उन्हाळ्याची नेहमीची समस्या! नाकाचा घोळणा फुटला, मग काय करायचं?

उन्हाळ्याचे दिवस असतात, सगळी लहान मुले बाहेर खेळत असतात आणि एकदम गलका होतो, ‘अरे अमक्याच्या किंवा अमकीच्या नाकातून रक्त आलं’

किंवा एखाद्या ऑफिस मध्ये एसी सुरू असतो, वातावरण खूप थंड झालेलं असतं आणि अचानक एखाद्याने नाकाला रुमाल लावला की त्यावर रक्त दिसतं.

अशा परिस्थितीत सर्वांची पाहिली प्रतिक्रिया ही घाबरून जाण्याचीच असते.

परंतु नाकातून रक्त येणे हे अगदी घाबरून जाण्याइतके गंभीर नाही.

नाकाचा घोळणा फुटणे म्हणजेच नाकातून रक्त येणे ही गोष्ट सर्वांना आयुष्यात केव्हा तरी एकदा का होईना अनुभवायला मिळतेच.

नाक हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा अवयव आहे.

नाकाने आपण श्वास घेतो. पण त्यामुळेच बाहेरची कोरडी हवा, बदलणारे तापमान आणि ऋतु ह्यांचा परिणाम नाकावरच सर्वात जास्त होतो.

वातावरणाचे तापमान अचानक वाढणे किंवा कमी होणे, हवा अचानक खूप कोरडी होणे अशा कारणांमुळे नाकातून रक्त येते.

लहान मुले आणि प्रौढ अशा सगळ्यांमध्येच ही समस्या दिसून येते.

नाकातून रक्त येणे ही काही फार गंभीर समस्या नाही. असे रक्त आले तरी ते काही मिनिटात थांबते.

परंतु वारंवार जर नाकाचा घुळणा फुटत असेल तर मात्र या समस्येचे योग्य ते निदान करून औषधोपचार करणे आवश्यक आहे.

नाकातून रक्त का येते ?

१. बाहेरील तापमानाचा सर्वात जास्त परिणाम होणारा अवयव म्हणजे नाक.

नाकातूनच बाहेरची कोरडी, अत्यंत थंड किंवा अत्यंत गरम हवा आत जाते.

त्या हवेचं तापमान आपल्या शरीराच्या तापमानाशी जुळवण्याचा नाक प्रयत्न करते.

अशा वेळी अत्यंत नाजुक असणारे नाकाचे मेंब्रेन (नाकाच्या आतील त्वचा) फाटते आणि रक्तस्त्राव सुरू होतो.

२. नाकाचे मेंब्रेन हे अत्यंत नाजुक असते. तेथील रक्तवाहिन्या देखील अतिशय संवेदनशील असतात.

त्यामुळे हवामानातील बदल इत्यादी बरोबरच खूप सर्दी होणे, नाक कोरडे पडणे, शिंका येणे ह्यामुळे देखील ते

मेंब्रेन फाटून रक्तस्त्राव होऊ शकतो.

नाकातून रक्त येण्याचे प्रकार

नाकातून रक्त येण्याचे २ प्रकार आहेत.

१. नाकाच्या बाहेरील भागातून येणारे रक्त (ऑर्डीनरी नोज ब्लीड) 

हा रक्तस्त्राव नाकाच्या पुढच्या भागातून होतो. म्हणजेच दोन नाकपुड्यांच्या मध्ये असणाऱ्या पातळ पडदयास (सेपटम) इजा होऊन रक्त येते.

हे सहसा लहान मुलांमध्ये आढळून येते.

२. नाकाच्या आतील भागातून येणारे रक्त (पोस्टेरियर नोज ब्लीड) 

शरीरातील रक्त वाहिन्या नाकाशी जिथे जोडलेल्या असतात तेथून जो रक्तस्त्राव होतो तो म्हणजे पोस्टेरियर नोज ब्लीड.

ह्यामध्ये रक्तस्त्राव होण्याचे प्रमाण जास्त असते.

तसेच हे सहसा प्रौढ व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आढळते.

नाकातून रक्त येण्याची कारणे

नाकातून रक्त येण्याची कारणे खालीलप्रमाणे

१. हवामान

हवेच्या तापमानात, आर्द्रतेत अचानक बदल झाला तर नाक कोरडे पडते.

नाकातील मेंबरेन ला इजा होते आणि नाकातून रक्त येते.

२. शारीरिक कारणे

१. एखाद्या अपघातामुळे चेहऱ्याला इजा झाली तर नाकाला देखील इजा होते. त्यामुळे नाकातून रक्त येते.

२. सर्दी झालेली असताना जर नाक खूप जोरात शिंकरले तर आतील भागाला इजा होऊन नाकातून रक्त येते.

३. कोरडी सर्दी झाली की नाक खूप कोरडे पडते व त्यामुळे नाकाच्या आतील भागातील मेंब्रेन फाटून नाकातून रक्त येते.

४. लहान मुलांना नाकात बोटे घालण्याची किंवा पेन्सिल सारखी टोकदार वस्तु घालण्याची सवय असते. त्यामुळे देखील नाकात इजा होऊन रक्त येते.

३. वैद्यकीय कारणे

उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांना नाकातून रक्त येण्याचा त्रास होऊ शकतो.

तसेच रक्त पातळ राहण्याच्या गोळ्या घेणाऱ्या व्यक्तींची रक्त गोठवण्याची प्रक्रिया मंद झालेली असते त्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त येण्याचे प्रमाण जास्त असते.

नाकातून रक्त येऊ नये म्हणून काय करावे

नाकातून रक्त येणे ही काही फार गंभीर समस्या नसली तरी असे होणे हे अर्थातच चांगले नाही.

ह्यामुळे नाकातून रक्त येणारी व्यक्ति अस्वस्थ होते, चिडचिडी होते.

म्हणून नाकातून रक्त येउच नये ह्यासाठी काय करता येईल ते आपण आज पाहूया

१. जर आपली नाकातून रक्त येण्याची टेंडनसी असेल तर नाक वारंवार शिंकरू नये.

२. घरातील तापमान आणि आर्द्रता नेहेमी समान राहील असे पहावे.

म्हणजे वारंवार फॅन, एसी लावणे, बंद करणे असे करू नये. सलग एकसारखे तापमान ठेवावे.

३. नाकाच्या आतील भागात पेट्रोलियम जेली लावावी.

४. कोरडे पडलेले नाक बोटाने कुरतडू नये.

नाकातील रक्तस्त्रावावर उपाय

जर नाकातून रक्त येऊ नये ह्याची काळजी घेऊनही नाकातून रक्त आलेच.

तर खालील उपायांनी ते कमी अथवा बंद करता येऊ शकते.

१. नाकातून रक्त येणाऱ्या व्यक्तीने सर्वप्रथम मान वर करून आडवे पडावे आणि रक्त येत असलेल्या ठिकाणी दाब द्यावा म्हणजे नाकातून रक्त येणे कमी होईल.

२. नाकाच्या आजूबाजूच्या भागात बर्फाने शेकावे.

३. पेट्रोलियम जेली किंवा एखादे क्रीम लावावे.

४. पोस्टेरियर नोज ब्लीड असेल तर रक्त येण्याच्या ठिकाणी औषध लावलेला कापूस ठेवावा.

५. वाकडे असलेले सेपटम हे जर नाकातून रक्त येण्याचे कारण असेल तर शस्त्रक्रिया करून ते दुरुस्त करून घ्यावे.

६. फार गंभीर रित्या नाकातून रक्त येत असेल तर रक्त वाहिन्यांचे लिगेशन म्हणजेच विशिष्ट धाग्याने रक्तवाहिन्या बांधून तेथेल रक्तप्रवाह थांबवणे हा उपाय आहे.

परंतु अर्थातच हा उपाय तज्ञ डॉक्टर अथवा वैद्य ह्यांच्या सल्ल्याने करण्याचा आहे.

तर ही आहे नाकातून रक्त येण्याबाबतची सविस्तर माहिती.

जगभरात एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ ६० ते ७०% लोकांना आयुष्यात केव्हातरी नाकातून रक्त येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.

आणि त्यातील केवळ १० % लोकांच्या बाबतीत काहितरी गंभीर कारण असते.

त्यामुळे एखादे वेळी जर तुमच्या नाकातून रक्त आले तर घाबरून जाऊ नका.

वर सांगितलेले उपाय करा. वारंवार त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवा आणि योग्य ते उपचार घ्या.

स्वस्थ रहा. आनंदी रहा.

 

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।