मुंबई ग्राहक पंचायत एक ऑन- लाईन सर्वेक्षण हाती घेत आहे. ज्या घर खरेदीदारांचे अर्धवट असलेले प्रकल्प महारेरात संबंधित विकासकांनी नोंदवलेले नाहीत त्यांची माहिती या सर्वेक्षणातुन गोळा करण्यात येणार आहे.
तसेच ज्या ग्राहकांनी एकुण रकमेच्या १०% पेक्षा जास्त रक्कम भरूनही विकासकांनी विक्री करारनामा केलेला नाही त्या विकासकांची माहिती सुद्धा या सर्वेक्षणातुन गोळा करण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणातुन उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे मुंबई ग्राहक पंचायत हे दोन्ही प्रश्न महारेराकडे धसास लावण्याचा प्रयत्न करणार आहे.
संबंधित घर खरेदीदार ग्राहकांना या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी या लिंक वर जावे लागेल.
हे सर्वेक्षण २६ सप्टेंबर सायं.७ वाजल्यापासून बुधवार, १० ऑक्टोबर, सायंकाळी ७ वाजेपर्यंत ग्राहकांना उपलब्ध असेल.
सर्व संबंधित घर खरेदीदार ग्राहकांनी या सर्वेक्षणात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मुंबई ग्राहक पंचायत करत आहे.
शिरीष देशपांडे
कार्याध्यक्ष
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.