जाणून घ्या पुरुषांच्या आरोग्याच्या विविध तक्रारी आणि त्यावरचे घरगुती उपाय

आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात, कामाच्या व्यस्त रुटीन मध्ये स्त्रियांचेच नव्हे तर पुरूषांचे देखील आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि मग आरोग्याच्या विविध तक्रारी सुरू होतात.

अनेकदा कामाच्या गडबडीत पुरूषांचे आहार, व्यायाम याकडे दुर्लक्ष होते आणि मग काही ना काही त्रास सुरू होतो.

आज आपण पुरुषांच्या आरोग्याशी निगडीत विविध तक्रारी आणि त्यावरचे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

१. प्रोस्टेट ग्रंथींची वाढ 

प्रोस्टेट ग्रंथी फक्त पुरुषांच्या शरीरातच असतात. ह्या ग्रंथीमध्ये वयोपरत्वे बदल होतो. वयोमानानुसार किंवा हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे प्रोस्टेट ग्रंथींची वाढ होते.

वाढलेले प्रोस्टेट ग्लॅंड हे तपासून घेणे आवश्यक आहे. सगळ्यांच्या बाबतीत ते धोकादायक असतेच असे नाही, परंतु काही वेळा कॅन्सर ची शक्यता असते. त्यामुळे तपासणी करणे योग्य ठरते. शिवाय प्रोस्टेट ग्रंथींच्या वाढीमुळे इतरही त्रास होतात ते खालीलप्रमाणे…

१. मूत्रपिंडे कमकुवत होणे

२. मूत्रविसर्जन पूर्णपणे झाले आहे असे न वाटणे

३. मूत्रविसर्जन सुरू करण्यास त्रास होणे

४. वारंवार लघवीला जावे लागणे

५. लघवीला जाण्याची खूप घाई होणे

६. रात्री वारंवार लघवीसाठी उठावे लागणे

७. लघवी करताना त्रास व वेदना होणे

उपाय – लसूण

लसूण हा प्रोस्टेट ग्रंथींची वाढ रोखण्याचा प्रभावी उपाय आहे. लसणामध्ये सूज कमी करणारे तसेच कॅन्सरची वाढ रोखणारे पोषक गुण असतात.

त्यामुळे लसूण कच्चा अथवा शिजवलेला कसाही सेवन केला असता प्रोस्टेट ग्रंथी ची वाढ होणे किंवा त्या ग्रंथीना सूज येणे कमी होते.

२. पुरुषांना येणारे पिंपल्स 

स्त्रियांप्रमाणेच पुरुषांना देखील पिंपल्स येतात आणि अर्थातच ते त्यांनाही आवडत नाहीत. वयात येणारी मुले आणि प्रौढ पुरुष देखील पिंपल्स मुळे त्रासलेले असतात. नितळ त्वचा मिळवण्यासाठी तरुण मुले व पुरुषांनी खालील उपाय करावेत.

उपाय 

१. रोज ८ ते १० ग्लास पाणी पिणे

२. चेहेऱ्यावर कोरफाडीचा रस लावणे

३. ऍपल सायडर विनिगर चे सेवन करणे

४. चेहेऱ्यावर पिंपल्सना मध लावून अर्ध्या तासाने गार पाण्याने धुवून टाकणे.

३. शारीरिक थकवा 

पुरुषांना येणारा थकवा हा जनरली त्यांच्या कामामुळे आणि व्यस्त जीवनशैलीमुळे आहे असे गृहीत धरले जाते. परंतु हा थकवा फक्त कामाच्या ताणामुळे नसून त्यामागे इतरही कारणे असू शकतात.

उदाहरणार्थ 

१. इंसुलिन रेसिस्टन्स- इंसुलिन रेसिस्टन्स ही मधुमेहाची सुरुवात असू शकते. शरीरातील इंसुलिन नीट प्रकारे कार्य करत नसल्यामुळे शरीर मिळणाऱ्या अन्नाचे उर्जेत रूपांतर करू शकत नाही.

त्यामुळे त्या व्यक्तीस ऊर्जा कमी पडत असल्यामुळे सतत थकवा जाणवतो. रक्तातील साखरेची आणि इंसुलिन हॉर्मोनची तपासणी करून ह्याचे नीदान करता येते.

२. थायरॉईड प्रॉब्लेम– जर शरीरात थायरॉईड ग्रंथी कमी प्रमाणात स्त्रवत असतील तर नुसत्या दिवसभराच्या कामाने देखील खूप थकवा जाणवतो.

३. अनिमिया– शरीरात रक्ताची, पोषणद्रव्यांची कमतरता असेल तरीही सतत थकवा जाणवू शकतो.

४. पुरेशी झोप न घेणे– वारंवार खूप जागरणे करणे, आवश्यक ती झोप न घेणे ह्यामुळे देखील शरीरास पुरेशी विश्रांती न मिळण्यामुळे थकवा जाणवतो.

उपाय 

१. नियमित पोषक आहार घेणे

२. नियमित व्यायाम करणे

३. पुरेशी झोप घेणे

४. मद्यपान, धूम्रपान न करणे

५. मधुमेह, थायरॉईड, अनिमिया ह्यावर तपासणी करून योग्य ते उपचार घेणे.

ह्या उपायांनी शारीरिक थकव्यावर मात करता येऊ शकते.

तर हे आहेत पुरुषांना जाणवणारे काही शारीरिक त्रास आणि त्यावरील उपाय. मित्रांनो, ह्या लेखात दिलेल्या उपायांचा जरूर लाभ घ्या.

स्वस्थ रहा. आनंदी रहा.

पुरुषांच्या आरोग्यविषयक एरवी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पुरुष वंध्यत्वावर घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा

चाळिशीनंतर पुरुषांनी आवर्जून करण्याच्या तपासण्या कोणत्या, वाचा या लेखात

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “जाणून घ्या पुरुषांच्या आरोग्याच्या विविध तक्रारी आणि त्यावरचे घरगुती उपाय”

    • #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇व्हाट्सएप तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होता येईल.

      तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप अथवा चॅनल ‘लिव्ह’ करून द्यावा.

      त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून *’Add मनाचेTalks to Favourites’* यावर क्लिक करा…

      व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

      https://chat.whatsapp.com/LTv393KE2TSL0Yu4usFmpZ

      टेलिग्राम चॅनल👇

      https://t.me/manachetalksdotcom

      Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।