तसेही संकल्प पुरे झाले नाही तरी फार मोठे संकट कोसळणार नसते. पण जर पुरे झालेच तर त्याचा आनंद चिरकाल टिकणारा नक्कीच असतो. या लेखात, नवीन वर्षाचे संकल्प ‘न्यू इयर रिझोल्युशन’ हवेत विरून न जाऊ देता निग्रहाने कसे पूर्ण करता येतील यासाठीच्या चार टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे.
दर वर्षी ३१ डिसेंम्बर पार करून १ जानेवारी मध्ये दाखल होताना आपल्यामध्ये नवीन उत्साह संचारत असतो.. त्या उत्साहात सगळेच आपापल्या आयुष्याचे मोठमोठे ‘पण’ घेतात.. ‘पण’ म्हणजे दुसरं तिसरं नाही तर रेझोल्युशन..!!
तर मित्रांनो हे रेझोल्युशन म्हणजे निग्रह किंवा नवीन निश्चय म्हणा.. पण हा एक अजब प्रकार आहे हं.. म्हणजे ३१ डिसेंम्बरला अशा सगळ्या गोष्टी आपण करतो आणि त्यातल्या काही १ जानेवारीपासून करणार नाही असे स्वतःला वचन देतो.
म्हणजे जसे फास्ट फूड उद्या पासून बंद डायट चालू किंवा, दारू सिगरेट बंद किंवा सगळ्यांचा आवडता संकल्प म्हणजे उद्या पासून जिमला जाऊन वजन कमी करणार…!!! वगैरे, वगैरे…
जो जानेवारीत चालू तर होतो.. आणि जानेवारीतच बंदही पडतो.. जानेवारी तीच हं… पुढच्या वर्षाची नाही!!
सांगा बरं कोणाकोणाचा निश्चय जानेवारीत सुरू होऊन डिसेंम्बर पर्यंत टिकलाय..??
खूप कमी लोक असतात असे निग्रही. जे ठरवलेल्या गोष्टी चिकाटीने पूर्ण करतात त्यांनी जाणीवपूर्वक काही गोष्टी आपल्यात भिनवलेल्या असतात. संकल्प ठरवताना सुद्धा तो विचारपूर्वक ठरवलेला असतो.
आपले रिझोल्युशन असे हवेत विरून जायला नको असे आपल्या सर्वांनाच वाटते. रिझोल्युशन पूर्ण करण्यासाठी स्वतःला निग्रही बनवता येईल अशा चार टिप्स या लेखात मी तुम्हाला सांगणार आहे.
१. स्वतःला आरशात निरखून पहा आणि विचारा मी आज कुठे आहे?
आरशापुढे उभे राहून स्वतः, स्वतःबद्दलचे काही मुद्दे आठवा..
तुमच्या आयुष्यात माईल स्टोन ठरलेले कोणकोणते प्रसंग आहेत? जेव्हा तुम्हाला खूप ताकदवान वाटले किंवा निराश वाटले..?
पुढील पैकी कोणत्या आघाड्यांवर तुम्ही यशस्वी झालात?
१) करिअर: कोणकोणत्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला यश मिळाले? तुम्ही कसे कसे मोठ्या हुद्द्यांवर पोहोचलात?
२) कुटुंब: तुम्ही पोटापाण्याच्या कर्तव्याबरोबर आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या कशा पार पाडता आहात?
३) मित्रपरिवार: तुम्ही आपल्या मित्रपरिवाराला किती महत्व दिले? त्यांची जपणूक काशी करत आहात?
४) अध्यात्म: रोजच्या जगण्याला मिळालेली अध्यात्माची जोड तुम्हाला कसे यशस्वी करत आहे? तुम्ही अगदीच अध्यात्मिक नसलात तरी तुमच्यातली सकारात्मकता तुमच्यात किती चांगले बदल घडवून गेली? याचा आढावा घ्या.
५) तब्येत: तुमच्या मनावर तुमचा ताबा आहे आणि तो तुम्हाला किती फायदेशीर आहे. तुम्ही सुदृढ राहण्यासाठी काय करत आहात
६) धमालमस्ती: तुमच्या आयुष्यात धमालमस्ती करायला जागा आहे का आणि ती टिकवून कशी ठेवता येईल ह्या कडे एक नजर टाका.
मागच्या वर्षीच्या पूर्ण न झालेल्या रिझोल्युशन्सना पहात कुंथण्यापेक्षा वरील पैकी कोणत्या खात्यावर आपण किती पुंजी जमा केलीये ह्याचा विचार केला तर उत्तम.
काही एरियांवर थोडी अजून मेहनत घ्यावी लागणार असेल तर त्याबद्दलची दिशा ह्या वर्षाकरिता ठरवा. ऑफिसच्या कामातल्या त्रुटी दूर करा, मित्र, कुटुंब ह्यांच्या सोबत जास्त वेळ घालवण्याबद्दल विचार करा.
२. थोडेसे स्वतःच्याच इतिहासात परत जाऊन काही माहिती मिळेल का ते आठवा?
होय..!! स्वतः काही वर्षांपूर्वी काही भन्नाट केले असेल तर त्या आठवणी पुन्हा जागवा. आठवा तरी कोणत्या कामात तुम्हाला यश मिळाले होते.
आणि त्यासाठी तुम्ही कोणत्या ट्रिक्स वापरल्या..?? तसाच पेच प्रसंग भविष्यात येणार आहे का ह्याचीही चाहूल आपल्याला असतेच की..
मग त्या क्लृप्त्या पुन्हा घोटून पक्क्या करा. कोणाशी झालेले भांडण कसे मिटवले, कोणता अवघड प्रोजेक्ट कसा संपवला, कोणाच्या अडचणीत आपल्या बहुमूल्य उपदेशाचा कसा फायदा झाला.. आणि बरेच काही..
आपल्या अचिव्हमेंट्स साठी आपली पाठ थोपटून घ्यायला विसरू नका.
नवीन संकल्प शोधण्यापेक्षा जुने ‘ट्राईड अँड टेस्टेड’ नुस्खे अडकलेल्या कामांसाठी वापरण्याची शक्कल लढवा..!!
तुमचे जुने निर्णय आणि जुने प्लॅन्स आत्ताही नक्कीच खूप आत्मशक्ती आणि आत्मविश्वास देतील जुन्या निग्रहांना ह्या वर्षी हाता वेगळे करणार ना..??
३. मनाचे खेळ समजून घ्या.
आपण मोठ्या गोष्टी केव्हा करू शकतो माहित आहे? जेव्हा आपण आपल्या मनाला कन्व्हिन्स केलेलं असेल….
खूप मजेशीर आहे हे.. म्हणजे एखादा निश्चय, उदाहरणार्थ: तुम्हाला बारीक व्हायचं होतं.. काही हाजार भरून तुम्ही जिम लावली.. १ जानेवारी पासून जोमात सुरुवात झाली.. टार्गेट सुद्धा ठरवलं.. पण जोश कमी झाला.. आणि हळू हळू सगळं बंद पडलं.. आता मोठी ढेरी तुम्हाला आरशात बघुच देत नाहीये..
का झालं बरं असं..??
कारण तुमचा संयम ढळला.. इन्स्टंट च्या जमान्यात आपल्याला धीराने काही करायची सवयच उरली नाहीये..
वजन हलत नाहीये द्या जिम सोडून.. बिझनेस चालत नाही, करा बंद.. नोकरीत एक वर्षात बढती नाही मिळाली, दुसरे पर्याय शोधा..
एखादी गोष्ट होत नाही इतकंच नाही तर होऊच शकणार नाही!! हे फक्त आपल्या मनाचे खेळ असतात.. जरा म्हणून जीवाला शांतता नाही.. कशाला पाहिजे इतका उतावीळपणा..?? घ्याकी संयमानं..!!
सुरु केलेल्या गोष्टीला थोडा वेळ द्या. बघा स्विमिंगला जायचं ठरवलं असेल, दहा दिवस गेले, पंधरा दिवस गेले, वीस दिवस गेले….
धीर धरा मनाच्या खेळांना आपल्यावर मात करू देऊ नका. बघा निग्रहाने ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करणं कसं सोप्प होऊन जाईल.
४. माझा उद्देश काय होता..?
संकल्प जोशात घेतो खरे पण त्याचे मूळ उद्दिष्ट आपण कालांतराने विसरून जातो.. म्हणजे BP वाढल्याने खरे तर वजन कमी करायचे असते..
पण श्रमच सहन होत नसल्याने आपण सोडून देतो.. खरे तर मूळ उद्दिष्ट लक्षात ठेवले आणि सतत घोकले तर आपल्या प्रयत्नांना त्याची जोड मिळते..
नवीन वर्षाचे संकल्प साधारण आपण ठेवतो ते खुपशे कॉमन असतात. उद्देश लक्षात घेऊन स्पेसिफिक गोल ठरवायचा प्रयत्न करा.
संकल्प हा डिसेंबरात ठरवून जानेवारीत संपण्यासाठी नसावा हे ध्यानात घ्या.. छोट्या छोट्या गोष्टी पार पाडत, लहान मार्ग घेत आपल्या उद्दिष्टांपर्यंत आपण नक्की पोहचू शकतो..
आणि कालावधी थोडा थोडका नाही तर १२ महिन्यांचा – ३६५ दिवसांचा असतो.!! त्यामुळे लहानसा आणि सोप्पा संकल्प निवडा अथवा मोठा आणि अवघड तो तडीस न्यायला वरील काही मुद्द्यांचा आधार नक्की घ्या. बघा काही बदल ह्या वर्षी घडवता येतोय का..??
तसेही संकल्प पुरे झाले नाही तरी फार मोठे संकट कोसळणार नसते. पण जर पुरे झालेच तर त्याचा आनंद चिरकाल टिकणारा नक्कीच असतो. तर मित्रांनो तुमचे संकल्प ह्या वर्षी पूर्ण व्हावेत अशा मनाचेTalks तर्फे तुम्हाला शुभेच्छा..!!
आणि हो आमचा संकल्प आता ऎका, या वर्षभरात मनाचेTalks असेच तुमच्यासाठी छान ‘लाईफ हॅक्स’…. ‘निन्जा टेक्निक्स’… आणि बरंच काही घेऊन येणार आहे.
बरेच वाचक जेव्हा आम्हाला सांगतात कि ‘मनाचेTalks’ ला आम्ही रोज ‘मनाचे श्लोक’ सारखे वाचतो…. तेव्हा आमच्या लिहिण्याचं खरं सार्थक होतं हे वेगळं सांगायलाच नको.
नवीन वर्षाचे संकल्प सत्त्यात उतरावेत यासाठी माझ्या आयडिया!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
संकल्प
संकल्प तर दरवर्षी करत होतो या लेखाच्या माध्यमातून दृढनिश्चय व निग्रह असेल तर रिझोल्यूशन तडीस जाऊ शकतो याची खात्री पटली तसेच इन्स्टंट जमान्यात धीराने संयमाने मनाच्या खेळांन वर मात करत निग्रहाने ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करणे हे कळाले.
संकल्प 2020