पाळीची तारीख नैसर्गिकरीत्या पुढे कशी ढकलावी ते वाचा या लेखात 

एखादी लांबची ट्रीप प्लान केली असेल, ट्रेकिंगला जायचे असेल, लग्न किंवा एखादा कार्यक्रम असेल आणि ती तारीख नेमकी तुमच्या पाळीच्या आजूबाजूची असेल तर टेन्शन येतेच, हो ना?

अशावेळेला पाळीचे लाटांबर नको वाटते.

पोट दुखणे, कुठे चुकून डाग पडेल का याची काळजी करणे आणि सोबत जास्तीचे कपडे आणि इतर सामुग्री बाळगणे हे नको वाटते.

या सगळ्यापेक्षाही महत्वाचा प्रश्न येतो तो स्वच्छतागृहांचा.

हायवे वर अनेक ठिकाणी स्वच्छतागृहे असतात पण तिथे स्वच्छता मात्र आजिबात नसते.

अशा ठिकाणी जाणे धोक्याचे वाटते.

अशा अनेक कारणांमुळे प्रवासाच्या वेळी पाळी नकोशी वाटते. 

प्रवास करत असताना अचानक पाळी सुरु झाली तर त्याबद्दल काहीच करता येत नाही.

वेळ निभावून नेण्यापलीकडे पर्याय नसतो. पण जर तुमची ट्रीप आधीपासूनच ठरलेली असेल आणि तुमच्या पाळीची तारीख जर त्याच सुमारास येत असेल तर मात्र ती तारीख काही उपाय करून पुढे नेता येते. 

यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या मिळतात.

पण अशा गोळ्यांचे दुष्परिणाम जास्त असतात त्यामुळे किरकोळ कारणांसाठी डॉक्टर सुद्धा या गोळ्या लिहून देत नाहीत.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा गोळ्या घेणे हे तर अजिबात करू नये.

त्याचे फार गंभीर परिणाम होऊ शकतात. 

अशावेळेला काही सोपे घरगुती उपाय मदतीला धावून येतात.

कोणत्याही गोळ्यांशिवाय आणि कोणत्याही अघोरी उपायांशिवाय नैसर्गिक उपाय आहेत ज्यांचा पाळी पुढे ढकलण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. 

यामधील काही उपाय केवळ गैरसमजापोटी सुद्धा जन्माला आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण हे सिद्ध करणारा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.

पण यातील काही उपाय मात्र परिणामकारक आणि कुठलाही अपाय नसणारे आहेत.

या लेखात असेच काही पाळी नैसर्गिकरित्या पुढे ढकलण्यासाठीचे उपाय सांगितले आहेत.

यातील कोणत्या उपायांचा निश्चित फायदा होतो, कोणत्या नाही तसेच हे उपाय कसे करावेत, त्यासंदर्भात कोणती काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे.

मुख्य म्हणजे थोड्या प्रमाणात का होईना पण या उपायांचे दुष्परिणाम काय आहेत हे सुद्धा या लेखात सांगितले आहे.

गोळ्या घेऊन पाळीची तारीख पुढे ढकलण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत त्याच्या तुलनेत या उपायांचे दुष्परिणाम कमी प्रमाणात आहेत.

पण हे उपाय आजमावून बघण्यापूर्वी तुम्हाला त्याची पूर्ण कल्पना हवी म्हणू ते सुद्धा या लेखात नमूद केले आहे. 

१. कडधान्ये 

कडधान्य खाल्ल्यामुळे पाळीची तारीख पुढे जाते असे काहींच्या अनुभवांवरून सिद्ध झाले आहे.

कडधान्ये तळून घेऊन मिक्सरमधून वाटून त्याची पावडर करून घ्यावी.

पाळी पुढे जाऊन हवी असल्याच पाळी सुरु व्हायच्या एक दोन दिवस आधीपासून ही पावडर घेणे सुरु करावे.

सूप करून किंवा दुधात मिसळून सुद्धा ही पावडर घेता येते.

पाळी सुरु होण्याच्या आधी ही पावडर घेतल्याने पाळीची तारीख थोडे दिवस पुढे ढकलता येऊ शकते. 

हा उपाय शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाला नसून त्याचे फार गंभीर दुष्परिणाम सुद्धा होत नाहीत. 

कडधान्यातील जास्तीच्या फायबरमुळे पोट दुखणे, पोट डब्ब भरून राहिल्यासारखे वाटणे, गॅसेस होणे यासारखे त्रास मात्र होऊ शकतात. 

२. लिंबाचा रस 

लिंबाच्या रसात सायट्रिक ऍसिड खूप जास्त प्रमाणात असते.

लिंबू, मोसंबी, संत्री या वर्गातील फळांना सायट्रस फ्रुट्स असे म्हणतात.

सायट्रस फळांमुळे रक्तस्त्राव कमी व्हायला मदत होते.

यामागे देखील शास्त्रीय पुरावा काही नसला तरी अनुभवातून मात्र हे सिद्ध झाले आहे. 

पाळी सुरु होण्यापूर्वी लिंबाच्या रसाचे सेवन केल्याने पाळी पुढे ढकलता येते, तसेच पाळी दरम्यान होणारा रक्तस्त्राव सुद्धा कमी करता येतो. 

लिंबाच्या रसातील जास्त प्रमाणात असणाऱ्या ऍसीडमुळे मात्र काही त्रास होण्याची शक्यता असते.

जास्त प्रमाणात लिंबाचा रस घेतल्याने दात, हिरड्या, तोंडातील आतला भाग याला झोंबल्यासारखे होऊ शकते, सोलवटले जाऊ शकते.

जर तोंड आलेले असेल, तोंडात इतर काही जखमा असतील तर लिंबाच्या रसामुळे जास्त त्रास होण्याची शक्यता असते.

त्यामुळे हा उपाय करताना एक काळजी आवर्जून घेतली पाहिजे ती म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिणे.

रोज जर तुम्ही साधारण २ लिटर पाणी पीत असाल तर हा उपाय आजमावून बघताना एक ते दीड लिटर तरी पाणी जास्त प्यायला हवे जेणेकरून लिंबाच्या रसातील ऍसिडचा त्रास होणार नाही. 

३. जिलेटीन 

जिलेटीनचे पाणी पिणे हा सुद्धा पाळीची तारीख पुढे ढकलण्यासाठी वापरला जाणारा एक नैसर्गिक उपाय आहे.

रिसर्च द्वारा जरी हे सिद्ध झालेले नसले तरी असे मानले जाते की एक चमचा जिलेटीन एक ग्लास कोमट पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घेतल्याने पाळी चार ते पाच तासांसाठी पुढे जाते.

जर तुम्हाला पाळी जास्त दिवसांसाठी पुढे न्यायची असेल तर रोज हे जिलेटीनचे पाणी पिणे हा त्यावरचा उपाय आहे. 

खूप जास्त प्रमाणात जिलेटीन युक्त पाणी पिण्याचे दुष्परिणाम असतात.

जिलेटीनचे पाणी सतत प्यायल्याने पोट बिघडते, पोट फुगल्यासारखे होते व अस्वस्थ वाटते. 

म्हणूनच जर तुम्हाला एखाद्या किवा एखाद दोन दिवसांसाठीच पाळी पुढे जाऊन हवी असल्याच हा उपाय करावा.

जास्त दिवस जिलेटीन युक्त पाणी पिणे टाळावे जेणेकरून त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाहीत आणि काही काळासाठी पाळी पुढे ढकलण्याचा तुमचा हेतू साध्य होईल. 

४. व्यायाम 

खूप जास्त प्रमाणात शारीरिक कष्ट किंवा व्यायाम केल्याने पाळी सुरु होण्याची तारीख पुढे सरकते.

हा अनुभव तुम्हाला सुद्धा आलाच असेल.

जर एखाद्या महिन्यात तुमची पाळी सुरु होण्या थोडे दिवस आधीच तुम्ही व्यायाम वाढवला असेल किंवा व्यायामाला सुरुवात केली असेल तर त्या महिन्यात तुमची पाळीची तारीख हमखास पुढे जाते. 

ज्या बायका नियमितपणे जास्त प्रमाणात व्यायाम करतात त्यांना तर हा अनुभव दर महिन्यात येत असेल.

अशा बायकांची पाळी दर महिन्यालाच एक दोन दिवस पुढे जातेच. 

व्यायाम करून तुमच्या शरीरातील एनर्जी जास्त प्रमाणात वापरली जाते.

प्रत्यक्ष व्यायाम करायला आणि व्यायामानंतर शरीराला योग्य ती विश्रांती देण्यासाठी ही एनर्जी खर्ची पडलेली असते.

शरीरात कमी झालेली ही एनर्जी मासिक पाळी दरम्यान होणारा रक्तस्त्राव, त्रास हा निभावून नेण्यासाठी पुरेशी नसते.

याच कारणामुळे व्यायाम केल्याने पाळीची तारीख नैसर्गिकरीत्या पुढे जाऊ शकते. 

याचाच वापर करून तुम्ही तुमची पाळी सुद्धा अशी एक दोन दिवस पुढे नेण्यासाठी व्यायाम करू शकता.

पाळीची तारीख जवळ आल्यावर तुम्ही करत असलेला व्यायाम वाढवला तर फायदा होऊ शकेल. 

मात्र, तुमच्या शारीरिक क्षमतेच्या बाहेर व्यायाम करू नये कारण यामुळे इतर त्रास होण्याची शक्यता असते. 

मैत्रीणींनो हे उपाय करताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी, ती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक शरीरासाठी हानिकारकच असतो.

तसेच, जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हाच या उपायांचा आधार घ्यावा.

शरीराच्या नैसर्गिक सायकलमध्ये ढवळाढवळ करणे मात्र योग्य नाही.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।