महत्वाचा असतोच.

त्यामुळे आपण सतत सतर्क राहायला हवं. आयुष्यात किती आणि कसे पैसे कमवायचे हा तुमचा निर्णय असतो..

तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागतो व तो घेण्यासाठी तुम्हाला स्वतःला काही प्रश्न विचारायची गरज असते, जसे की मी माझं सगळं कर्ज लवकरात लवकर कधीपर्यंत फेडू शकतो?

त्यासाठी मला काय करावं लागेल? माझ्या सध्याच्या नोकरी/व्यवसायापलीकडे मी जास्तीचे पैसे कमवण्यासाठी अजून काय करू शकतो?

माझ्या वागण्यात किंवा कामाच्या पद्धतीत असा कोणता बदल गरजेचा आहे की ज्याच्यामुळे मला अधिक फायदा होईल?

जे आपल्याकडे आहे त्यात समाधानी राहण्याने आपली प्रगती खुंटते आणि नवीन मार्ग आपण शोधू शकत नाही. सतत आज आहोत त्यापेक्षा पुढे जायची धडपड करत राहणे गरजेचे आहे.

६.  हार मानू नका:

हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तुमची वेळ आणि मेहेनत द्यायची तयारी असेल तर पैसे कमवणे म्हणजे काही फार अवघड काम नाही.

तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल तर न कंटाळता, परीस्थितीमुळे न डगमगता तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत. असं झालं तर यश मिळेलच.

एखाद्या अपयशाने खचून न जाता चिकाटीने पुढे जाण्यामुळेच यश मिळणार.

तुमचा दृष्टीकोन फार महत्वाचा आहे. समोर असलेली संधी हेरण्यात तुम्ही यशस्वी झालात की झालं.. मग शक्य असेल त्या चांगल्या मार्गाने, स्वकष्टाने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कमवू शकता आणि ते सुद्धा कसलंही टेन्शन न घेता!

या ६ टिप्सचा तुम्ही तुमच्या आयुष्यात उपयोग केलात तर तुमचा दृष्टीकोन नक्की बदलेल. येणारी प्रत्येक समस्या तुम्हाला एक संधी वाटू लागेल. फक्त आणि फक्त तुमचे विचार तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जातील.

मनाचे श्लोक

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

4 thoughts on “पैसा खेचणारा चुंबक बनायचंय? मग या दृष्टिकोनाने काम करा”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।