२४ मे२०२२ ला अमेरिकेतल्या टेक्सासमधल्या एका शाळेत झालेल्या भीषण गोळीबारात १८ विद्यार्थ्यांसह एकूण २१ जणांचा मृत्यू झाला .
१८ वर्षीय साल्वाडोर रामोस याने हा अंदाधुंद गोळीबार केला.
अमेरिकेत आजपर्यंत २८८ शाळेत गोळीबार झाला आहे.
जगभरात कुठंही इतक्या मोठ्या प्रमाणावर स्कूल शूटिंग बघायला मिळत नाही.
नुकत्याच झालेल्या टेक्सास मधल्या गोळीबारातल्या साल्वाडोर रामोसने नेमकं का हे पाऊल उचललं?
साल्वाडोर रामोसला शाळेत एकूणच त्याच्या बालपणी खूप त्रास झाला होता, हे आता उघड झालयं.
त्यामुळे त्याच्या वागण्यामध्ये खूप बदल झाला होता आणि तो एकटा एकटा रहायला लागला.
रामोसने त्याच्या १८ व्या वाढदिवशी दोन सेमी-ऑटोमॅटिक रायफल खरेदी केल्या.
या रायफलचे फोटो त्याने सोशल मीडिया अकाउंटवरसुद्धा शेअर केले होते.
साल्वाडोरच्या संपर्कात असलेल्या लोकांनी सांगितल्या साल्वाडोरच्या अडचणी
अंदाधुंद गोळीबार करणा-या साल्वाडोर रामोसच्या काही मित्रांनी आणि नातेवाईकांनी सांगितलं की, रामोसला लहानपणी इतरांशी बोलायला अडचण येत होती.
शाळेत त्याला याविषयी अनेकदा समज दिली गेली.
साल्वाडोरबरोबर शिकणारे बाकीचे विद्यार्थी त्याची खूप चेष्टा करायचे.
त्यामुळे त्यानं कित्येक वेळा शाळासुद्धा सोडून दिली होती.
एका शेजाऱ्यानं हेही सांगितलं, की रामोसच्या घरातील वातावरणही चांगले नव्हते, त्याचं आईशी सतत भांडण व्हायचं.
या भांडणाचे व्हिडीओ ही साल्वाडोर थेट सोशल मिडियावर शेअर करायचा.
काही महिन्यांपूर्वी स्टाग्रामवर एक व्हिडिओ साल्वाडोरने अपलोड केला होता ज्यामध्ये पोलिससुद्धा होते.
या व्हिडिओत साल्वाडोर रामोस, त्याच्या आईवर कर्कश्श ओरडत होता. ओरडत होता की त्याला घराबाहेर काढायची सगळ्यांची इच्छा आहे.
साल्वाडोर रामोसच्या एका क्लासमेटनं सांगितलं, की शाळेमध्ये रामोस इतर मुलांकडून सतत ‘बुली’ होत असे, म्हणजे इतर मुले त्याला नेहमीच चिडवत.
त्याला त्रास होत असताना, तसंच त्याची चेष्टा केली जात असताना बाकीची मुलं तो खेळ एंजॉय करायची.
शाळेत, मुलं त्याच्या कपड्यांबद्दल त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सतत टोमणे मारायची.
पुढे साल्वाडोर रामोस टेक्सासमधल्या रेस्टॉरंटमध्ये कामही करायचा.
या रेस्टॉरंटचे व्यवस्थापक एड्रियन मेंडिस यांनी सांगितले की,
“तसा तो खूप शांत होता. मात्र कोणत्याही कर्मचाऱ्याशी त्याची मैत्री नव्हती.”
तो मोकळेपणानं कुणाशी ही बोलायचा नाही.
आपलं काम बरं, आपण बरं अशा वृत्तीने काम करून पैसे घेऊन निघून ही जायचा.
टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी या गोळीबाराशी संबंधित एक महत्त्वाची माहिती दिली.
त्यांनी सांगितलं की साल्वाडोर रामोसने, रॉब एलिमेंटरी स्कूलवर हल्ला करण्यापूर्वी गोळीबाराची जाहीर घोषणा केली होती.
हा गोळीबार करण्यापूर्वी ३० मिनिटे आधी रामोसने सोशल मीडियावर ३ पोस्ट शेअर केल्या.
साल्वाडोर रामोसने पहिल्या पोस्टमध्ये लिहिलं की, तो त्याच्या आजीला शूट करणार आहे.
दुसऱ्या पोस्टमध्ये आजीला शूट केल्याचं त्यानं लिहिलं .
तिसरी जी पोस्ट होती, त्यात साल्वाडोर रामोसनं लिहीलं होतं की “मी आता शाळेत गोळीबार करायला निघालो आहे.”
२४ मे २०२२ हाच तो दुर्दैवी दिवस होता.
साल्वाडोर रामोस टेक्सासमधल्या रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये बंदूक घेऊन घुसला आणि अंदाधुंद गोळीबार केला.
२ री, ३ री आणि ४थीत शिकणारी निरागस निष्पाप मुलं साल्वाडोर रामोसच्या गोळीबारात ठार झाली.
का झालं? कसं झालं? याचा तपास सुरू आहे.
मात्र सोशल मीडियावर जाहीर घोषणा करून, घडलेला हा क्रूर थरार समाजासमोर आणि तज्ञांसमोर अनेक प्रश्न उभे करून गेला आहे.
आपल्या मुलांना समृद्ध आणि सशक्त बालपण देणं किती गरजेचं आहे, हेच यावरून अधोरेखित होतं!!
याच पार्श्वभूमीवर आपण आपले पेज फेसबुक मनाचेTalks यावर ’30 Days challenge for happy parenting’ ही ऍक्टिव्हिटी सुरू करूया. या निःशुल्क उपक्रमात तुम्हाला सामील व्हायचे असल्यास व्हाट्सएप ग्रुपसाठी येथे क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनल साठी येथे क्लिक करा
लहान मुले तणावाखाली असण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.